महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,49,408

विष्णुची शक्ती रूपे, सरस्वती

By Discover Maharashtra Views: 2417 3 Min Read

विष्णुची शक्ती रूपे, सरस्वती –

अन्वा (ता. भोकरदन, जि. जालना) येथील मंदिरावर विष्णुची शक्तीरूपे शिल्पांकीत आहेत. त्यातील काहींचा परिचय या मालिकेत पूर्वी आला आहे. छायाचित्रातील मूर्तीच्या हातात प्रदक्षिणा क्रमाने (डावीकडून उजवी कडे, घड्याळ्याच्या काट्या प्रमाणे) गदा, शंख, पद्म आणि चक्र अशी आहेत. या विष्णुला संकर्षण म्हणून संबोधले जाते. प्रतिभाशक्ती किंवा वाणी ही संकर्षण विष्णुची वैशिष्ट्ये मानली जातात. स्वाभाविकच या विष्णुची जी शक्ती आहे तिला सरस्वती हे नाव आहे. वीणा पुस्तक धारिणी म्हणून ज्या सरस्वती देवतेची पुजा होते ती सरस्वती वेगळी. ही केवळ शक्ती रूप आहे.(विष्णुची शक्ती रूपे)

या शक्तीच्या चेहर्‍यावर शांत भाव आहेत. प्रतिभेच्या पाठिशी बळ असावे लागते. नुसती दूबळी प्रतिभा कामाची ठरत नाही. संकर्षण विष्णुला बलाची देवता मानले जाते. साहजिकच त्याची शक्ती असलेली सरस्वतीही सामर्थ्यवान समजली जाते. ज्या प्रतिभेच्या पाठिशी सामर्थ्य आहे तिथे स्थिरता येते. आणि त्या स्थिरतेतून समाधान. म्हणूनच ही मुर्तीच्या चेहर्‍यावरील भाव शांत समाधानी दिसून येतात.

२४ पैकी १७ शक्ती रूपाच्या मुर्ती आजही अन्वा मंदिरावर शाबूत आहेत. अभ्यासकांनी जाणकार पर्यटकांनी त्या आवर्जून नजरेखालून घालाव्यात.

विष्णुच्या हातात आयुधांचा जो क्रम आहे त्या प्रमाणे जी नावे दिली आहेत व त्या सोबत शक्तीची जी नावे आहेत ला तक्ता अभ्यासकांसाठी देत आहे. पद्म, गदा, शंख, चक्र यांच्यासाठी प-ग-श-च ही लघु नावे वापरली आहेत. हा क्रम प्रदक्षिणा मार्गाप्रमाणे आहे.

१. केशव-किर्ती (पशचग) २. नारायण- कांती (शपगच) ३. माधव – तुष्टी (गचसप) ४. गोविंद – पुष्टी (चगपश)

५. विष्णु – ध्रती (गपशच) ६. मधुसुदन – शांती (चशपग)

७. त्रिविक्रम – क्रिया (पगचश) ८. वामन – दया (शचगप)

९. श्रीधर – मेधा (पचगश) १०. ऋषिकेश – हर्षा (गचपश)

११. पद्मनाभ-श्रद्धा (शपगच)  १२. दामोदर-लज्जा (पशगच) १३. वासुदेव-लक्ष्मी (गशपच) १४. संकर्षण – सरस्वती (गशपच) १५. प्रद्युम्न – प्रीती (चशगप) १६. अनिरूद्ध – रती (चगशप) १७. पुरूषोत्तम – वसुधा (चपशग) १८. अधोक्षज – त्रायी (पगशच) १९. नरसिंह – विद्युत (चपगश) २०. अच्युत – सुगंधा (गपचश) २१. उपेंद्र – विद्या (शगचप) २२. जनार्दन – उमा (पचशग) २३. हरी – शुद्धी (शचपग) २४. श्रीकृष्ण – बुद्धी (शगपच)

(संदर्भ : Temple Architecture and Sculpture of Maharashtra – Dr. G.B. Deglurkar – page no. 362)

(इंग्रजीत ही यादी आहे. संस्कृत उच्चार वेगळे असतील तर कृपया चुक लक्षात आणून द्या. वामन आणि अच्युत शक्तींची नावे क्रिया आणि दया अशीही दिलेली आहेत. तज्ज्ञांनी यावर प्रकाश टाकावा. त्रिविक्रम विष्णुचा आयुधक्रम मुळ पुस्तकात चुकला आहे. तो इथे दूरूस्त करून दिला आहे)

– श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद

Leave a comment