महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

सतीशिळा

By Discover Maharashtra Views: 1475 2 Min Read

सतीशिळा –

मध्ययुगीन कालखंडात युद्धात वीर मरण आलेल्या विराची पत्नी सती गेल्यानंतर तिच्या नावाने कुटुंबातील सदस्य कोरीव शिळा उभारत असत. त्यास सतीचा दगड अथवा सतीशिळा म्हणतात.

सहगमन म्हणून सती जाणे हे मध्ययुगीन काळात खूप प्रचलीत होते. मृत पतीच्या विधवेने पुढचा प्रवास सोबत करणे हा बहुदा या मागचा हेतू असावा. जेथे अंतिम संस्कार अग्निदहनाने होतो तिथे शवा बरोबर जिवंत दहन करणे किंवा जेथे शवास जमिनीत पुरण्याची पद्धत आहे तिथे जिवंत पुरणे हे सहगमनाचे रूप असे. नवरा मरण पावल्यावर बायकोने सती जाणे हे प्राचीन काळी तिचे कर्तव्य मानले जात असे. सती प्रथा प्रचलीत असण्या मागे विद्वानांची विविध मते आहेत. काहींच्या मते पतीच्या मृत्यू नंतर लज्जा रक्षणासाठी स्त्रीया सती जात असत तर काहींच्या मते मृत पतीची संपत्ती मिळवता यावी म्हणून नातेवाईक पत्नीला सती जाण्यासाठी प्रवृत्त करत असत.

सती प्रथा असण्या मागे कारण परंपरा कोणतीही असो, पण पूर्वी प्रतिष्ठेची मानली जाणारी ही अमानवीय कृती १८३९ साली ब्रिटीश सरकारने बेकायदेशीर ठरवली. ही प्रथा आता कालबाह्य असली तरी सतीच्या समरणार्थ बनवलेल्या सतीशिळा या प्रथेच्या पुराव्या रूपाने आपल्याला आजही दिसतात. सती शिळेवर बांगड्या भरलेला सौभाग्य वतीचा कोपरात काटकोनात वळलेला हात दाखवलेला असतो. अमरत्वाच प्रतीक असलेले सूर्य व चंद्र दाखवलेली असतात. स्थळ भिन्नतेने काही ठिकाणी चितेवर पडलेले दाम्पत्य, वाघावर किंवा घोड्यावर बसलेली स्त्री, शिवाची उपासना करतांना पती किंवा पत्नी, दोन स्त्रिया सती गेल्या असतील तर दोन बांगड्या भरलेलें हात दाखवतात.

सदर सतीशिळा ही पेडगाव च्या भुईकोट किल्यात भैरवनाथ मंदिराच्या मागील बाजूस आहे.

Leave a comment