महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्टa>👈 Website Views: 94,29,015

खान्देशातील दुर्ग आणि किल्ले भाग १

Views: 3
6 Min Read

खान्देशातील दुर्ग आणि किल्ले भाग १ –

उत्तरं यत्समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम्। वर्षं तद्भारतं नाम भारती यत्र सन्ततिः नवयोजनसाहस्त्रों विस्तारोऽस्य महामुने।कर्मभूमिरियं स्वर्गमपवर्गं च गच्छताम् अत्रापि भारतं श्रेष्ठं जम्बूद्वीपे महामुने। यतो ही कर्मभूरेषा ह्यतोऽन्या भोगभूमयःII

अर्थात: जो समुद्राच्या उत्तरेला आणि हिमालयच्या दक्षिणेला स्थित आहे त्या खंडाला भारतदेश म्हटले जाते. ज्याचा विस्तार ९ हजार योजन असून स्वर्ग आणि अपवर्गाला प्राप्त करणाऱ्यांची ही कर्मभूमि आहे. या जम्बूद्वीपात भारतच सर्वश्रेष्ठ आहे कारण ही कर्मभूमि आहे. उर्वरित देश फ़क्त भोगभूमि आहे. पूर्वजांनी वर्णनेली ही या भूमीची थोरवी आहे. ‘भारत’ शब्द मानस पटलावर उमटत्याक्षणीच निबिड़ अरण्य , गगनस्पर्श पर्वतराजींचा, अफाट वेगाच्या नद्यांचा , थल च्या वाळवांटाचा, वेद-पुराण, स्मृति , रामायण महाभारत सारख्या महाकाव्यांचा , ‘गीता’ सारख्या अलौकिक तत्त्वज्ञानाचा असा अचंभित करणारा राष्ट्रपुरुष समोर उभा ठाकतो. सहस्रकांच्या कालचक्राच्या गतीत शेकडो वंशसाम्राज्य उदयोलयित झाली. काळ पुरुषाने जरी त्यांचे अस्तित्व गिळले असेल तरी त्यांच्या अस्तित्वांच्या भौतिक खाणाखुणा आजही आसेतु हिमालय विखुरलेल्या आहे. या खुणा थेट सिंधु संस्कृती पासून ते मराठा साम्राज्याच्या लया पर्यन्त काळ पटलावर उमटलेल्या आहेत.(खान्देशातील दुर्ग आणि किल्ले | forts of Khandesh)

वेगवेगळ्या कालखंडात विविध राजघराण्यांनी साम्राज्य निर्माण करण्यासाठी केलेला विचार , मानवी शक्ती बुद्धीचा व निसर्गाचा उपयोग, तसेच ती साम्राज्य राखण्यासाठी केलेली अविरत धडपड हा इतिहास अतिशय रंजक आणि रोचक आहे. आज जरी त्यांच्या जिद्दीची, संकल्पाची आणि अनिरुद्ध ध्यासाची नावनिशाणीही काळाच्या प्रवाहात शिल्लक नसेल पण त्या जिद्द, संकल्प आणि ध्यासाची प्रतिक म्हणून जे स्थापत्य त्यांनी रचले ते आजही भौतिक रुपात उभे आहे. हे प्रतिक कधी दुर्ग-कोटांच्या च्या रुपात त्यांचे सामर्थ्य व शौर्याच्या गाथा ऐकवतात तर कधी मंदिर, वाडाच्या च्या रुपात त्यांचे कलाप्रेम व आस्थेच्या महिमा गातात. जेव्हा जगातल्या इतर भागत मनुष्यजीवन शेळ्या-मेंढ्यांभोवती डोंगरदरयात रानावनात घुटमळत होते तेव्हा आमच्या पूर्वजांनी अतिशय भक्कम अशी बांधकामे उभारली हा फ़क्त अभिमान नसून ऐतिहासिक सत्य आहे. भारतात लष्करी व नागरी अश्या स्थापत्य शास्त्राची सुरवातची साक्ष सिंधु संस्कृती काळापासून प्राप्त होते. याच पार्श्वभूमीच्या आधारे सम्पूर्ण भारतात वेगवेगळ्या ठिकाणी दूर्गस्थापत्यशास्त्र भौगोलिकतेनुसार विकसित होत गेले. दुर्गबांधणी साठी जागेची निवड, पाण्याची उपलब्धता , सभोवतालचा परिसर , नैसर्गिक संरक्षण, प्रदेशाचा हवामान या सगळ्या पैलुना लक्षात ठेवून दुर्गांची निर्मिती केली गेली. दरम्यान पुढच्या पिढ्यांनी या सर्व पैलुना बुद्धिमत्तेची व स्थापत्य कौशल्याची जोड़ देऊन ते अधिकाधिक परिष्कृत करून एकाहुन एक दुर्गांची निर्मिती केली. जरी या दुर्गांची मूळ संरचना समान होती मात्र स्थानिक आणि क्षेत्रिय भौगोलिक व निसर्गानुसार त्यात काही बदल केले गेले.

याच दुर्ग संपनतेवर आजच्या भारतात जर क्रमवारी लावण्याचे ठरविले तर त्यात महाराष्ट्र राज्य निसंशयपणे प्रथमस्थानी ठरेल. चारशे पेक्षा जास्त दुर्गवैभव भारतातील या प्रदेशला लाभलेला आहे. त्यात दुर्गांचे गिरीदुर्ग,वनदुर्गजलदुर्ग, तसेच त्यांचे उपप्रकार जसे की गढ़ी,भुईकोट, सराय अश्या सगळ्या प्रकारांचा यात समावेश होतो हे विशेष. ‘किल्ला’ हा फ़ारसी शब्द असून , ‘दुर्ग’ हा संस्कृत शब्द आहे. कल्लाह् म्हणजे शिखर तर किल्ला म्हणजे भोवताली चर, तट इत्यादी करून राहण्यासाठी तयार केलेले सुरक्षित स्थळ. शिवछत्रपतींच्या प्रेरणेने रचल्या गेलेल्या राज्याभिषेक नंतर तयार झालेल्या राजव्यवहारकोषात किल्ल्यासाठी दुर्ग हा प्रतिशब्द सुचवला समाविष्ट केला गेला. दुर्ग ह्या सज्ञांचा उल्लेख ऋग्वेदात सुद्धा सापडतो. मनुस्मृती मध्ये धनदुर्ग (दुर्गाशिवाय वीस कोसापर्यंत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नसणारा दुर्ग), महिदुर्ग( बारा हातापेक्षा अधिक उंचीचे, आणि युद्धाच्या प्रसंगी ज्यावरून व्यवस्थित फिरता येईल आणि झरोखा(जंग्या) ठेवलेला तट असा दुर्ग), अब्ददुर्ग(चारही बाजूने पाण्याने वेढलेला), वृक्षदुर्ग(चारहीबाजूने चार कोसापर्यंत दाट जंगल,उंच वृक्ष,काटेरी झाड़ीनी वेढलेला), नृदुर्ग( गज, अश्व, पायदळ अश्या विविध सैन्याने सुरक्षित), गिरिदुर्ग(डोंगराच्या माथ्यावर , पाणी स्तोत्र, आणि वर जाण्यासाठी कमीतकमी वाट असणारा) असे सहा प्रकार सांगितले आहे. या सहाही दुर्गामध्ये गिरिदुर्ग हा सर्वश्रेष्ठ असून संकटकाळी राजाने गिरीदुर्गाचे आश्रय घ्यावे. तसेच राजाने दुर्गात विविध प्रकारची आयुधे, धनधान्य, जल, . वाहन, लोहार, सोनार, ब्राम्हण, विविध कला जाणणारे लोक, यांचा संग्रह करावा तसेच स्त्रीगृह, देवालय, आयुधशाळा याना भिंतीने सुरक्षित करावे, असा मनु स्मृतीकार म्हणतो. महाभारतातील शांतीपर्वात भीष्मने शुर पुरुषसंचय शिवाय कोणताच कोष श्रेष्ठ नाही, तर शास्त्रातील सहा दुर्गात नरदुर्ग अभेद्य म्हंटले आहे. शुक्रनीति मध्ये बालेकिल्ल्यात राजसभा, राजाचे निवास्थान, इत्यादी महत्वाच्या इमारती असाव्यात. बालेकिल्ल्याचा चारही बाजूला खंदक किवा तटबंदी असावी असे उल्लेखित केले गेले आहे. कौटिल्याने दूर्गस्थापत्याचे आठ प्रकार दिलेले असून, शिल्पशास्त्राच्या विविध ग्रंथात आणि पुराणात नऊ प्रकार वर्णित आहे. दुर्गबांधणीचा खर्च कमी करून जय प्रदेशात दुर्ग बांधायचा असेल तेथील निसर्गाचा अभ्यास करून त्यास अनुकूल दुर्गाचे निर्माण करावे असा सोपा सल्ला कौटिल्य देतो. याचे उत्कृष्ट नमूने म्हणून छत्रपति शिवरायांनी बांधेलेल्या अनेक किल्ल्या कड़े बघता येते. सह्याद्रीच्या डोंगररांगेचा परिपूर्ण फायदा शिवरायांनी आपल्या युद्धकौशल्यासाठी करून घेतला होता. अनेक साम्राज्य या दुर्गांच्या मदतीने उभी राहिली, तर दुर्गांच्या पाड़ावाने अनेक राजसत्ता देखील लयाला गेल्याची अनेक उदाहरणे इतिहासाच्या पानांवर खुप ठिकाणी पहायला मिळतात इतके ह्या दुर्गांचे महत्व सगळ्याच कालखंडात होते.

ख़ानदेशचा विचार करता, खान्देशाच्या भौगोलिकरचनेमुळे काही मोजकेच दुर्ग-किल्ले हे गिरिदुर्ग प्रकारात मोडतात. त्यात ललिंग,भामेर, गाळना, कण्हेरगड़, चौगावचा किल्ला, राजदेहेर, खांडरागड हे मोक्याचा ठिकाणी बांधले गेलेले दिसतात.अमलनेर हा नगरकोट प्रकारतील किल्ला काळाच्या गतीत जवळ जवळ नष्ट झालेला असला तरी शहरात आजही बुरुज, प्रवेशद्वार आणि तटबंदीच्या भिंतीचे अवशेष पहायला मिळतात. चारही बाजूने खंदकाने सुरक्षित पारोला च भुईकोट हा दूर्गस्थापत्याचा उत्कृष्ट उदाहरण आहे. जळगाव जिल्हातील खांडरागड वर असलेल्या असंख्य गुहा सदृश रचना अजूनही कित्येक रहस्य आपल्यात लपवून आहे. किल्ले भामेरचे सन्दर्भ थेट महाभारत काळात सांगितले जातात. भिराम घाटचा पहारेकरी म्हणून चौगाव चा किल्ला बांधला गेला. मागील शेकडो वर्षांच्या कालखंडात खान्देशच्या गड, दुर्गांवर अभिर-गवळी राजे, सातवाहन , वाकाटक, यादव, निकुंभ, फारुकी, मोगल, मराठे, राजवटींच्या अस्तित्वांच्या खुणा आजही दिसतात. चला तर मित्र हो एक एक करून खान्देशातील ज्ञात आणि अपरिचित अश्या सगळ्याच किल्ल्यांच्या सफर वर निघुया.

प्रशांत वर्मा
टीम एक्सप्लोर खानदेश

Leave a Comment