सदाशिव | आमची ओळख आम्हाला द्या

By Discover Maharashtra Views: 1197 2 Min Read

सदाशिव | आमची ओळख आम्हाला द्या –

पाटेश्वर मंदिर समूहामध्ये नंदीमंडपाच्या बाजूला दोन लहान मंदिरे आहेत. त्यापैकी उजव्या बाजूच्या लहान मंदिरात चतुर्मुख, चतुर्भुज मूर्ती आहे. ही मूर्ती नेमकी कोणत्या देवतेची आहे ?याविषयी अनेक अभ्यासकांची वेगवेगळी मते आहेत .काहीजण यास लकुलीश  तर काहीजण  ब्रह्मदेवाची मूर्ती असे म्हणून संबोधतात. परंतु ही मूर्ती नेमकी कोणत्या देवतेची आहे?  परंतु मूर्ती शास्त्राच्या दृष्टीकोनातून आपण या मूर्तीचा जर बारकाईने विचार केला तर ही मूर्ती सदाशिवाची सदाशिव ठरते.

पाटेश्वर मधील चतुर्मुख मूर्ती ही सदाशिवाची आहे. महाभारतामध्ये शिवाच्या चतुर्मुख लिंगाची कथा आहे. पण प्रत्यक्ष मात्र अशी चार मुख असणारी मूर्ती पहावयास मिळत नाही. चतुर्मुख शिवलिंग पहावयास मिळते. पण मूर्ती नाही. पाटेश्वर मंदिरातील ही मूर्ती चतुर्मुख शिवाची मूर्ती आहे. पाटेश्वर मधील ही मूर्ती दक्षिणाभिमुख असून, समोरच्या बाजूला चार तोंडे आहेत त्यांच्या डोक्यावर साध्या प्रकारचा मुकुट असून त्यांच्या मध्यभागी कमल पुष्पा कृती आहेत.

प्रत्येकाच्या चेहऱ्याच्या मध्यभागी एक कपाळावर आडवा नेत्र आहे. मूर्तीच्या शेवटच्या चेहऱ्याच्या कानात कुंडले आहेत .ओठावर मिशा आहेत. गळ्यात कंठाहार आहे. त्याच्याच खाली खूप कलात्मक पद्धतीने पोटावर  रुळणाऱ्या  माळा आहेत. त्याच्याही खाली तीन पदरी जाणवे आहे .मांडी घालून बसलेल्या या मूर्तीचे पोट सुटलेले आहे. प्रदक्षणा क्रमाने त्याच्या हातात अक्षमाला त्रिशूल, दंड व पात्र हि आयुध आहेत. दंडावर सर्पाचे बाजू बंध आहे. पायात जाडसर तोडे आहेत.वरिल सर्व लक्षणे हि सदाशिवाची आहेत त्यामुळे ही मूर्ती चतुर्मुख सदाशिवाची आहे.

डाॅ.धम्मपाल माशाळकर, सोलापूर

Leave a comment