मराठ्यांच्या पराक्रमाचे साक्षीदार रणदुल्लाबाद गाव !

मराठ्यांच्या पराक्रमाचे साक्षीदार रणदुल्लाबाद गाव !

मराठ्यांच्या पराक्रमाचे साक्षीदार रणदुल्लाबाद गाव !

आदिलशहाचा सरदार असलेल्या अफजलखानाने स्वराज्यावर केलेल्या आक्रमणाच्यावेळी हे गाव अस्तित्वात नव्हते. स्वराज्य रक्षणासाठी शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी अफजलखानाच्या सैन्याचा या सामना केला. आदिलशहाचा सरदार असलेल्या अफजलखानाने स्वराज्यावर केलेल्या आक्रमणाच्यावेळी रणदुल्लाबाद हे गाव अस्तित्वात नव्हते. स्वराज्य रक्षणासाठी शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी अफजलखानाच्या सैन्याचा या ठिकाणी सामना केला. त्यावेळी माहूर तालुका पुरंदर येथील जगताप बंधू वाईचे पिसाळ देशमुख या मराठा शिलेदारांवर शिवाजी महाराजांनी जबाबदारी दिली होती.

लढाईनंतर जगताप पिसाळ देशमुख यांनी या ठिकाणी वास्तव्य केले. यातूनच रणदुल्लाबाद गाव वसले. या गावात जगताप यांची घरे अधिक आहेत. छत्रपतींचा समूळ नायनाट करण्यासाठी आदिलशाहीने अफजलखानावर मोठी जबाबदारी दिली होती. अफजल खानाबरोबर रणदुल्लाखान हा दुसरा सरदारही या मोहिमेत सहभागी होता. मात्र तो शिवाजी महाराज समर्थक म्हणून ओळखला जात होता. आदिलशहाच्या दरबारात छत्रपती शिवाजी राजे यांच्या बरोबर रणदुल्लाखान होता.

या दोघांमधील मैत्री आदिलशाहीसाठी डोकेदुखी होती, त्यामुळे रणदुल्लाखान या मोहिमेविषयी नाराज होते. हरेश्वर डोंगर रांगेजवळच्या जागेत खानाची छावणी पडली होती. त्यावेळी ज्या छावणीत जगताप देशमुख या राजांच्या सैन्यात युद्ध झाले होते, त्या ठिकाणी अफजलखानाने त्यांच्यावर विषप्रयोग करून रणदुल्लाखानला संपवूनत्याची कबर बांधली. त्यानंतर अफजलखानाने पुढे वाईच्या दिशेने प्रयाण केले. मात्र माहूरचे जगताप आणि वाईचे पिसाळ देशमुख यांनी येथेच वास्तव्य केले.

हिंदू-मुस्लीम ऐक्य –

रणदुल्लाखान यांच्या कबरीमुळे या गावाला रणदुल्लाबाद नाव पडले असल्याचे गावातील ज्येष्ठ मंडळी सांगतात. रणदुल्लाबाद येथे एकच मुस्लिम कुटुंब राहते मात्र गावाचा धार्मिक सलोखा निश्चितपणे वाखाणण्याजोगे आहे. गावात हिंदू मुस्लिम ऐक्य असून मोहरम आणि ईद साजरी केली जाते.

निलेश गावडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here