महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

कोळीवाडा येथील शिवमंदिर

By Discover Maharashtra Views: 1199 3 Min Read

कोळीवाडा येथील शिवमंदिर, कुर्डुगड पायथा(जिते) –

मुळात या सह्याद्रितल्या मुलुखावर, दर्याखोर्यात राहाणार्या असंख्य जनमाणसांवर,श्रद्धा अन सबुरीच्या अस्तित्वाची साक्ष देणार्या प्रार्थनास्थळांवर,मंदिरावर भरपुर प्रमाणात परकीय आक्रमण झालीत,परकीयांनी मंदीराची बरीच नासधुस केली,मुर्तींचा विनयभंग करुन त्यांची तोडफोड केली,तरीही शेवटया घटका मोजत आपल्या अस्तित्वाची लढाई देणारी ही मंंदीरै आजतागायात आपली संस्कृती टिकवत उभी आहेत,गरज आहे ती फक्त मंदीरांच्या संवर्धनाची अन आपलि अस्मिता व संस्कृती टिकवण्याची. असच एक मंदिर आपल अस्तित्व आजही अबाधीत ठेवून आहे,कुर्डुगडच्या पायथ्याशि असणारे हे कोळीवाडा येथील शिवमंदिर बरेच प्रशस्त असून मंदिराच्या प्रांगणात बर्याच पुरातन मुर्ती,वीरगळी व सतीशिळा आहैत.

मंदीराच्या प्रांगणात प्रवेश करतेवेळीच उजव्या हाताला भलीमोठी शिवलिंग तुटक्या अवस्थेत पडलेली आढळुन येते.समोरच्या आल्यानंतर आपले लक्ष सरळ वेधले जाते ते उभ्या असलेल्या चार ते पाच सतीशिळेंकडे पाहून,जवळपास साडे चार ते पाच फुट उंच असलेल्या सतीशिळा आपल्या आत्मदहनाच्या व अस्तित्वाची लढाईचा कथा च जणू आपल्याला सांगत आहेत अस वाटत,मागे फिरून समोरा च नजर फिरवली असता प्रशस्त अस मंदिर आपल्या दिसुन येत.

मंदीराच्या सभोवताली भल्यामोठा सतीशिळा व वीरगळी दिसुन येतात.चटकन पराक्रम डोळ्यात साठवुन देणारा प्रसंग लक्षात येतो,किती हा पराक्रम अन किती ही निष्ठा,जी आरंभिली फक्त नी फक्त मंदिरे व तब्बल मराठी अस्मिता जपण्यासाठी. खरच त्या वीरांच कौतुक कराव तितक कमीच.

सभामंडपात प्रवेश करण्यासाठी असलेल्या पायर्या,पायर्या चढून वर आल्यानंतर असणारा भलामोठा सभामंडप,सभामंडपाचे खांब जरी अस्तित्वात नसले तरी त्या काळी मंदिर किती देखण अन सुरेख होत हे डोळे मिटल्याबरोबर च ध्यानी येत.समोरच गाभारा नजरेस पडतो,गाभार्यात प्रवेश करण्यापुर्वी डाव्या हाताला भलीमोठि गणेशरायाची मुर्ती पहायाला मिळते.मुर्ती पाहून आपण थेट गाभार्यात प्रवेश करतो,चार पायर्या उतरल्यानंतर समोरच गाभार्यात असलेली शिवपिंड नजरेस पडते.आकर्षक अशा शिवपिंडीचे दर्शन घेऊन वर असणार्या गाभार्याकडे नजर फिरवली असता आपण भारावुन च जातो,एकावर एक दगड रचून गोल घुमटाकारा असा रचलेला गाभार्याचा कळस मनाला फार प्रफुल्लित करतो,दगडावर दगड रचलेल्या बेचकीतून सुर्यप्रकाश थैट शिवपिंडीवर पडतो.

शिवपिंडीचे दर्शन घेवून आपण थेट सभामंडपातून प्रांगणात यावै.यैथून डाव्या हाताला वळल्यानंतर कोपर्यात एका झाडित हनुमानाची मुर्ती पहायला मिळते.सदर मुर्ति ही मंदीराच्या प्रांगणत च असावी पण कालांतराने तिचै स्थलांतर काही ना काही कारणामुळे तिथे झाले असावै..

समोरच आपल्याला कुर्डुगड ची माची नजरेस पडते व आपली धाव जाते ती कुर्डुगडाकडे.

असा हा संबंंध लेखाजोखा,आपल अस्तित्व अबाधीत राखुन जगत असलेल्या शिवमंदिरासाठि,बरेच जण येतात,फोटो काढतात अन निघुन जातात पण मंदीराची स्थापत्यशैली कशी होती,मंदिरावरील आक्रमणांना संबंध वीरांनी दिलेली आहुती जरी लक्षात घेतली तरी आपल्या सारख्या भटक्यांच मन इतिहासात रमल्याशिवाय राहणार नाहि. खर च आवर्जून भेट देता येइन अन मंदीर पाहून बरच काही शिकता येईल,अभ्यास करता येइल अन छान अन सुरेख अस मंदिर आहे.

काही वर्षापूर्वी दुर्गवीर प्रतिष्ठाण च्या नजरेत आलेल्या या मंदीरातिल  वीरगळी व सतीशिळा यांचे संवर्धन त्यांनी त्यांच्या माध्यमातून केले अन हा ठेवा जतन करण्याचा प्रयत्न केले. मुळात निस्वार्थीपणाने काम करणार्या बर्याच संस्था महाराष्ट्रात कार्यरत असून दुर्गवीर प्रतिष्ठाण ही एकमाञ अशी संस्था आहे ज्यांचे कार्य हे फार महान अन कौतुकास्पद आहे. सलाम त्यांच्या कार्याला अन मेहनतीला.

सुनिल आनंदा सणस 

Leave a comment