महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,20,130

छत्रपती शिवाजी महाराजांची पहीली लढाई आणि २१ रांजणाचे धन

By Discover Maharashtra Views: 4472 4 Min Read

छत्रपती शिवाजी महाराजांची पहीली लढाई आणि २१ रांजणाचे धन – तोरणा किल्ला

छत्रपती शिवाजी महाराज बाल वयात असताना त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू केले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांना बाल वयात लाभलेले बारा मावळातील बाल सवंगडी यांची मोट बांधून त्यांनी जिवाभावाचे मावळे तयार केले होते. त्यांच्या बरोबर बाल वयात असताना शिवाजी महाराज खेळताना बागडताना लुटूपुटूची लढाई सुद्धा खेळायचे. आणि त्यावेळी सुद्धा ते आणि मावळे एकत्र येऊन दगड मातीच्या किल्ल्याच्या प्रतिकृती तयार करत असे. एकत्र गडकोट किल्ले आणि डोंगर चढाई करत असे .

बारा मावळातील मावळे हे शिवाजी महाराजांचे जिवलग मित्र झाले होते. हिंदवी स्वराज्याच्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साठी प्रसंगी प्राणाची आहुती देण्यास तयार असायचे….
याच मावळ्यांच्यात तानाजी मालुसरे हे देखील होते..स्वराज्य निर्माण – स्वराज्य निर्माण करण्यासाठी इ. स. १६४७ मध्ये शिवाजी महाराजांनी प्रत्यक्षात सुरुवात केली होती.

त्यासाठी प्रचंडगड निवडला होता. स्वराज्याचे तोरण बांधायचे तर याच प्रचंडगडावर असा ठाम निश्चयाने शिवाजी महाराज आणि त्यांचे बाल मावळे घेऊन प्रचंडगडावर हल्ला चढविला होता. आणि ह्या बाल पण नव्या दमाच्या मावळ्यांनी पहिल्या हल्ल्यातच गड जिंकला होता. अशा प्रकारे पहिलीच लढाई यशस्वी करून पहिल्याच प्रयत्नात किल्ला घेऊन हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याला तोरणा हे नाव ठेवण्यात आले.
किल्ला ताब्यात आल्यावर शिवाजी महाराजांनी स्वतःच गडाची पाहणी केली गड चौफेर पाहून घेतला. गडाचा पूर्व ते पश्चिम आणि भुलेश्वर पर्वत रांग जो राजगडाचा मार्ग आहे. असा प्रचंड विस्तार पाहून ह्या गडाला ‘प्रचंडगड’ असे नाव ठेवले. गडावर मेंगाई देवीचे प्राचीन मंदिर आहे. शिवाय गडांवर पिण्याच्या आणि वापराच्या पाण्याची अनेक टाकी आहेत.

हा किल्ला जिंकल्यावर गडाची तपासणी करण्यात आली होती. काही ठिकाणी पडझड झालेली होती. शिवाजी महाराजांनी गडावर अनेक इमारती बांधून घेतल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्र्याहून सुटका झाल्यावर त्यांनी अनेक गडकोट किल्यांचा जिर्णोद्धार केला होता. त्यामध्ये तोरणा किल्यावर ५ हजार होणं खर्च केला होता.

भगत दरवाज्याच्या वरच्या बाजूला आणि दारुखान्या समोर देवीचे गंगाजाई मंदिर आहे. याच मंदिराजवळ नरवीर तानाजी मालुसरे गडावर असताना द्रव्यांचे २१ रांजण सापडले. त्यामध्ये सोने, चांदी, हिरे, माणिक मोती यांचा विपुल खजिनाच हाती आला आणि स्वराज्याची तिजोरी ओसंडून वाहू लागली. याच धनाचा उपयोग राजगडाच्या बांधणीसाठी उपयोग केला.

सदरचा प्रचंडगड किल्ला कोणी आणि कधी कोणाच्या मार्फत बांधला आहे. यासंदर्भात ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत.याठिकाणी असणाऱ्या मंदिर आणि लेण्यांच्या उपलब्धी वरून आणि अवशेषांवरून हा किल्ला शैवपंथाचा आश्रम असावा. इ.स. १४७० ते१४८६ दरम्यान हा बहामनी राजवटीसाठी मलिक अहमद याने किल्ला जिंकला होता. पुढे जा किल्ला निजामशाहीत अनेक वर्षे होता.
धर्मवीर संभाजीराजे यांची हत्या झाल्यावर संभाजी हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. सचिव शंकराजी नारायण यांनी मोगलांच्या बरोबर लढाई करून गाद पुन्हा मराठयांच्या ताब्यात आणला. हा राग मनात धरून औरंगजेबाने गडाला वेढा घातला आणि मराठे आणि मोगलांच्यात घनघोर युद्ध झाले. त्यात मराठयांच्या हार झाली आणि गड औरंगजेबाच्या ताब्यात गेला.

पण याचे एकच दुर्भाग्य स्वराज्यातील एकमेव किल्ला जो औरंगजेबाला लढाई करून जिंकता आला होता.

मग औरंजेबाने गडाचे नामकरण करून फूतुल्गैब हे नाव दिले कारण फुतुउ म्हणजे दैवी विजय असा अर्थ होतो. पुढे मिर्झाराजे जयसिंग यांच्याबरोबर पुरंदरचा तह झाला त्यात तोरणा हा किल्ला समाविष्ट केला नव्हता.

गप्प बसतील ते मराठे कसले मग पुन्हा चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर माणसे चढवून हल्ला केला आणि गड पुन्हा एकदा मराठयांच्या अधिपत्याखाली आला. आणि मग तोरणा किल्ला कायम स्वरूपात हिंदवी स्वराज्यातच राहिला.
Leave a comment