महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,34,821

वाकाटक कोण होते?

By Discover Maharashtra Views: 1597 10 Min Read
विकिपीडिया

वाकाटक कोण होते?

अजिंठा येथील लेणी क्रमांक 16 च्या समोर एक शिलालेख कोरलेला आहे. त्यातील एका उल्लेखानुसार वाकाटकांना द्विज म्हटले आहे. तिथूनच वाकाटक हे ‘ब्राह्मण’ होते असा प्रवाद रूढ झाला. इतिहास अभ्यासक श्री मिराशी यांनी पहिल्यांदा आपल्या वाकाटकांवरील पुस्तकात वाकाटकांना ब्राह्मण म्हटले आहे. त्यानंतर महाराष्ट्र कोशकार श्री केतकर यांनी सुद्धा मिरासींची री ओढत वाकाटकांना ब्राह्मणच म्हटले आहे. आपल्याकडे एकदा एखादी गोष्ट रूढ झाली की पुढचे किताबी इतिहासकार फार खोलात न जाता पहिल्या ग्रंथ काराचीच री ओढतात. त्यामुळेच अनेक शतके वकाटकांना ब्राह्मण म्हटले गेले आहे. त्यासाठी या इतिहासकारांनी जो महान पुरावा समोर ठेवला आहे तो म्हणजे ‘वाकाटक हे सनातन धर्माचे अभिमानी असून त्यांनी सोमयाग,अश्वमेध व वाजपेय यज्ञ केले होते!'(वाकाटक कोण होते?)

ज्या प्रेरणेने व हेतूने सालवाहनांना ब्राह्मण ठरवण्यात आले, त्याच अगदी त्याच प्रेरणेने व हेतूने वाकाटकांनाही ब्राह्मण ठरविण्यात आले असावे असे वाटते. एखाद्या राजघराण्याच्या ऐतिहासिक सत्यतेबाबतची एवढी उदासीनता केवळ भारतात आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातच असू शकते.

वाकाटकांना समजून घेण्यापूर्वी आपण वाकाटकांसंबंधी, इतिहासाला ज्ञात असलेल्या गोष्टींची माहिती करून घेऊ.

वाकाटकांचा काळ इसवीसन 250 ते इस 500 असा  उणापुरा अडीच शतकांचा आहे. महाराष्ट्रातील विदर्भाचा भाग, सध्याचा तेलंगणा आणि आंध्रचा काही भाग, मध्य भारत व पूर्व भारताचा काही भाग एवढा भूप्रदेश वाकाटकांच्या साम्राज्यात मोडत असे. उत्तरेस नर्मदा नदी दक्षिणेस तुंगभद्रा नदी पूर्वेला बंगालचा उपसागर तर पश्चिमेस..कुठे गोदावरी, तर कुठे अरबी समुद्रापर्यंत यांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सत्ता होती. त्यांची पहिली राजधानी नगरधन होती असे मानले जाते. कोणी प्रवरपूर होती असंही मानतात. हे प्रवरपूर म्हणजेच आजचे वर्धा जिल्ह्यातील पवणार होय. त्यानंतरची वाकाटकांची राजधानी म्हणजे नागपूर जिल्ह्यातील रामटेक जवळचे नंदिवर्धन म्हणजे आजचे नगरधन. परंतु याबाबत अजून एकमत नाही. भंडारा जिल्ह्यातील पवनी, वाशीम म्हणजेच वत्सगुल्म, या सुद्धा वाकाटकांच्या विविध शाखांच्या राजधान्या म्हणून ओळखल्या जातात.

वाकाटक हे सुरुवातीला सालवाहनांचे मांडलिक म्हणून उदयास आले. सालवाहनांची सत्ता इसवीसन पूर्व 230 ते ईसवी सन  230 अशी होती. सन  २३० साली सालवाहन खिळखिळे होताच वाकाटकांनी आपले स्वातंत्र्य उद्घघोषित केले. वाकाटकांचा पहिला उल्लेख आंध्रातील अमरावती या ऐतिहासिक शहरातील एका शिलालेखात आढळतो. हा शिलालेख ईसवीसन 200 च्या सुमारास खोदलेला आहे. अमरावतीच्या बौद्ध स्तूपाजवळ एका अष्टकोनी स्तंभावर कोरलेल्या या शिलालेखात वाकाटक सामंताने केलेल्या दानाचा उल्लेख आहे. हा शिलालेख आज मितीस भग्नावस्थेत आहे. यात उल्लेख केलेला वाकाटक सामंत इसवीसन 200 मध्ये आंध्र प्रदेशातील अमरावतीस तीर्थ यात्रेनिमित्त गेला असावा असे दिसते.

वाकाटकांचा दुसरा उल्लेख अजिंठ्याच्या लेणी क्रमांक 16 बाहेरील कोरीव लेखात आहे हे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. वाकाटकांचा प्रथम पुरुष विंध्यशक्ती असून त्याचा कारभारी किंवा मंत्री वराहदेव याने हे लेणे खोदून घेतले असा त्यात उल्लेख आहे. या शिलालेखात वाकाटकांच्या उल्लेख द्विज असाही आहे. तिथूनच वाकाटक ब्राम्हण होते असा प्रवाद रूढ झाला असे वर म्हटले आहेच.

अभ्यासकांना वाकाटकांची अधिकची माहिती शिलालेखासोबतच ताम्रपटातून सुद्धा होते. त्यानंतरची दुय्यम साधने म्हणजे पुराणे. या पुराणातून व ताम्रपट आतून वाकाटकांचे गोत्र विष्णुवृद्धि आहे असे पहिल्यांदा मिरासी यांनी प्रतिपादन केले. विंध्यशक्ती नंतर त्याचा मुलगा प्रवरसेन पहिला राजा झाला. याचा उल्लेख पुराणात आहे. प्रवरसेनाने सोमयाग, वाजपेय यज्ञ केल्याचे दिसते. तो स्वतःला सम्राट ही पदवी लावून घेत असे. इसवीसन 270 ते 330 अशी सुमारे 60 वर्ष तो सत्तेवर होता. तो महान पराक्रमी होता. प्रवररपूर म्हणजेच आजचे पवनार येथे त्यांने राज्य स्थापन केले. त्याला चार पुत्र होते. सहाजिकच त्यांच्यात कलह होऊन साम्राज्याचे चार तुकडे पडले.

थोरला मुलगा नागपूर जवळील नंदिवर्धन म्हणजेच नगरधन येथुन राज्यकारभार करू लागला. दुसरा मुलगा वत्सगुल्म म्हणजेच वाशीम येथे स्थायिक झाला व तिथून राज्यकारभार करू लागला. तिसरा मुलगा भंडारा जिल्ह्यातील पवनी इथे व पाचवा दक्षिण महाराष्ट्रातील सातारा कोल्हापूर भागात गेला असे मानले जाते. ही सगळी मतमतांतरे आहेत. या सर्व शाखांपैकी केवळ नंदिवर्धन/नगरधन येथील  वत्सगुल्म/वाशीम येथील दोन शाखांचा इतिहास ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे.

पहिल्यांदा आपण केवळ नगरधन म्हणजेच नंदिवर्धन शाखेची माहिती घेऊया. या शाखेत होऊन गेलेल्या अनेक पराक्रमी राजापैकी पृथ्वीसेन एक होता. तो गुप्त सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्य याचा समकालीन होता. चंद्रगुप्त विक्रमादित्याची बहीण अथवा मुलगी, तिचे नाव प्रभावती गुप्त होते, ही पृथ्वीसेनाचा पुत्र रुद्रसेन पहिला यास दिली होती. हा रुद्रसेन अल्पायुषी ठरल्यानंतर त्याचा अल्पवयीन पुत्र  दिवाकरसेन हा गादीवर बसला. पण दिवाकरसेन सुद्धा फार काळ जिवंत राहू शकला नाही. त्यानंतर त्याचा छोटा भाऊ दामोदर गादीवर आला.

हे दोन्ही भाऊ लहान असताना त्यांच्या वतीने त्यांची आई प्रभावती गुप्त ही राज्य कारभार पाहत असे. तिला राज्यकारभारात मदत करण्यासाठी चंद्रगुप्त विक्रमादित्याने आपले एक कारभारी मंडळ पाठवून दिले होते. सुप्रसिद्ध संस्कृत कवी कालिदास हा सुद्धा या कारभारी मंडळापैकी एक होता. त्याने आपले सुप्रसिद्ध काव्य मेघदूत हे रामटेक येथील डोंगरावर रचले असावे असा वदतोव्यघात आहे.

हा दामोदरसेन म्हणजेच प्रवरसेन दुसरा.

नंदिवर्धन च्या प्रवरसेन दुसरा याने संस्कृतमध्ये सेतुबंध नावाचे काव्य लिहिले. त्यानंतर त्याचा मुलगा नरेंद्रसेन गादीवर आला. त्याची कारकीर्द इसवीसन 450 470 वीस वर्षे होती. याच काळात नगरधनची राजधानी पवनी येथे हलवण्यात आली.

राणी प्रभावती गुप्त हिने अनेक स्थापत्यांची निर्मिती करून घेतली. उपरोल्लेखित नांदेड जिल्ह्यातील शिऊर येथील पाषाण लेणे प्रभावती गुप्ता च्या काळात खोदण्यात आले असे सांगितले जाते.

आता आपण वाकाटकांची दुसरी महत्त्वाची शाखा जी वाशीम येथे स्थायिक झाली तिची माहिती घेऊ.

वाशिमचा उल्लेख अनेक संस्कृत शिलालेखात व ताम्रपटात वत्सगुल्म असा केलेला आढळतो. पण तत्कालीन प्राकृत ग्रंथांमधून वाशीम चे नाव वच्छामि असे लिहिलेले आढळते. अनेक बौद्ध साहित्यांतून वच्छामि असाच उल्लेख आहे. बौद्ध ग्रंथांना वास्तवाशी प्रामाणिक राहून लेखन करण्याची परंपरा आहे. वच्छामि किंवा वाशीम शाखेचा आद्य पुरुष सर्वसेन होय. हा सर्वसेन म्हणजेच नगरधन च्या पहिल्या प्रवरसेनाच्या चार पुत्रांपैकी दुसरा पुत्र. हा सर्वसेन संस्कृती, कला यांचा भोक्ता होता. यानेच हरिविजय ग्रंथ प्राकृत भाषेतून लिहिला. तसेच तत्कालीन प्राकृत सुभाषितांचे संकलन करून त्याचा ग्रंथ निर्माण केला. हे दोन्ही ग्रंथ प्राकृत मध्ये असल्याने साहित्यातील वच्छमि शैलीचा पाया रचला गेला. लोकांच्या बोली भाषेचा उपयोग ग्रंथ निर्मितीसाठी करण्याची शैली म्हणजेच वच्छमि शैली होय. तोपर्यंत संस्कृत काव्ये, नाटके, पुराने आदींची निर्मिती संस्कृत या भाषेतूनच होत असे.(वाकाटक कोण होते?)

या समजुतीला पहिल्यांदा वच्छमि शैलीने जोरदार धक्का दिला. पूर्वीचे सालवाहन असोत, की नंदिवर्धनचे वाकाटक घराणे असो, त्यांनी संस्कृतलाच पुरेपूर महत्त्व दिले होते.

त्यांच्या दरबारात असलेल्या गुणाढ्याची कथा तत्कालीन  राजदरबारात संस्कृत भाषेला अवाजवी महत्त्व कसे दिले जायचे याचे प्रातिनिधिक उदाहरण होईल.

ती कथा थोडक्यात अशी आहे…

गुणाढ्याला संस्कृत मुळीच कळायचं नाही असे म्हणतात. पण त्याची बायको संस्कृत भाषेत निपुण होती. एके दिवशी महालामध्ये स्नान करताना ती आपल्या पतीला संस्कृतमध्ये म्हणाली की,”मोदकस्ताडयम् माम्.”

म्हणजे तिला म्हणायचं होतं की, “माझ्यावर पाणी उडू नकोस.”

पण गुणाढ्याला संस्कृत कळलं नाही. त्याला वाटलं आपली पत्नी असं म्हणतेय की,” मला मोदक फेकून मारा.”

त्यावरून त्याने मोदक मागवले आणि सर्वांसमोर त्याची अशी फटफजिती झाली.

यानंतर गुणाढ्याने या अपमानाचा बदला घेण्यासाठी संस्कृतचा प्रचंड अभ्यास केला व साहित्याची निर्मिती केली. हा गुणाढ्य म्हणजे तोच ज्याने बृहत्कथा नावाचे काव्य जन्माला घातले. हाल सालवाहनाने संकलित केलेला गाथासप्तशती हा ग्रंथ तत्कालीन लोकभाषेतच आहे. पण हा नियमाला अपवाद असावा. बहुतेक ग्रंथ संस्कृत मध्येच लिहिले जात. या सगळ्याचा सारांश एवढाच इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून ते पाचव्या शतकापर्यंत जनसामान्यांची भाषा जरी प्राकृत मराठी असली तरी राजदरबारात मात्र नाहक संस्कृतचे स्तोम माजवले गेले होते.

केवळ प्रतिष्ठेपायी हे संस्कृतचे स्तोम माजले होते पण संस्कृती लोकांची भाषा नव्हती कोणीही कुठेही व्यवहारात संस्कृती उपयोग करीत असे एक केवळ ग्रांथिक भाषा एवढेच स्थान होते तरीही स्वच्छतेच्या म्हणजे वाशीमचे राजांनी मोठ्या प्रमाणावर प्रकारातला म्हणजेच मराठीला ग्रांथिक भाषेचा दर्जा दिला असला तरी स्वच्छतेच्या वाकाटकांचा मंत्री वराहदेव याने अजिंठा येथील लेणी क्रमांक सोळा समोर आणि इतरत्र जेसी ला रे करून घेतले ते सर्व संस्कृत संस्कृत मध्येच आहेत वाकाटकांचा राजा हरिसिंग संस्कृत ऐवजी प्रकृतीला महत्त्व देत असताना इकडे त्याचा ब्राह्मणमंत्री वराहदेव मात्र हळूच संस्कृत मध्ये आपले शिलालेख करून घेतो हा मोठा विरोधाभास आहे

हरीसेन या वच्छमिच्या राजा नंतर त्याचा मुलगा कर्तबगार नसल्याने लवकरच वनवासीच्या कदंब राजांनी वच्छमिवर आक्रमण केले व त्यांची सत्ता संपुष्टात आणली वच्छमिच्या वाकाटकांनी संस्कृतला गौण स्थान देऊन मराठीला वरचे स्थान दिले, या घटनेचे सबंध भारतभर अतिशय महत्त्व आहे. वाकाटकांपैकी बहुतेक राजांची बौद्ध धर्माकडे सहानुभूती होती. प्राकृत/मरहठ्ठी व बौद्ध धम्माची जवळीक या दोन गोष्टींमुळे वाकाटक बदनाम केले गेले. त्यातून दोन मतप्रवाह निर्माण झाले. पहिला प्रवाह वाकाटकांना महत्त्व न देता अनुल्लेखाने मारणाऱ्यांचा आणि दुसरा प्रवाह वाकाटकांचा खरा इतिहास पुसून टाकून ते ब्राह्मण होते व  सनातन धर्माचे कट्टर अभिमानी होते असा प्रवाद प्रसृत करणाऱ्यांचा. अर्थात या दोन्ही प्रकारच्या प्रवाहाने वाकाटकांचे ऐतिहासिक महत्त्व मलिन केले. अजिंठा येथील अनेक लेण्यांचे खोदकाम वाकाटकांच्या उदाराश्रयातून पार पडले हे सर्वज्ञात आहेच. बुद्धांचा जन्म, महाभिनिष्क्रमण व महापरिनिर्वाण या विषयांवरची अनेक चित्रे या लेण्यांतून चितारलेली आढळतात. वाकाटकांच्या देणग्यांचा उल्लेख करणारे शिलालेख अजिंठा येथे असले तरी ते आज सुव्यवस्थित नाहीत.त्यातील अनेक अक्षरे पुसल्या गेलीत.(वाकाटक कोण होते?)

पुढील भाग – वाकाटक ब्राह्मण होते का? वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

संजय देशमुख कामनगावकर

Leave a comment