चला महाराष्ट्राचे सोनेरी वैभव परत आणुयात

गड किल्ले हे महाराष्ट्राच्या वैभवाचे,शौर्याचे,पराक्रमाचे आणि हिंदवी स्वराज्याचे साक्षीदार आहेत.त्यांच्याशिवाय महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास अपूर्णच.शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीचे मूक साक्षीदार असलेल्या गडकिल्ल्यांची आज आपण काय अवस्था करून ठेवली आहे ?(About Discover Maharashtra)

गड किल्ल्यांचा अभेद्यापणा ,शत्रूवर नजर ठेवण्याचे मोक्याचे स्थान,शत्रूला जेरीस आणण्याची व संकटाच्या वेळी निसटून जाण्याची चोरवाट शत्रूला बराच काळ झुंजत ठेवण्याचे सामर्थ्य हे सर्व गुण शिवरायांनी ओळखले होते.परंतु शिवरायांच्या याच गड किल्ल्यांची दुर्दशा डोळ्यांनी पाहवत नाहीय.शिवरायांच्या शौर्याचे कर्तुत्वाचे प्रतिक असलेले किल्ले आज आपण जतन केले नाही तर त्यांचे शौर्य व्यर्थ जाईल.कालांतराने फक्त फोटोंपुरते गड किल्ल्यांचे अस्तित्व राहील.गड किल्ल्यांचे खरे वारसदार आपण आहोत त्यांची जपणूकही आपणच केली पाहिजे.गड किल्ले संवर्धनाच्या माध्यमातून आपण इतिहासाला उजाळा देऊया त्याचे जतन करूयात आणि छत्रपतींच्या कार्याला मुजरा करूयात.

सह्याद्रीच्या गड्कील्ल्यावरील बुरुजांसारखी अभेद्य निष्टा असणारे मावळे त्यांचे बलिदान,पराक्रम स्वराज्यासाठी आजही सर्वांसाठी उस्ताह देणारे आहे.त्या सर्व मावळ्यांचे चरित्र जीवनप्रवास आपण येथे पाहणार आहोत.

मागील काही वर्षात गड किल्ल्याविषयी बरीच जनजागृती झालेली आहे.प्रत्येक दुर्गप्रेमी,संस्था,प्रतिष्ठान आपापल्या परीने दुर्ग संवर्धनासाठी आपापले योगदान देत आहेत.या सर्वानाच नक्कीच अभिमान आहे.भलेही नावे वेग वेगळी असली तरी त्यांचे कार्य आणि निष्ठा एकच आहे ते म्हणजे गड किल्ल्यांचा विकास आणि संवर्धन .आजही खूप सारे मावळे संघटन आणि संस्था न मिळाल्यामुळे शिवकार्यात सहभागी होऊ शकत नाहीत.त्या सर्व मावळ्यांना एक मध्यम मिळावे यासाठी सर्व गड किल्ले संवर्धनाचे काम करणाऱ्या संस्था यांना एकत्रित करण्यासाठी त्यांच्या कार्याची माहिती सर्वांना मिळावी तसेच त्यांच्या येणाऱ्या सर्व उपक्रमाची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी एक छोटासा उपक्रम.

महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, संस्कृती, मराठी माणूस, अपरिचित माहिती, वारसा स्थळे, स्वराज्याचे शिलेदार, महत्वाच्या व्यक्ती, गडकिल्ले, प्रवासवर्णन आणि बरंच काही जगाला दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.

❤ चला महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवूया…❤

जागं करा आपल्यातल्या लेखकवृत्तीला आणि व्यक्त व्हा Discover Maharashtra वरती. ही केवळ एक वेबसाईट नाही. ती आहे तुमची आमची सर्वांची, महाराष्ट्राचे वैभव जगाला सांगणारी ज्ञानसरिता, महाराष्ट्राच्या माहितीचा खजिना!

🚩 महाराष्ट्राचे वैभव, इतिहास, घराण्यांचा इतिहास, स्वराज्याचे शिलेदार, अपरिचित मावळे, महाराष्ट्राचे शिल्पकार, यशोगाथा, जीवनचरित्र, महाराष्ट्रातील संत. 🚩

⛳ प्रवासवर्णन, गडकिल्ले, लेण्या गुहे, धबधबे, अभयारण्ये, समुद्रकिनारा, तलाव, मंदिरे/तीर्थक्षेत्रे, नदी. ⛳

📝 साहित्य, पारंपरिक गाणी, गावची जत्रा, ग्रामदेवता, पुस्तक परिचय, नाटक, पारंपरिक प्रथा, वेशभूषा, खाद्य संस्कृती, दागदागिने, छायाचित्र, इतर लेख. 📝

वरील पैकी कोणत्याही विषयावर आपण लेख लिहून आम्हाला पाठवू शकता आम्ही ते आपल्या नावासह वेबसाईटवर टाकून लिखाण हजारो-लाखो मराठीजनांपर्यंत पोहोचवणं हेच आमचं काम..

आम्ही आहोत फक्त एक माध्यम. आपल्यातल्या लेखकाला जागा करुन, त्याला लिहिण्याची उर्मी देऊन, त्याला लिहितं करणं आणि हे लिखाण हजारो-लाखो मराठीजनांपर्यंत पोहोचवणं हेच आमचं काम. यासाठी लागणारं तंत्रज्ञान उपलब्ध करुन देणं हे “आमचं” मुख्य काम.

Discover Maharashtra आपल्या सर्वांचं आहे. इंटरनेट, वेबसाईट, मोबाईल, गॅजेटस, टॅबलेट, आय-पॅड, या सगळ्या नव्या युगाच्या तंत्रज्ञानात आपल्या महाराष्ट्राची इत्यान्त्भूत माहिती देण्यासाठी शेकडो आबाल-वृद्धांचे “Discover Maharashtra” हे एक हक्काचे व्यासपीठ. “आम्ही” आहोत फक्त एक माध्यम. “आपल्या”तल्या लेखकाला जागा करुन, त्याला लिहिण्याची उर्मी देऊन, त्याला लिहितं करणं आणि हे लिखाण हजारो-लाखो मराठीजनांपर्यंत पोहोचवणं हेच “आमचं” काम. यासाठी लागणारं तंत्रज्ञान उपलब्ध करुन देणं हे “आमचं” मुख्य काम.

Discover Maharashtra ही केवळ आमची एक वेबसाईट नाही. हे एक सर्वसमावेशक “पोर्टल” आहे. हे पोर्टल आहे तुमचं आमचं सर्वांचं! महाराष्ट्राबद्दल काहीही चांगलं असेल ते ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा ध्यास घेतलेलं हे पोर्टल. आपल्याकडेही काही असेल चांगलं जे आपल्यालामंडळींपर्यंत पोहोचवायचं असेल तर आपलंही स्वागत आहे.

(आता पर्यंत १ हजार हुन अधिक लेख प्रसारित)

👇 लेख पाठवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇
https://www.discovermh.com/send-your-blog/