महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,76,868

खानदेशचा पुर्व मध्यकाळ आणि व्यवस्था

By Discover Maharashtra Views: 2461 5 Min Read

खानदेशचा पुर्व मध्यकाळ आणि व्यवस्था –

अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणाच्या आधी महाराष्ट्रात देवगिरीच्या यादव कुलांचे राज्य होते. त्यामुळे फारुखीच्या काळात पूर्वी खानदेशात कुठली राज्यव्यवस्था होती? किंवा कशी व्यवस्था होती? हे जाणून घेण्यासाठी यादव काळाचा इतिहास जाणून घेणे जरुरी आहे. देवगिरीचे यादव हे सेऊणदेशकर म्हणून ओळखले जातात.  अथवा खान्देश या प्रदेशात उदय पावले, तत्कालीन इतिहास समजून घेण्यासाठी मंदिरांवर लिहिलेले शिलालेख, तसेच दानलेख, शिलाताम्रशासने हेच प्रमुख साधन आहे. वाड्मयीन साहित्यात तसेच रामचंद्र या  यादवांच्या मुख्य अधिकाऱ्यांनी लिहिलेले ,”चातुर्वर्ण चिंतामणी” सारखे ग्रंथ किंवा चक्रधर स्वामींचे लीळाचरित्र ग्रंथ, तत्कालिन व्यवस्था समजायला मदत करतात. अर्थात यादवांची शीलाताम्रप्रशासने खानदेशात सापडावी हे ओघानेच आले. यादव नृपती सेऊनचंद्र तृतीय याचा एक शिलालेख नाशिक जवळ अंजनेरी या गावी जैन तीर्थंकर श्री चंद्रप्रभू यांचे मंदिरावर कोरलेला आहे.(खानदेशचा पुर्व मध्यकाळ आणि व्यवस्था)

तसेच जैन धर्मात तिर्थे व पवित्र स्थळे यांची माहिती सांगणाऱ्या ग्रंथात जिनप्रभ सुरी यांचा विविध तीर्थकल्प या ग्रंथाचे महत्त्वाचे स्थान आहे. या ग्रंथाचा नाशिक कल्प हा  भाग नासिक बद्दल माहिती सांगणारा आहे. यात नाशिकजवळील अंजनेरी श्री चंद्रप्रभू तीर्थंकरांची स्थान महात्म्य सांगताना जीन प्रभू लिहितात की, दुर्वास ऋषींनी द्वारावती जाळल्यानंतर वज्र कुमार नावाचा यादव क्षत्रियांची गर्भवती श्री जैन तीर्थंकर, श्री चंद्र प्रभू यांच्याकडे आली आणि तिला त्यांनी आश्रय दिला व पुढे तिला पुत्र झाला, त्याचे नाव दृढप्रहार ठेवण्यात आले. पुढे तो मोठा सामर्थ्याने युद्धात पराक्रम गाजवला आणि नगररक्षक झाला.  आणि कीर्ती मिळवली, एकदा दृढप्रहाराने चोरांची झुंजून काही गायी परत आणल्या, तेव्हा त्यांच्या पराक्रमावर खुश होऊन त्याला  नगर रक्षकपद म्हणजे  कोतवाल हे पद  मिळाले. त्या नगरात यादव वंशाचे बीज रोवले गेले. पुढे  तो राजा झाला आणि त्याने चंद्र पभू स्वामींचे मंदिर  बांधले.  ही जरी कथा म्हणून लिहिलेली असली तरी बरेच अवशेष सापडतात. त्यामुळे पहिला संस्थापक राजा  दृढप्रहार ज्ञात राजा होता हे कळते. पुढे अभिलेखातून आणि शीलाताम्रशासनातून संदर्भ प्राप्त होतात. तसेच दुसरा ग्रंथ म्हणजे हेमाद्री पंडित यांचा “राज प्रशस्ती” हा होय. तेव्हा संस्कृत भाषेचा मोठा विद्वान पंडित व भागवत धर्माचा पुरस्कर्ता होता.  बोपदेव यांनी “मुक्ताफळ” हा भागवता वरील ग्रंथ तसेच “मुग्धबोध” हा व्याकरणावरील  ग्रंथ लिहिला आहे.

याशिवाय यादव राज्याचा शेवट दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दिन खिलजी यांच्या आक्रमणामुळे झाला आणि यादव सत्तेने इस्लामी आक्रमणाविरुद्ध जी प्राणपणाने झुंज दिली, त्याबद्दलचे उल्लेख फारसी साधने ग्रंथात सापडतात. त्यात १.अमीर खुसरो यांचा तारीख ई अताई, आशिक किंवा  दावलखानी व  खिज्रखान नूह -सिपर २. तारिख इ फिरोजशाही

३ इसामी फूतूह सलातीन ४ महंमद कासीम तारिख ए फेरिश्ता

हे फार्शी साहित्य तर जल्हणाची  “सूक्ती मुक्तावली” आणि “चंदबरदाईचा पृथ्वीराज रासो” या ग्रंथांचा उपयोग होतो. डॉ. रा. गो. भांडारकर यांच्या “अर्ली हिस्टरी ऑफ डेक्कन” या ग्रंथाचा ही उपयोग होतो तर डॉक्टर गुलाम याझदानी  यांनी संपादित केलेला “अर्ली हिस्टरी ऑफ डेक्कन” हा ग्रंथही उपयुक्त आहे. त्यातील यादव इतिहासाबद्दलचा भाग डॉ. अनंत सदाशिव आळतेकर यांनी लिहिलेला आहे.

यादवांचा प्रारंभिक आणि पौराणिक इतिहास  बघता इसवीसनाच्या सातव्या शतकात हर्षवर्धनाचे विशाल साम्राज्याचा अस्त झाला. लागोपाठ भारतावर इस्लामी आक्रमणे सुरू झाली. परिणामतः भारतावर कोणतीही एक अधिसत्ता संपूर्ण साम्राज्य स्थापन करू शकली नाही. या धामधुमीत अनेक राजघराणी उदयास आली. यात परमार, चाहमान, कलचुरी, चालुक्य इत्यादी अनेक जणांनी या संधीचा फायदा घेत

आपल्या राज्याच्या सीमा वाढवण्याचा प्रयत्न केला. मध्ययुगीन भारताचा इतिहास हा या राजघराण्याच्या आपसातील युद्धाने भरलेला आहे. देवगिरीचे यादव या नियमाला अपवाद नाही, तेही स्वतःला सोमवंशी म्हणवून घेतात. त्यांच्या शीला ताम्रशासनांतून इंदू किंवा सोम याची काव्यमय वर्णन वारंवार येतात.

राष्ट्रकूट सम्राट अमोघवर्ष प्रथम ह्याचे हाताखाली दक्षिणेत शासन करणारा अधिकारी स्वतःला यादव अशी म्हणतो. तसेच राष्ट्रकूट सम्राट कृष्ण द्वितीय याचा महा सामंत असलेला व कोगाली येथे राज्य करणाऱ्या एका अधिकाऱ्याने ही अशाच पदव्या घेतले आहेत. राष्ट्रकूट सम्राट अकाल वर्ष कृष्ण तृतीय ह्याचे हाताखाली ही एक यादववंशीय महा सामंत असलेला दिसतो. यादव नारायण हे बिरुद धारण करणाऱ्या नागवर्मा नावाच्या सामंत यांचा एक लेख विजापूर जिल्ह्यात मिळाला आहे. आणि तो चालुक्य राजा ह्याचा महासामंत म्हणतो आहे, यावरून देवगिरीकर यादव घराण्याचा संबंध दक्षिणेकडील होता किंवा काय हे समजू शकते.

यादव राजघराण्यातने आपल्या कर्तुत्वाचा प्रारंभ मान्यखेडच्या राष्ट्रकूटांचे व नंतर कल्याणी चालुक्यांचे मांडलिक म्हणून केला. या दोन्ही राजकुमारांच्या शासनाचा खाली कर्नाटकचा बराच भाग होता पण उत्तरेला त्यांच्या राज्याच्या सीमा विदर्भाचे उत्तर भागापर्यंत होत्या. तसेच त्यापैकी यादव हे नाशिक, नगर व औरंगाबाद या जिल्ह्यांचे परिसरातील भागांचा व्यवहार पहात असत. राष्ट्रकूट आणि चालुक्य कुलांचा कर्नाटकात अशी घनिष्ठ संबंध होता. यादवही कर्नाटकी असल्याचा समज रूढ झाला. या संदर्भात ब्रम्हानंद श्रीकृष्ण देशपांडे यांचे देवगिरीचे यादव हे पुस्तक महत्वाचे आहे.

Suresh Suryawansh 

Leave a comment