महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,64,796

अजिंठा लेणीतील जगप्रसिद्ध षडदंत जातककथा

By Discover Maharashtra Views: 160 4 Min Read

अजिंठा लेणीतील जगप्रसिद्ध षडदंत जातककथा | षडदंत जातक –

अजिंठा लेणीतील जगप्रसिद्ध षडदंत जातककथा हि दान व्देष समर्पण यावर आधारित आहे. हिमालयाच्या घनघोर जंगलात हत्तीच्या दोन जाती होत्या. षडदंत व उपोसथ यातील षडदंत जातीचे हत्ती खूप प्रसिद्ध होते. विशाल सहा दात असल्यामुळे यांना षडदंत म्हणत असत. या हत्तींचे पाय आणि डोके बहुमुल्य लाल मणी समान चमकदार होते. षडदंत प्रजातिचा हत्तीचा राजा कंच्चन महालात राहत होता. त्याला महासुभद्दा व चुलसुभद्दा नावाच्या दोन राण्या होत्या. एके दिवशी गजराज आपल्या दोघ राण्यान सोबत जवळ असलेल्या सरोवरावर अंघोळीसाठी गेले. त्याच सरोवरावर जवळ एक विशाल जुने झाड होते. हे झाड मनमोहक सुगंधित सुंदर सुंदर फुलांनी बहरलेले होते. अंघोळ केल्यावर षडदंत राजने मस्ती मस्तीत झाडांच्या एका फांदीला आपल्या सोंडीने पकडून जोराने हलविली यामुळे झाडाची सुंदर, सुगंधित, मनमोलक फुले ही महासुभद्दा हिच्या अंगावर पडली यामुळे ती गजराजवर खूप खुष झाली. दुसर्‍या बाजूला झाडाची एक वाळलेले फांदी फुलांसोबत चुलसुभद्दाच्या डोक्यावर पडली. हि संपूर्ण घटना योगायोगाने झाली. चुलसुभद्दाला हे जिव्हारी लागले तीने हा आपला अपमान मानून लागलीच गजराजचा महल सोडून दुर निघून गेली. जेव्हा गजराजला हे कळाले तेव्हा गजराजने तिला खूप शोधले. परंतू ती कोठेच मिळाली नाही. काही काळानंतर ती मरण पावली.

मरणानंतर चुलसुभद्दा मध्यदेशच्या महाप्रतापी राजाच्या घरी राजकुमारी म्हणून जन्माला आली. अतिशय रूपवान व गुणवती होती. मोठी झाल्यावर तिचा विवाह वाराणसी च्या राजा सोबत झाला व ती वाराणसी राजघराण्याची पटरानी झाली. पुर्नजन्म झाल्यावर सुद्धा ती, तिचा योगायोगाने षडदंत कडून झालेला अपमान ती विसरली नव्हती. योग्य संधी मिळताच ती पुन्हा बदला घेण्याची तयारी सुरू केली होती. एक दिवशी योग्य वेळ साधून वाराणसी राजाला षडदंत हत्तीचा बहुमुल्य दात आणण्यासाठी प्रेरित केले. याचा परिणाम असा झाला की, वाराणसी राजने कुशल शिकारी व शिपायांना गजराजचे दात आणण्यासाठी धाडले.
दात आणण्यासाठी गेलेल्या टोळक्याचा मुख्य नेता सोण्णत्तर हा होता. सोण्णत्तर हा सात वर्षाचा प्रवास करून गजराजच्या निवासापर्यंत पोहचला होता. त्याने गजराजला पकडण्यासाठी खूप बुध्दी लावली. त्याने गजराजच्या घराजवळ एक मोठा खड्डा केला. या खड्डाला पालापाचोळा व लाकडांनी झाकण्यात आले. सोण्णत्तर स्वतः झुडपांच्या मागे जाऊन लपला.

गजराज त्या खड्या जवळ येताच सोण्णत्तरने विषारी बाणने गजराजला घायाळ केले. त्या बाणने घायाळ षडदंताची नजर झुडपात लपलेल्या सोण्णत्तर वर गेली. तसा गजरात त्याला मरण्यासाठी त्याच्या अंगावर धावून गेला. जवळ गेल्यावर गजराजने पहिले की, सोण्णत्तरने संन्यासाचे कपडे परिधान केले आहेत. यामुळे हत्ती असूनही षडदंतने सोण्णत्तरला सोडण्याचा निर्णय घेतला. अश्याप्रकारे गजराज कडून सोण्णत्तरला जीवनदान मिळाले. गजराज कडून जीवनदान मिळाल्यामुळे सोण्णत्तरचे मन बद्दलले आणि सोण्णत्तरने संपूर्ण माहिती गजराज षडदंताला सांगितली. यामुळे मी तुमच्या प्राणघातक हल्ला केला. काहीही झाले तरी मी गजराजचे दात आपल्या हाताने काढणार नाही. असा निर्णय सोण्णत्तरने घेतला.

आपली पत्नी मनुष्यात जन्म झाल्यानंतर ही तिच्या आचरणाने गजराज अतिशय दुःखी झाला. आपल्या मृत्यू अगोदर गजराज षडदंतने आपले दात काढून सोण्णत्तरला दिले. ते दात घेऊन सोण्णत्तर वाराणसीला परतला त्याने षडदंताची दात राणी समोर ठेवले. राणीला सोण्णत्तरने सांगितले की, कसे मला जीवनदान दिले आणि तुमची इच्छा जाणुन कसे गजराजने स्वतः आपल्या सोंडीने स्वतःचे दात तोडून दिले. संपूर्ण हकिकत जाणल्यावर राणी गजराजची मृत्यू सहन करु शकलो नाही. या धक्क्यामुळे तिचाही मृत्यू होतो.

या जातककथापासून आपल्याला काय बोध मिळतो. व्देष भावना, दुसर्‍याप्रती आपली विचार करण्याची भावना देखील बदली करुन टाकते. त्यामुळे कुणाही प्रती व्देष भावना ठेवू नये. दान देतांना आपल्या शरीर दान देत असतांना आपल्या प्राणांची देखील पर्वा करायची नाही. सोबत दिलेले छायाचित्र हे अजिंठा लेणी क्रमांक 17 मधील आहे. या चित्रला वरुन खाली पाहत. वर षडदंत गजराज विशाल झाडाला हलवत आहे. झाडाला फुले आहेत. ती फुले महासुभद्दाच्या अंगावर पडत आहे तर दुसरी कडे वाळलेली फांदी, पालापाचोळा व फुले चुलसुभद्दा हिच्या अंगावर पडत आहे. खाली खेड्यावर पालापाचोळ्याने खड्डा लपवला जात आहे. षडदंत सोण्णत्तरच्या अंगावर धावून गेला आहे. उजव्या बाजूला सोण्णत्तरने वाराणसी राज दरबारात गजराज षडदंताचे दात राजा समोर सादर केले. राणी संपूर्ण हकिकत ऐकून शांतपणे बसली आहे.

अजय पवार (7620111313)

Leave a comment