मानस्तंभावरील जैन देवता

मानस्तंभावरील जैन देवता

मानस्तंभावरील जैन देवता –

चारठाणा (ता. जिंतूर जि. परभणी) येथ ३४ फुटी उंच भव्य सुंदर आणि कलात्मक असा मानस्तंभ आहे. याचा कालखंड १३ व्या शतकातील आहे. पैठण आणि वेरूळच्या कैलास लेण्यात असलेल्या स्तंभांशी याची तूलना करता येते. याच्यावर चार दिशांना चार मातृदेवता कोरलेल्या आहेत. देवतांच्या वर छोट्या देवकोष्टकात जैन तीर्थंकारांच्या मूर्ती असल्याने या जैन मातृदेवता असल्याचे अनुमान निघते.

पूर्वेकडील चक्रेश्वरी जिच्या हातात चक्र असून वाहन गरुड ,उत्तरेकडील पद्मावती जिचे वाहन हंस , पश्चिमेकडील अंबिका जिचे वाहन सिंह , दक्षिणेकडील ज्वालामालिनी जिचे वाहन वृषभ व अष्टभुजा . याच स्तंभाच्या समोर मंदिराच्या द्वारशाखेवरील तोरणाचे अवशेष आढळून येतात. इथे उत्खननास परवानगी मिळाल्यास मंदिर सापडण्याची शक्यता अभ्यासक ज्यांनी या मूर्तीवर/ स्तंभावर संशोधन केले आहे ते Laxmikant Sonwatkar हे सांगतात.

हा सगळा परिसर निव्वळ उकिरडा बनला आहे. स्वच्छता अभियान राबवून गावकरी प्रयत्न करत आहेत. पण उत्खननास परवानगी आणि निधी मिळाल्या शिवाय इथला प्रश्न निकाली निघणार नाही. सरकारी निधी न मिळाल्यास जैन संघटनांनी याकडे लक्ष द्यावे निधी उपलब्ध करून द्यावा ही कळकळीची विनंती.

-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here