उपक्रमा विषयी

गडकिल्ले संवर्धन काळाची गरज

महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या नसनसातून ज्याचं नाव उच्चारल्याबरोबर वीरश्रीचा संचार होतो.gad kille.अंगामध्ये रोमरोम शहारून जातो,तेव्हा अभिमानाने शब्द बाहेर पडतात…

”हा देश नवरत्नांची खाण,इथेच झटले शिवरायंचे प्राण,सह्याद्रीच्या शिखरावरती फडके भगवे निशाण.”

परंतु मनात शंका यायला लागते स्वाभिमान असणारे हे स्वराज्याचे निशाण काळाच्या ओघात नष्ट तर नाहीत ना होणार ?

कारण मुस्लीम राजवटींच्या आक्रमणापासून महाराष्ट्रातील जनतेच ज्या गड किल्ल्यांनी संरक्षण केलं,छत्रपती शिवरायांचे स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवले,स्वराज्याचा कारभार ज्या गडकिल्ल्यावरून चालला त्या गडकिल्ल्यांची अवस्था बघितली तर मन तिळतीळ तुटत.

वाढलेले गवत, काटेरी झुडूप,पडलेल्या भिंती,ढासळत असलेले बुरुज , छपर उडालेली मंदिर,दुर्गंधी सुटलेली तलावातील पाणी,अक्षरशः कचराकुंडी झालेले किल्ले.

हा आहे आपल्या शिवरायांचा वारसा ? हेच दाखवणार आहोत का आपण पुढच्या पिढीला ?

महाराष्ट्राचा बहुतांश इतिहास पुस्तकामध्येच दिसून येतो.आपल्या राजाचा बहुतांश  इतिहास आज आपल्या डोळ्यासमोर उभा आहे .तो इतिहास जपण्यासाठी आज अनेक हात झटत आहेत.गरज आहे त्यांच्या हाताला हात लावायची.कारण नव्या पिढीसाठी फक्त स्वाभिमान ,अभिमान याच गोष्टी नाही ठेवायच्या .त्या काय पुस्तकात पण राहू शकतात.परंतु बांधकाम शास्त्राचे उत्कृष्ट नमुना असणारे किल्ले,शत्रूसाठी उभारलेल्या चकव्या वाटा,पाणी डोंगर अशा अवघड ठिकाणी बांधलेल्या किल्ल्यांतून छत्रपती शिवरायांची दिसणारी दूरदृष्टी , मावळ्यांची ताकत,राज्यकारभाराची किल्ल्यावर केलेली व्यवस्था या सर्व गोष्टी नवीन पिढीनी याची देही याचे डोळा पहाव्यात यासाठी गडकिल्ले संवर्धनचा अट्टाहास.

Discover Maharashtra

महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close