दिपमाळेतील गणपती

दिपमाळेतील गणपती

दिपमाळेतील गणपती –

दिपमाळ मंदिर संकल्पनेतील एक वास्तू शिल्पाचा अविष्कार. देवाच्या मूर्ती समोर जशी नंदादिप तेवत ठेवण्याची पध्दत आहे. तशीच पध्दत मंदिरा समोर दिपमाळ लावत अासे.उत्सवाच्या काळात या दिपमाळी उजळ्यात येत असत. भारतात दिपमाळे चे विविध प्रकार पाहायला मिळतात.महाराष्ट्रात सुध्दा दिपमाळेत विविध प्रकार पाहावयाला मिळतात. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात दिपमाळेत खुप फरक जाणवतो.(दिपमाळेतील गणपती)

दिपमाळ महाराष्ट्रीयन मंदिर रचनेतील खास वैशिष्ठ. उंच व वर निमुळता  होणारा स्तंभ व त्यावर अोळीने हात बसवलेले असतात. या दिपमाळ सुशोभित करण्यासाठी त्यावर आनेक शिल्प,नक्षिकाम,शुभ चिन्ह कोरलेले असतात. याच दिपमाळेत एक कमी प्रमाणात वेगळ वैशिष्ठ पाहायला  मिळते ते म्हणजे यावर कोरलेले गणेश शिल्प किवा त्यात स्थापन केलेले गणपतीची मूर्ती.

गणपती हा अद्य पुजेचा मानकरी. विघ्नांचा विनाश करून मांगल्याची स्थापना करणारा गणपती हा विघ्नेश्वर ,विघ्नर्हता अाहे. पेशवे हे गणपतीचे भक्त असल्याने त्या काळात गणपतीला खुप महत्व आले. त्या कालखंडात बांधली गेलेली मंदिरे,वाडे ,घरे यावर त्याच्या आकृती आढळतात. मंदिरांची भटकंती व अभ्यास करताना दिपमाळेत काही आढळले गणपती.त्या कालखंडात बांधली गेलेली मंदिरे,वाडे ,घरे यावर त्याच्या आकृती आढळतात. मंदिरांची भटकंती व अभ्यास करताना दिपमाळेत काही आढळले गणपती.

सदर गणपती मोरया गोसावी मंदिर  ( चिंचवड) ,संत तुकाराम महाराज मंदिर ( देहू) , सोमेश्वर मंदिर ( पाषाण), विष्णू मंदिर. (  लांझे ) हनुमान मादिर,महादेव. ( नावडी ) व कर्नाटक येथील मंदिर.

दिपमाळ उभी मंदिरी l
ऊंच भिडे जणु गगनी ll

वेध इतिहासाचा.
दिपमाळेतील गणपती भाग. १

संतोष मु चंदने ,चिंचवड ,पुणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here