महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,75,701

किल्ले रेवदंडा

By Discover Maharashtra Views: 4377 6 Min Read

किल्ले रेवदंडा

दिनांक:- 10/12/2017 रोजी आम्ही दुर्ग भटकंती मोहीम हिंदवी स्वरांज्य फाऊंडेशन गडकोट समीती च्या मांध्यमातुन असताना, किल्ले पद्मदुर्ग नंतर किल्ले जंजिरा झाल्यावर आमची टीम किल्ले रेवदंडा च्या दिशेने वाटचाल करू लागली.मुरूड वरून आम्ही सुमारे 1 ते 1.15 (संव्वा) तासात रेवदंडा गावात पोचलो. गावामधेच किल्याच्या तटबंदी चे अवशेष दिसु लागले. आम्ही थोडे अचंबित झालो होतो. नंतर उमगले की किल्याच्या तटबंदी च्या आत रेवदंडा हे गाव वसलेले आहे. जस जसे पुढे जाऊ लागलो तस तसे रेवदंडा किल्यावर गावातील गावकरी लोकांनी आपली मालकी हक्क गाजवलेला दिसुन आले. किल्ल्याच्या सुरवातीलाच गावातील लोकांनी, वयक्तीक मार्केट (बाजार पेठ ) वसवलेली दिसली. तसेच नारळाच्या झाडांमधे वेडलेली घरे दिसुन आली. व किल्ल्याच्या अवशेषा मधे काही ठीकाणी इमारतीच्या पडक्या अवषेशा च्या तटबंदी च्या आत, नारळाच्या बागा लाऊन त्यावर आपला मालकी हक्क गाजवलेला दिसुन येत होता.

किल्ले रेवदंडा

त्याच बरोबर अजुन पुढे गेल्यावर काही घरे आहेत व त्यांचा वापर छोटेसे हाॅटेल म्हणुन केला जात होता. तीथे नाष्टा, चहा मीळत होता. तसेच जेवन ही मीळत होते. आणि आमची टिम अजुन पुढे गेली असता टेहळनी बुरूंजाच्या शेजारी 7 तोफा ह्या बेवारस असल्या सारख्या दिसुन आल्या. ते पाहुन माझे मन हळहळु लागले. तसेच मी अजुन थोडा पुढे गेलो व समोर एक लोखंडी गेट दिसुन आले. त्या ठीकाणी गेटवर लीहले होते की परवानगी शिवाय आत एऊ नए. हे पाहून मी थोडा चकीत झालो व गेट मधुन थोडे आत गेलो तर काही तरून दारू पीत बसले होते. त्यांच्या कडे विचार पुस केली असता त्यांनी मला उत्तर दिले की हे आमच्या मालकी हक्काचे आहे, तुम्हाला काय करायचेय. तुम्ही इथे फीराय आलात ना मग फीरा पहा व गीघा. नाई विलाजाने आम्हाला तीथुन पुढे जावे लागले.

पुढे जे दिसले त्याचे फोटो मी पाठवनारच आहे, ज्याची माझ्या मनी कान कुन होती तेच समोर दिसले. दारूच्या व बीयर च्या बाटल्या. हे सार पाहुन मी पुरता ओरडडल्या सारखा झालो होतो.पण यावर काहीच बोलु शकत नव्हतो. कारण पुर्ण गाव हे किल्ल्याच्या तटबंदी च्या आत वसलेले होते. त्याची नोंद इतिहासात 15 व्या शतकात आढळते. पोर्तुगीजांनी रेवदंडा गावाचे महत्व व्यापाराच्या द्रुष्टीकोनातुन ओळखुन खाडीच्या मुखावर किल्ला बांधला व सर्व रेवदंडा गाव हे आत घेतल.पोर्तुगीज कप्तान ‘सोज’ याने 1528 मधे हा किल्ला बांधाय सुरवात केली. तसेच कोकनात रेवदंडा चा उल्लेख चौल रेवदंडा म्हणुन ही केला जातो. रेवदंडा हे गाव निसर्गाच्या कुशीत वसलेले दिसुन एते. सुंदर असा समुद्र किनारा, नारळाच्या लांबच लांब सर्व गावात बागा याने गावाचे सौदर्य खुलुन एते. व कोकनात आल्या सारखे वाटते.

किल्ले रेवदंडा

त्याच बरोबर रेवदंडा गावातील गावकरी यांनी किल्ल्याच्या 5 ते 6 किलोमीटर परिसरात किती अतिक्रमण केले आहे व ते कसे हे समकालीन पुरावे तपासल्यावर च समजेल. तेसेच हा किल्ला पुरातत्व विभागाकडे आहे की अजुन शासनाच्या कोनत्या विभागाकडे आहे हे पाहीले पाहीजे. पण हे माञ नक्की की जे पाहीले ते अत्यंत दयनीय व मनास धंक्का देनारे होते.

त्याचबरोबर आपन खाली जानुन घेऊयात किल्याचा इतिहास व पाहण्याची ठीकाणे.

भौगोलिक स्थान कुंडलिका नदी अरबी समुद्राला जेथे मिळते, त्या कुंडलिका खाडीच्या मुखावर असलेल्या रेवदंडा गावाचा उल्लेख थेट महाभारत काळात सापडतो. त्याकाळी हे गाव रेवतीक्षेत्र म्हणून प्रसिध्द होते. १५ व्या शतकात रेवदंडा गावाचे महत्व ओळखून पोर्तुगिजांनी खाडीच्या मुखावर किल्ला बांधला. किल्ला बांधताना संपूर्ण रेवदंडा गाव भोवती तटबंदी बांधून किल्ल्याच्या कवेत घेतल.

इतिहासपोर्तुगिज कप्तान सोज याने १५२८ मध्ये किल्ला बांधायला सुरुवात केली. त्यापूर्वी १५१६ मध्ये पोर्तुगिजांनी कारखान्यासाठी इमारत बांधली, तिला चौकोनी बुरुज म्हणतात. हिची तटबंदी १५२१ ते १५२४ च्या दरम्यान बांधली गेली. २२ जुलै १६८३ च्या रात्री मराठ्यांनी रेवदंड्यावर हल्ला केला, पण पोर्तुगिजांनी तो उधळून लावला. मराठ्यांनी रेवदंड्याला वेढा घातला. तो मोडून काढण्यासाठी पोर्तुगिजांनी फोंड्यावर हल्ला केला. त्यामुळे मराठ्यांना वेढा सोडून जावे लागले. २५ नोव्हेंबर १७४० रोजी झालेल्या तहानुसार पोतुगिजांनी साष्टीतील गावांच्या बदल्यात रेवदंडा व कोर्लईचा ताबा मराठ्यांना दिला. १८०६ मध्ये इंग्रजांनी याचा ताबा घेतला. १८१७ मध्ये आंग्रेने हा गड जिंकला. पण लगेच १८१८ मध्ये रेवदंडा किल्ला इंग्रजाकडे गेला.

किल्ले रेवदंडा

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे रेवदंडा गडाच्या तटबंदीचा परिघ ५ किमी आहे. तटबंदी पूर्ण गावाला वेढत असल्यामुळे बहुतेक ठिकाणी ती खाजगी मालमत्तेत गेल्यामुळे पाहाता येत नाही. रेवदंड्यात जाणारा रस्ता तटबंदी फोडून बनवलेला आहे. त्या तटबंदीच्या उजव्या बाजूने गेल्यास आपण प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. प्रवेशद्वारावर पोर्तूगिजांचे राजचिन्ह कोरलेले आहे. प्रवेशद्वाराच्या आत अजून एक दार आहे. त्याच्या पूढे ३ मोठे दगडी गोळे पडलेले आहेत. दरवाज्याच्या माथ्यावर जाण्यासाठी जिना आहे. त्याने वर गेल्यावर भिंतिमध्ये अडकलेला एक तोफ गोळा दिसतो. त्यानंतरचे दुर्गावशेष किनार्‍याजवळ आहेत. त्यातील प्रमुख म्हणजे तटबंदीखाली असलेला भूयारी मार्ग. या भुयारात शिरायला ६ तोंड आहेत. पण सर्व तोंड बंद आहेत. रेवदंडा किल्ल्यावर सातखणी मनोर्‍याचे सात पैकी चार मजले बाकी आहेत. या मनोर्‍याला ‘‘पोर्तुगिज आरमाराचा रखवालदार‘‘ म्हणत. कारण या मनोर्‍यावरुन उत्तरेला मुंबईपर्यंत व दक्षिणेकडे जंजिर्‍यापर्यंत टेहाळणी करता येत असे. या मनोर्‍याच्या पायथ्याशी तोफा पडलेल्या आहेत. याशिवाय चर्चचे अवशेष, घरांची, वाड्यांची जोती हे अवशेष आहेत.

लेखन व माहिती संकलन
दुर्गवेडा कृष्णा घाडगे
अध्यक्ष:- गडकोट समीती
हिंदवी स्वरांज्य फाऊंडेशन
Leave a comment