शिवदुर्ग प्रतिष्ठाण

शिवदुर्ग प्रतिष्ठान

शिवदुर्ग प्रतिष्ठाण…

नमस्कार,
माझं नाव शिवदुर्ग प्रतिष्ठाण…
हो बरोबर वाचलं शिवदुर्ग प्रतिष्ठाण, मी एक “दुर्ग संवर्धन संस्था” दुर्ग संवर्धन म्हणजे थोडक्यात तुम्हाला कळालं असेलच आपल्या महाराष्ट्रात खूप ऐतिहासिक वास्तु आहे म्हणजे त्यामध्ये किल्ले, दुर्ग, मंदिरे ह्या वास्तु येतात. आपण कुठे फिरायला गेलो तर एकातरी ऐतिहासिक वास्तूला भेट देतोच पण आपली आणि त्या वास्तूची भेट ही फक्त एखाद्या “सेल्फी फोटो” मधून आपल्या आठवणीत ठेवतो पण त्या वास्तूचा इतिहास जाणून घेणे आपण गरजेचे समजत नाही आणि आता इतिहास शब्द ऐकला तर आपल्याला आठवत ते फक्त चौथीच पुस्तकं आणि “शिवाजी महाराज” आणि ते वाचताना अंगावर येणारा शहारा पण तो फक्त तेवढ्यापुरता पण जर तो इतिहास पुस्तकापुरता मर्यादित न राहता जर प्रत्यक्ष गड किल्ल्यावर जाऊन अनुभवायला भेटला तर…

“तर मी आता तुम्हाला याबद्दलच काही माहिती सांगणार आहे माझी स्थापना झाली ती अलीकडेच “१९ फेब्रुवारी २०१७” रोजी, स्थापना करण्याचे कारण एवढेच होते की आपण जे काही आपले गड किल्ले जगाला दाखवत असतो ते अभिमानाने, पण खरंच ते गड किल्ले आवडीने सांभाळतो का? किंवा आपण स्वतः ते गड किल्ले बघण्यासाठी जातो का?
एकदा हे प्रश्न स्वतःला विचारून बघा उत्तर कदाचित नाही असेल… तर हेच आपले गड किल्ले आणि त्याचा इतिहास आणि तुमची भेट करून देण्याचं काम माझं…म्हणजे आपण गड किल्ले का बघितले पाहिजे? ते कसे बघितले पाहिजे? किल्ल्यावर गेल्यावर आपली वागणूक कशी असली पाहिजे? किल्ले स्वच्छ ठेवण्यासाठी आपण काय आणि कस करू शकतो? किल्ल्याचे जतन आणि संवर्धन कसे करू शकतो?

हे काही प्रश्न आणि व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माझ्याजवळ मिळतील.
मी शहापूर येथील माहुली किल्ल्यावर स्वच्छतेचे आणि संवर्धनाचे काम करत आहे, काम अगदी नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध पद्धतीने होत आहे आणि मी करत असलेलं काम तुम्ही सुद्धा करू शकता माझ्यामध्ये परिवारामध्ये सहभागी होऊन…

जर तुम्हाला माझ्या कार्याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर दिलेली link नक्की पहा आणि आपला सहभाग द्या कारण आपली खरी गरज गड किल्ल्यांना आहे.
https://www.facebook.com/shivdurgpratistan

तुम्हाला सुद्धा आमच्या ह्या शिवकार्य मध्ये सहभाग पाहिजे असल्यास खालील क्रमांक वर संपर्क करा.
प्रथमेश चव्हाण
९०८२०४४८८९
कुणाल काशिद
८८९८१९२७७९
सचिन खंडागळे
९९६७८५४०३८

Account name – shivdurg pratisthan
Ifsc code – BKDN0460629
Bank account no- 062910033765
Bank name – Dena bank

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here