महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,71,371

छत्रपतींचे दुर्गविज्ञानाचे जलदुर्ग सिंधुदुर्ग !

By Discover Maharashtra Views: 1427 2 Min Read

छत्रपतींचे दुर्गविज्ञानाचे जलदुर्ग सिंधुदुर्ग !

छत्रपती शिवरायांच्या आरमारी कौशल्याची साक्ष देणारे हे बेलाग समुद्रकिल्ले गेले शेकडो वर्षे समुद्राच्या बेफाम लाटांशी, सुसाट वार्याशी झुंज देत अभिमानाने साक्षीने उभा असलेला “छत्रपतींचे दुर्गविज्ञानाचे जलदुर्ग सिंधुदुर्ग”.

सिंधुदुर्गाचे द्वार बांधणीची दुर्गरचना :

सागरी दुर्गबांधणीतही काही किल्ल्यांचे उल्लेख महत्त्वाचे आहेत त्यात गोमुखी बांधणीची दुर्गरचना असे की दोन बुरुजांच्या कवेने चिंचोळ्या वाटेने आत गेले की दरवाजा समोर येत असे ह्या ठिकाणी लढाईला फार जागा नसे व शत्रुवर वरुन चारही बाजूने तूटून पडता येत असे जरी कोणी यातूनही आत शिरलाच तरी पुढचा मार्ग सुकर नसे कारण महादरवाज्यातून आत शिरले की वाट ९० ते १८० अंशात डावीकडे वळत असते तिथून वाचून पुढे जाणे अगदीच अशक्य असे…

सिंधुदुर्ग बांधतानासुद्धा त्यांनी दुर्गविज्ञान वापरले कुरटे बेटावर १६६४ ते ६७ मध्ये त्यांनी बेलाग अशी शिवलंकाच उभारली यामध्ये किल्ल्याच्या उभारणीसाठी त्यांनी पाया बांधताना शिसे व चुना यांचा वापर करून समुद्राच्या लाटांच्या माऱ्याचा परिणाम होणार नाही हे पाहिले शिशाचा रस ओतून चिरे बसवण्याची कल्पना प्रत्यक्ष अंमलात आणून ‘चौऱ्याऐशी बंदरी ऐसी जागा दुसरी नाही.. इथे नूतन जंजिरा बसवावा’ हे सार्थ करून उत्कृष्ट जलदुर्ग साकारला किल्ल्यापर्यंत जाणारा मार्ग हा नैसर्गिकरीत्या सर्पाकृती आहे कारण मधले समुद्रातील खडक हे तसेच ठेवले परक्यांची जहाजे, तरांडी अंदाज न आल्यामुळे फुटतील अशी योजना त्यांनी केली…

किल्ल्याच्या रक्षणासाठी शिवरायांनी वेगळेच तंत्र वापरले त्यांनी किल्ल्याच्या बेटाभोवती न घडवलेले ओबड-धोबड दगड, चिरे असे बेमालूम पेरले, की भरतीच्या वेळीही दगड दिसावेत समुद्राच्या पाण्यामुळे या दगडांवर धारदार शंख-शिंपल्यांची वाढ होऊन त्याच्या धारदार कडांमुळे खडकावर वावरणे अशक्य होऊन बसले. कारण त्याकाळी पादत्राणे ही कच्च्या चामडय़ाची असत समुद्राचे खारे पाणी अशी पादत्राणे खराब करून टाकीत त्यामुळे चपला घालता येत नाही आणि चालताही येत नाही अशा परिस्थितीमुळे लढणे जिकिरीचे होइ शिवाय लाटांचे भरतीच्या वेळी येणारे पाणी दगडावर आपटून मुख्य तटबंदीपर्यंत पाणी न पोहोचू देण्याची पद्धत शिवरायांच्या स्थपतींनी यशस्वीरीत्या वापरली…

– अभय कडू

Leave a Comment