महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,91,374

कोल्हापूर राजघराण्याचे श्री गणराया आणि सुंदर चित्रे

By Discover Maharashtra Views: 1326 3 Min Read

कोल्हापूर राजघराण्याचे श्री गणराया आणि सुंदर चित्रे –

कोल्हापूर राजघराण्यात मानाचे चार गणपती विराजमान होतात त्यापैकी दौलतीचे श्री गणपती म्हणजे जुना राजवाड्यातील दौलतखान्यातील गणपती. राजवाड्यातील दौलतखान्यात हे गणपती विराजमान करण्याची परंपरा आहे ती आजतागायत सुरू आहे त्यांचे आज दर्शन घेतले. दौलत खान्यातील कचेरीत ह्या गणपतींची प्रतिष्ठापना दरवर्षी होते त्याबरोबर गौरीची स्थापना केली जाते.

कोल्हापूर राजघराण्याचे श्री गणराया आणि सुंदर चित्रे

पूर्वीच्या काळी याठिकाणी संस्थानचा खजाना होता त्याची कचेरी होती. माझ्या माहितीप्रमाणे १९व्या शतकापर्यंत येथे खजाना होता. येथे दोन ऐतिहासिक महत्वपूर्ण घटना उल्लेख येथे आवर्जून करावा वाटतो की १८५७च्या छ.चिमासाहेब महाराजांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सत्तेविरुद्ध दिलेल्या लढ्यात त्यांचा एक शिलेदार फिरंगोजी शिंदे ह्याचं दौलत खान्यातील रक्षकआंकडून मारले गेले तेही तेथेच तर दुसरी घटना १९व्या शतकाच्या सुरुवातीस काही दशकांत या दौलतीचे कचेरीत आगही लागली होती असो पण गणपती ज्या खोलीत बसवले जातात तेथे काही सुंदर अशी मराठाशैलीची भिंती चित्रे चितारली आहेत महत्वाचे म्हणजे ही भव्य आणि भाव चित्रं नैसर्गिक रंगात रेखाटली आहेत पूर्वी दरबारात चितारी (रंगकर्मी लोक)लोक असत कदाचित त्यांच्या पैकी कोणीतरी ही रेखाटली असावी दरबारात अशा कलाकारांची नेमणूका होत. ही चित्रे न्याहाळले आणि त्यातील बारकावे पाहिले तरी मराठाशैलीच्या कलेची संपन्नता,दिव्यता आणि भव्यता नजरेआड करून चालणार नाही.

त्या भिंतीचित्रापैकी येथे आपणांस गणपतींच्या पाठीमागे एक श्री दत्तात्रेय चे सुंदर असे चित्र पहायला मिळते अतिशय सुंदर रेखाटन केले आहे ते झाडा खाली उभे आहेत तर बरोबर काही श्वानही आहेत अतिशय दुर्मिळ असे हे भिंती चित्र पहायला मिळते.

तर दुसरे भिंती चित्र श्री शंकर पार्वती गणपती ह्यांचे आहेत देव शंकर त्यांच्या उजव्या बाजूच्या एका हातात हरिण आहे तर दुसऱ्या हातात त्रिशूळ आहे तर डाव्या बाजूस हातात शंख व दुसर्या हातात डमरू दिसतो केसात गंगा आहे गळ्यात नाग आणि रुद्राक्ष माळा असून देवी पार्वती कडे पहात आहेत तर देवी पार्वती हीने एका हातात पुष्प धारण केले आहे केशशृंगार केलेला आहे त्या शंकराच्या मांडीवर विराजमान असून गणेशाला न्याहाळत आहेत तर दुसऱ्या बाजूला श्री गणेश विराजमान आहेत आणि तर शंकर वाघ्रांबरावर विराजमान आहेत(वाघाच्या कातड्यावर)इतके सुंदर ही कलाकृती मधे लाल ,पिवळा, हिरवा, तपकिरी अशा नैसर्गिक रंग छटा ने आणि सोनेरी रंगाचा पुरेपूर वापर केल्याचे जाणवते असे हे सुंदर आणि तितकेच दुर्मिळ भिंती चित्र अनुभवता आले हा वारसा जोपासणे जिकीरीचे झाले आहे असो.

वैभवराज राजेभोंसले 🚩

Leave a Comment