महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,91,290

राजा छत्रपती राजाराम

By Discover Maharashtra Views: 4011 4 Min Read

पराक्रमी राजा छत्रपती राजाराम –

छत्रपती राजाराम यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1670 रोजी छत्रपती शिवरायांच्या द्वितीय पत्नी सोयराबाई यांच्या पोटी झाला.राजारामचे लग्न सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी जानकीबाईंशी १५ मार्च १६८० रोजी झाले होते. जानकीबाईच्या नंतर राजा छत्रपती राजाराम यांचे लग्न सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या ताराबाई व कोल्हापूरच्या कागलकर घाटगे यांची कन्या राजसबाई यांच्याशी झाले.याशिवाय राजाराम यांना अंबिकाबाई ही आणखी एक पत्नी होती.छत्रपती संभाजीराजेंना मोघलांनी पकडल्यामुळे रायगडावर मातोश्री येसुबाईंनी यांच्या नेतृत्वाखाली १६८९ रोजी राजा छत्रपती राजाराम यांचे मंचकारोहन झाले.

२५ मार्च १६८९ रोजी मोघलांनी रायगडांस वेढा घातला.याप्रसंगी महाराणी येसुबाई यांनी राजाराम यांना रायगडावरून निसटून जाण्याचा सल्ला दिला.जानकीबाई रायगडावर महाराणी येसुबाई व बाळ शाहू सोबत राहिल्या तर ताराबाई, राजसबाई, अंबिकाबाई या पत्नी व प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ आदि सेनानीसह राजाराम यांनी रायगड सोडून जिंजीकडे प्रस्थान केले.वाटेत विशाळगडावर ताराबाई,राजसबाई आदिना पाठीमागे ठेवून ते जिंजीला पोहचले.

महाराष्ट्रात राजारामांनी आपल्या गैरहजेरीत धनाजी जाधव, संताजी घोरपडे, परशराम त्रिंबक, शंकराजी नारायण यांच्याकडे सुत्रे सोपविली होती.धनाजी जाधव, संताजी घोरपडे यांनी आपल्या गनिमी काव्यांनी व वेगवान हालचालींने मोघलांना वेठीस आणले होते.तर तिकडे जिंजीला राजाराम यांचा मोघलांशी संघर्ष चालू होता.मोघलांना एकाच वेळी दोन ठिकाणी लढावे लागत होते.

सन १६९० साली मोघल सरदार जुल्फिकारखानाने जिंजीला वेढा दिला.हा वेढा सात वर्ष चालला होता.वेढा घातलेल्या मोघलांच्या सैन्यावर हल्ले करून धनाजी जाधव,संताजी घोरपडे यांनी त्यांना वेठीस आणले होते.अखेरीस १६९७ साली जिंजी मोघलांच्या ताब्यात पडला पण तत्पुर्वी राजाराम जिंजीहून निसटूनमहाराष्ट्रात परतले होते.

राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीत मोगली सैन्याला मराठा सरदार एकाच वेळेस वेगवेगळ्या दोन ठिकाणी मोगलांशी लढत होते. विशेषत धनाजी व संताजी याची नावे जरी ऐकली तरी मोगली सैन्याला थरकाप सुटत असे. दक्षिणेत मोगलांनी दाणादाण उडवली पण संताजी घोरपडे मृत्यूनंतर जिंजिचा पाडाव झाला.

महाराष्ट्रात आल्यानंतर राजाराम यांनी १६९८ साली धनाजी जाधव,परसोजी भोसले आणि खंडेराव दाभाडे यांना घेऊन खानदेशची मोहिम आखली.या मोहिमेतच त्यांची तब्येत बिघडली. मोहिमेतून त्यांना सिंहगड किल्लावर नेण्यात आले तेथेच त्यांचे निधन झाले.छत्रपती राजाराम पराक्रमी,मुत्सद्दी होते.चांगल्या माणसांची त्यांना पारख होती.राजाराम यांना ताराबाईपासून शिवाजी तर राजसबाई पासून संभाजी हे दोन पुत्र झाले होते. राजाराम महाराज यांच्या मृत्यूनंतर ताराराणी साहेबांनी स्वराज्य रक्षणाची सुञे हाती घेतली. ताराराणी साहेबांनी आपले पुञ शिवाजी महाराज यांना गादिवर बसवून राज्यकारभार चालविला .

1707 पर्यत  औरंगजेबाच्या कैदेत असलेले छञपती संभाजी महाराज यांचे कुटूंब महाराणी येसुबाई पुञ शाहू यातील औरंगजेब मृत्यूनंतर शाहूंची सुटका करण्यात आली. शाहू महाराज महाराष्ट्रात आल्यावर गादिसाठी ताराराणी व शाहू यांच्यात वाद निर्माण झाले सेनापती धनाजी जाधवांमुळे शाहूंना आधार मिळाला आणि शाहू छञपती यांनी 12 जानेवारी 1708 ला अभिषिक्त छञपती बनले.

शाहू महाराज आणि मातोश्री येसुबाईंना सोडविण्यासाठी राजाराम महाराज यांनी खुपच प्रयत्न केले पण या युद्धभूमीवर राजाराम महाराज यांना स्थिरता नसल्यामुळे     औरंगजेबाच्या सतत आक्रमणामुळे तब्बियत बिघडून सिंहगडी मृत्यू पावले. शाहूंना सोडवण्यासाठी बंकाजी गायकवाड जोत्याजी केस कर यांच्या सारखे गुप्तहेर खाते ही स्थापले होते. पण राजाराम महाराज यांच्या मृत्यूनंतर येसुबाईंनी सुटकेची आस सोडली होती.

शाहू महाराज यांच्या सुटकेनंतर येसुबाईंना सोडविण्यासाठी शाहू छञपती यांनी दिल्लीवर एक मोहीम आखली त्यात खंडेराव दाभाडे सरसेनापती पदावर होती आणि हि मोहीम दाभाडेंच्या नेतृत्वाखाली 1718_19 ला दिल्लीवर धडकली . दिल्लीपतीस येसुबाईंना व रायगडावरील संपूर्ण कैद झालेल्या कुटूंबीयांना सोडण्यात आले.

सातारा गादी छञपती संभाजी महाराज यांच्या मुलाने स्थापन केली तर कोल्हापूर गादि ताराराणी यांनी स्थापली राजाराम महाराज यांचे पुञ शिवाजी महाराज नंतर राजसाबाईसाहेबांचा मुलगा संभाजी महाराज हे कोल्हापूर गादिवर आले. पुढे या दोन गाद्यांमध्ये 1730_31 साली वारणेचा तह झाला व या दोन थोरल्या महाराज यांच्या गाद्या एकञ आल्या.

छञपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर ही स्वराज्य रक्षणार्थ राजा छत्रपती राजाराम महाराज यांचे योगदान अव्दितीय होय.

गडप्रेमी बाळासाहेब पवार.

फोटो स्वराज्य तिसरी राजधानी जिंजी.

Aniket Wagh यांच्या वाॅलवरून फोटो…

Leave a Comment