वेरूळ लेण्यातील वराह अवतार शिल्प

वेरूळ लेण्यातील वराह अवतार शिल्प

वेरूळ लेण्यातील वराह अवतार शिल्प –

शेवटच्या भागात जाम येथील वराह अवतार शिल्पाची चर्चा केली होती. तेंव्हा कैलास लेण्यातील याच शिल्पाचा विषय निघाला होता. हे शिल्प वेरूळच्या लेणी क्र. १४ मधील आहे. या लेणीला “रावण की खाई” म्हणून ओळखले जाते. हिरण्याक्षाने वसुंधरेला समुद्रतळी नेले होते. विष्णुने वराह अवतार घेवून तिला वर काढले अशी कथा आहे.(वेरूळ लेण्यातील वराह अवतार शिल्प)

नागाच्या आभोगावर, वेटोळ्यावर उभा असणारा वराह. एक पाय पुढे, एक हात कमरेवर. याला आढील आसन म्हणतात याला. काहीतरी जगावेगळा पराक्रम करून पृथ्वीला पाण्या बाहेर काढलेला आश्वासक आवेग जाणवतो इथे. पृथ्वी अतिशय मनापासून हुश्श म्हणून त्याला धन्यवाद म्हणत असावी इतकी सहज सुंदर आहे. तिच्या कानात असणारे एक कुंडल माने जवळ आहे तर दुसरे लांब आहे.

खाली बाजूला हिरणाक्ष आणि त्याची पत्नी हात जोडून उभ्या असलेल्या दिसतील. पाताळ, पाणी असणारा प्रदेश, इतर असंख्य गोष्टी आणि नाग देवता यांचे नाते सर्वश्रुत आहे. इथे वराहाने धरलेले चक्र आणि पृथ्वीची त्रिभंग मूर्ती खूप महत्त्वाची. हातात चक्र नेमकेपणाने धरले आहै. महाभारत मालिकेत मध्ये नितीश भारद्वाज किंवा सगळे नर्तक धरतात तसे कधीही धरत नाहीत.

भुदेवीने आपला उजवा हात वराह मुखावर सहजपणे टेकवला आहे. तिच्या दूसर्‍या हातात कमंडलू दिसत आहे. पाठीमागे अर्धवर्तूळांतून समुद्र सुचीत केलेला आहे. वराह अवतार शिल्प मराठवाड्यात बर्‍याच ठिकाणी आढळून येतात. वराह अवताराचे या प्रदेशातील हे सर्वात भव्य शिल्प आहे.

(पुरक माहिती Rahul Deshpande यांनी दिली)

छायाचित्र सौजन्य – Travel Baba Voyage

-श्रीकांत उमरीकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here