महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,29,596

शरभ शिल्प

By Discover Maharashtra Views: 1535 2 Min Read

शरभ शिल्प –

सह्याद्री मध्ये भटकंती करत असताना नेहमीच काहीतरी नवीन पाहायला अनुभवायला भेटत . किल्यांवर गेल्यावर तिथले बुरुज,तळी,दरवाजे आणि द्वारशिल्प म्हणजे कधीही आपल्या पूर्वजांचा उज्वल इतिहासाचा जिवंत पुरावा . या सर्व ऐतिहासिक वास्तूंचा अभ्यास करावा तेवढा कमीच. आम्ही कर्नाळा किल्यावर एक शिल्प बघतलं वाघासारखं प्राण्याचं हे शिल्प ..हिंदूं पुरतान लिखाणात या शरभ शिल्प चा उल्लेख आठळतो .

दोन पंख असलेलं शरभाच आगळंवेगळं शिल्प चार पाय , विक्राळ मुख आणि लांब शेपूट असणारा हा काल्पनिक पशु म्हणजे ” शरभ ” हिंदू पुरातना नुसार शरभ हा शंकराचा अवतार. शंकराचा भक्त राक्षस हिरण्यकश्यपु याचा वध करण्यासाठी विष्णुने नरसिहांचा अवतार घेतला .पुढे हिरण्यकशपु वधानंतर नरसिहांचा क्रोद काही केल्या आवरेना , तो सर्वांना त्रास देऊ लागला मग सर्व देवदेवतांनी सृष्टीच्या निर्मात्या महादेवांचा धावा केला.

मग शंकरानी सिंहासारखं विक्राळ तोंड , तीक्ष्ण नख , दोन पंख , चार पाय आणी लांब शेपूट असलेल्या शरभाच रूप घेतल आणि नरसिहांचा वध केला आणि त्याची मुंडकीने आपलं मुकुट सुशोभित केल आणि कातडीने आपलं आसन म्हणून परिधान केलं . तेच हे शंकराचे शरभ अवतार,अशा प्रकारच्या प्राण्याची शिल्पे महाराष्ट्रात आढळत नसली तरीही महाराष्ट्रात कित्येक ऐतिहासिक ठीकाणी चार पाय, तीक्ष्ण नख्या आसणारा, लांब शेपटीचा, पंख आसलेला कींवा नसलेला अक्राळ विक्राळ प्राणी शिल्प कृतीत आढळतो म्हणजे तो शरभ असावा.


सामर्थ्यवान व हुशार शत्रूला पराजीत करण्याची ताकद बाळगणारे राज्यकर्ते स्वतःला शरभ (अती शक्तिशाली) दर्शवत, स्वताचे व राज्याचा शक्तिचे प्रदर्शन करण्याचे शरभ शिल्प हे एक उत्तम साधन समजत असावे. म्हणुनच शरभ शिल्प गड, किल्ले, मंदिरे तसेच इतर पुरातन वास्तूंच्या दर्शनी भागावर लावले जात असावे. आपल्या सभोवतालच्या किल्ले रायगड बरोबर मुरुड मधिल जंजिरा किल्याच्या प्रवेश द्वारावर, हरिश्चंद्र गडाच्या वाटेवर तोलार खिंडत, राजगड, अवचितगड, पनवेल जवळील कर्नाळा कील्ला, सुधागड, तळगड, शिवजन्म भुमी शिवनेरी अशा कित्येक ठीकाणी हे शिल्प पहावयास मिळते.

लक्ष्मण खोत

Leave a comment