महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

तोरण शिल्पाचा 3D नमुना

By Discover Maharashtra Views: 2335 1 Min Read

तोरण शिल्पाचा 3D नमुना –

होट्टल (ता. देगलुर जि. नांदेड) येथील मंदिरांचा विविध पैलूंनी बारीक विचार झाला पाहिजे. आता हे जे शिल्प आहे ते गर्भगृहाच्या द्वारशाखेवरील तोरणाचे आहे. समोरून पाहताना हातात माळा घेतलेले यश किन्नर  दिसतात. त्यांच्या हातातील माळांची सुरेख अशी नक्षी बनलेली आढळून येते. या भागात सहसा अंधार असतो त्यामुळे संपूर्ण शिल्पाकडे लक्ष जात नाही. पण या तोरणावर प्रकाश टाकला आणि खालची बाजू बघितली तर आपण चकित होतो. हे शिल्प 3D आहे.

आपल्याला दिसते ती छाती पासून वरची बाजू दर्शनी प्रतलात आहे. पण कमरेपासून खालची बाजू दूसर्‍या प्रतलात आहे. ९० अंशाचा कोन करून या मानवी आकृत्या वळवलेल्या आहेत. शिल्पकलेतील हे मोठं आव्हानात्मक काम आहे. अशाच पद्धतीने  द्वारशाखेवर नृत्य करणारे स्त्री पुरूष दाखवलेले आहेत. म्हणजे शिल्पकलेत एकाच प्रतलाचा वापर न करता दोन दिशा दोन प्रतलात शिल्प कोरलेली आढळून येतात. हे केवळ सौंदर्यपूर्णच आहे असे नाही तर गणिताचा अभ्यास करून निर्माण झालं आहे.

प्राचीन मंदिरांबाबत अशा काही बाबी खरंच आचंबीत करतात. वास्तुशास्त्र, शिल्प सौंदर्य, विज्ञान, गणित असा अद्भुत संगम इथे पहायला मिळतो. दगडाची प्रतवारी शोधून मगच शिल्प कोरले जाते. दगडी चिर्‍यांची रचना नुसती सौंदर्यपूर्ण नसते तर त्यात शास्त्रही सांभाळलेले असते.

Travel Baba Voyage  अशा अवघड जागी वर चढून फोटो काढल्या बद्दल धन्यवाद मित्रा.

-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद

Leave a comment