श्री त्रिगुणेश्वर मांदार गणपती, पुणे | Triguneshwar Mandar Ganapati

श्री त्रिगुणेश्वर मांदार गणपती, पुणे | Triguneshwar Mandar Ganapati

श्री त्रिगुणेश्वर मांदार गणपती –

ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरासमोर १४४/१४५, कसबा पेठ, त्रिगुणेश्वर सहकारी गृहरचना संस्था मर्यादित या इमारतीच्या पार्किंगमध्ये एक १०० – १२५ वर्ष जुनी वैशिष्ठ्यपूर्ण अशी गणपतीची मूर्ती आहे. ती श्री त्रिगुणेश्वर मांदार गणपती या नावाने ओळखली जाते.(त्रिगुणेश्वर मांदार गणपती, पुणे – Triguneshwar Mandar Ganapati)

पुराणात एक गोष्ट आहे;  मांदार नावाचा धौम्यपुत्र होता. त्याची पत्नी शमिका. या दोघांना भ्रशुंडी ऋषींनी शाप दिल्यामुळे त्यांचे मांदार व शमी या वृक्षांमध्ये रूपांतर झाले. मांदार व शमिकासाठी, शमिकाच्या वडिलांनी गणेशाची १२ वर्षे तपश्चर्या केली. तेव्हा गणपती प्रसन्न होऊन त्याने मी मांदारच्या वृक्षाखाली निश्चल राहीन आणि शमीच्या पूजनाने संतुष्ट होईल. असा आशीर्वाद दिला. त्यामुळेच मांदार वृक्ष आणि शमीच्या वृक्षाला फार महत्त्व आहे. मांदाराच्या झाडातून २१ वर्षांनी गजाननाची स्वयंभू मूर्ती बाहेर पडते, असे मानले जाते. अशीच एक मूर्ती १००-१२५  वर्षांपासून कसबा पेठेत आहे.

कै. नारायण गोविंद ढेरे, त्यांच्या वाड्यात दरवर्षी श्रावणात मांदार वृक्षाखाली अनुष्ठान करीत. इ.स. १९१७ च्या सुमारास ह.भ.प. इस्लामपूरकरबुवा कीर्तन करत असताना त्यांना दृष्टान्त झाला की, कसबा गणपती नजीकच्या वाड्यात मांदार वृक्षात ‘मी’ आहे. त्यानुसार गणेशभक्त बुवा चौकशी करत ढेरे वाड्यात आले आणि मांदार वृक्ष उन्मळून पडला व ही मूर्ती बाहेर आली. ही मूर्ती २ फूट उंचीची, चतुर्भुज, उभे गुडघे, दोन हात गुडघ्यावर स्थिरावलेले तर दोन हात खांद्यावर आहेत. मूर्तीची सोंड लंबाकृती आहे. मांडीवर उपरणे आहे. शिरस्त्राण नाही.

संदर्भ:
पुणे शहरातील मंदिरे – डॉ. शां. ग. महाजन
फोटो ४ – साकेत देव

पत्ता : https://goo.gl/maps/J13xDV64ySXvPxk3A

आठवणी इतिहासाच्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here