महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

भांग्या मारुती मंदिर | Bhangya Maruti Temple, Pune

By Discover Maharashtra Views: 2369 2 Min Read

भांग्या मारुती मंदिर | Bhangya Maruti Temple, Pune –

पुणे या नावाला एक वेगळाच वलय आहे. पेशवाईच्या काळात पुणे हे एक महत्वाचे सत्ता केंद्र होते. असे असले तरी पुण्याला स्वतःचा एक इतिहास आहे. पुणे विविध कालखंडात विविध नावांनी ओळखले जायचे. जुन्या कागदपत्रांमध्ये पुण्यविषय, पुणकविषय असे उल्लेख येतात. नंतरच्या काळात पुण्याला पेन्शनरांचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले. तसेच पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणूनही प्रसिद्ध आहे. परंतु इ.स. १८१० सालच्या पुण्यातल्या देवदेवतांची आणि त्यांच्या देवळांची संख्या बघितली, तर पुणे शहराला देवळांचे शहर म्हणूनही ओळखायला हरकत नाही. यातील काही मंदिरांची नावे फार चित्र-विचित्र आहेत. तत्कालिन परिस्थतीनुसार, तिथं घडलेल्या घटनांनुसार येथील मंदिरांना अशी नावे देण्यात आली आहे. असेच एक वेगळे नाव असलेले मंदिर ६१७, बुधवार पेठ, छ. शिवाजी महाराज रस्ता इथे आहे. नाना वाड्यावरून हुतात्मा चौकाकडे जाताना रस्त्याच्या उजव्या बाजूला दुकानांच्या गर्दीत एक पुरातन मंदिर लपलेले आहे. गर्द केशरी रंगाच्या कोरीव नक्षीकाम केलेया दरवाजाच्या चौकटीमुळे ते पटकन लक्षात येते. हे भांग्या मारुती मंदिर.

मंदिर छोटेखानी आहे. मंदिर स्थापनेचा नक्की कालावधी उपलब्ध नाही. मंदिरामध्ये शेंदूरचर्चित मारुतीची मूर्ती आहे. शेंदुराची असंख्य पुटे चढवल्यामुळे मूळ मूर्तीचा अंदाज येत नाही. या मूर्तीच्या पायाशी द्रोणागिरी पर्वत उचलणाऱ्या मारुतीची छोटी शेंदूरचर्चित मूर्ती आहे. या मंदिर परिसरात पूर्वी भांग विकली जायची. म्हणून येथील मारुतीला भांग्या मारुती म्हणतात. सदर मंदिर पुणे म्युनिसीपल कॉर्पोरेशन हेरीटेज लिस्टच्या ग्रेड III मध्ये समाविष्ट आहे.

पत्ता : https://maps.app.goo.gl/kFrHsAZKRuFJYULS8

आठवणी इतिहासाच्या

Leave a comment