यादव साम्राज्य | छत्रपती शिवाजी महाराजांपूर्वीचा मराठा साम्राज्य

कन्टेन्ट | गाजलेली ऐतिहासिक दत्तक प्रकरणे २ ३ ४ ५ ६ ७ | मौर्य सत्तेचा उदय | गड कसे पाहवे | संभाजी कावजी व कावजी कोंढाळकर

यादव साम्राज्य | छत्रपती शिवाजी महाराजांपूर्वीचा मराठा साम्राज्य –

जेव्हा जेव्हा आपण मराठा साम्राज्य बद्दल बोलतो तेव्हा आपल्या मनात सर्व प्रथम प्रतिमा येते ती छत्रपती शिवाजी महाराजांची. पण शिवाजी महाराजांच्या आधी देखील मराठा राज्य अस्तित्त्वात होते. हे आपल्याला माहित आहे का ? मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये आपल्या अजोड पराक्रमाने ४५० वर्षे महाराष्ट्राचे नाव झळकत ठेवणार्‍या कर्तबगार यादव साम्राज्यची नोंद महाराष्ट्रातील शैक्षणिक पुस्तकात कोठेही नाही. राजा भिल्लम, राजा सेउणचंद्र, राजा भिल्लम (पाचवा), राजा जैतुगी (द्वितीय), राजा सिंघणदेव (द्वितीय), राजा कृष्णदेव, राजा रामचंद्र अशा अनेक पराक्रमी यादवराजांची यशोगाथा आपल्या पिढीला माहितीच नाही.यादव साम्राज्य.

यादवांचे साम्राज्य (इ.स. ८५० – इ.स. १३३४) हे नर्मदा नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंत पसरले होते. म्हणजे आजचे महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि मध्यप्रदेशाच्या काही भाग. आपण औरंगाबाद मधिल दौलताबाद किल्ल्याबद्दल ऐकले असेलच पण आपल्याला माहित आहे का दौलताबाद किल्ल्याचे मूळ आणि खरे नाव देवगिरी किल्ला आहे आणि त्या काळात देवगिरी किल्ला हे आपल्या मराठ्यांच्या साम्राज्याची राजधानी होते.

यदाव साम्राज्यचे काही ठळक वैशिष्ट्य:

  • मराठी भाषेचा अधिकृत भाषा म्हणून वापर करणारे यादव हे पहिले राजवंश होते.
  • मराठी साहित्य यादव राजवटीत उदयास आले यादव राजांनी साहित्यिक भाषा म्हणून मराठीचा दर्जा वाढला.
  • संत कवी ज्ञानेश्वरांनी राजा रामचंद्रांच्या कारकीर्दीत भगवद्गीतेवर मराठी भाषेत ज्ञानेश्वरी लिहिले.
  • मुकुंदराजा यांनी यादव काळात मराठी भाषेच्या तत्वज्ञानावरील परमारामृत आणि विवेकसिंधू ग्रंथ लिहिले.
  • महिमाभट्ट यांनी या पंथाच्या संस्थापक चक्रधाराचे चरित्र लीलाचरिता लिहिली.
  • यादव राजांनी अनेक मंदिरे बांधली, हेमाडपंथी पद्धतीची बांधकाम हे यादव काळातील मानली जातात. असे आढळले आहे की यादव राजांनी पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरबांधकामसाठी प्रचंड देणगी दिली.
  • यादव राजवंशाचा शेवटचा चक्रवर्ती सम्राट रामदेवराय यांच्या काळातच मराठी भाषेला राजास्रय मिळाला.
  • संतशिरोमनी माऊलींना संरक्षण दिले.
  • छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाबाई यांचे माहेरचे नाव जाधव आणि त्या यादव वशंज आहेत असं मानल्या जात.

अल्लाउद्दिन खिलजीने रामदेवरायांना फितूरीने पराभुत केले व त्यांचे जावई व सेनापती चंद्रवंशी यादव हरपालदेव यांना जिवंत सोलून देवगीरीच्या प्रवेशद्वाराला टांगुन ठेवून क्रूर हत्या केली.

राजा रामचंद्रच्या उत्तराधिकारी राजा सिंहाना [III] खलजीच्या वर्चस्वाला आव्हान दिले, ज्याने मलगिरी काफूरला देवगिरी ताब्यात घेण्यासाठी पाठवले. त्यानंतरच्या लढाईत राजा सिहाना मारला गेला आणि खलजीच्या सैन्याने देवगिरी ताब्यात घेतली आणि खाल्जी सुलतानाने हे राज्य जोडले. बर्‍याच वर्षांनंतर दिल्ली सल्तनतच्या तुघलक राजघराण्यातील मुहम्मद तुघलक यांनी त्यानंतर या शहराचे नाव दौलताबाद ठेवले.

महाराष्ट्रात मंदिरे,बारव तसेच अनेक वास्तूकला ही देवगिरी यादव राजांची देनं आजही अनेक ठिकाणी व्यवस्थित तर काही ठिकाणी अवशेष रूपात पहावयास मिळते. आजही क्षत्रिय यादवराव, यादव, जाधव ही देवगिरी यादव घराणी कोंकण, कोल्हापूर, सातारा येथे आढळतात. परंतु ज्यांनी महाराष्ट्र घडविला त्यादेवगिरी यादव वंशजना आपण बर्‍याचदा उत्तर प्रदेश किंवा बिहार राज्यचे समजतो.

संदर्भ : “देवगिरीचे यादव”, इतिहास संशोधक महामहोपाध्याय डॉ. ब्रह्मानंद देशपांडे यांनी महाराष्ट्रातील पराक्रमी अशा यादव राजवंशावर लिहिलेला हा एक ऐतिहासिक ग्रंथ आहे. पराक्रमी यादवराजांची यशोगाथा या पुस्तकात वर्णिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here