ढवळगड | Dhavalgad Fort

ढवळगड | Dhavalgad Fort

ढवळगड गडावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. पुणे सोलापूर महामार्गाने गेल्यास उरुळी कांचन मधून आतल्या बाजूला नऊ किमी गेलं की कोल्हापूर रेल्वे मार्ग लागतो अन आंबळे गाव लागतं त्या गावातून गडावर पायवाट जाते. दुसरं म्हणजे सासवड रोड ने गेल्यास काळेवाडी मधून आतल्या बाजूला जाऊन दोन चार गावे मागे टाकली कि आंबळे गावात पोहोचतं. गाव तसं छोटंसं, गावात स्वराज्यातील सरलष्कर प्रमुख दरेकर यांचा भला मोठा वाडा आहे आणि बरेच लहान मोठे वाडे आहेत. आंबळे गावातून गेल्यास गाडी गडावर जाते. गडावर प्रवेश केल्यास प्रथमतः
१)चुन्याचा घाना दिसतो.
२)पवनसुत हनुमान मूर्तीचे अखंड दोन्ही बाजूंनी शिल्प दिसते.
३)गणपती बाप्पा मंदिर आहे.
४) समोरच बुरुज व भग्नावस्थेत असणारा दरवाजा आहे.
५)तटबंदी व पाण्याच्या टाक्या आहेत.
६)धवळेश्वर महादेवाचे सुंदर मंदिर आहे.
असा हा गडाचा परिसर दिसतो. गडाच्या चारही बाजूंनी गावं वसलेली आहेत. माझ्या अंदाजानुसार भुलेश्वर पर्वत रांगेतील शेवटच्या टेकडीवर वसलेला हा गड टेहाळणीच्या कामी येत असावा. आसपासच्या पंधरा किलोमीटर अंतरावरील प्रदेश गडावरून दिसतो.
आपला सह्याद्री आहेच खास, त्यात असे अनेक गडकिल्ले गुपित आहेत. नक्की जाऊन पहा.

छत्रपती युवा प्रतिष्ठाण.
दुर्गसंवर्धन- महाराष्ट्र राज्य.
कु.खंडू सपाटे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here