रमामाधव स्मृतिस्थळ व वृंदावन

रमामाधव स्मृतिस्थळ व वृंदावन

रमामाधव स्मृतिस्थळ व वृंदावन –

थोरले माधवराव पेशवे व रमाबाई साहेब पेशवे यांचे रमामाधव स्मृतिस्थळ व वृंदावन, थेऊर.

खास उल खास जू अल इख्तिदार शाने दौलत वफाए मुल्क दिनायते दख्खन, स्वारी राजमंडल पेशवा, फिद्विय श्रीमत् महाराज छत्रपति रामराजा महाराज विश्वासनिधि सकल राजकार्यधुरंधर श्रीमंत माधवराव बल्लाळ पंतप्रधान.

थोरले माधवराव पेशवे हे मराठा साम्राज्याचे चौथे पंतप्रधान . १७७२ मध्ये हैदरवरील स्वारीत असताना माधवराव पेशवे आजारी पडले,दुखणे क्षयावर जाऊन त्यातच त्यांचा अंत झाला. १७६१ मध्ये पेशवाईची वस्त्र स्विकारल्या नंतर पानिपतच्या लढाईने विस्कटलेली मराठा साम्राज्याची पर्नबांधणी केली. हैदरअली व निजाम सारखे शत्रू वठणीवर आणले व मराठयांचा दरारा सर्वत्र निर्माण केले.

दक्षिणेतील सत्ता भक्कम करून महादाजी शिंदे सरकार व होळकर सरकार यांच्या सहकार्याने उत्तरे कडील आपला दबदबा निर्माण केला. मराठाशाहितील हा चारित्रवान व कर्तबगार पेशवा वयाच्या २८ व्या वर्षी निधन पावला.( १८ नोव्हेंबर १७७२ ) या तरूण पेशव्याचा अकाली मृत्यू म्हणजे मराठा साम्राज्याच्या जिव्हारी बसलेला घाव होता. याच्या निधना नंतर त्यांच्या पत्नी रमाबाईसाहेब सती गेल्या. अशा रमामाधवाचे स्मारक व वृंदावन चिंतामणी गणपती ,थेऊर येथे आहे.

माधवराव गणेशभक्त असल्याने शेवटी त्यांनी या मंदिराच्या परिसरात प्राण सोडला. याच मंदिराचा सभामंडप व आोव-या बांधल्या होत्या. मंदिराच्या आवारात त्यांच चित्र व पालखी ठेवली आहे .समोर रमाबाईंच वृंदावन बांधल आहे.

ज्या नदी तिरावर त्यांना अग्नी देण्यात आला व रमाबाई साहेब सती गेल्या त्या ठिकाणी त्यांच स्मारक बांधले आहे.

रमा माधवाचे जिथे चित्त लागे,
जिथे सत्य चिंतामणी नित्य जागे,
तया थेऊराला चला जाऊया.

संतोष चंदने ,चिंचवड, पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here