स्वराज्याचे पेशवे

Discover Maharashtra 2

स्वराज्याचे पेशवे शिवरायांच्या बालपणापासून ते मराठेशाही च्या अस्तापर्यंत

  1. सोनदेव विश्वनाथ उर्फ सोनोपंत बहुलकर (१६३०-१६४०) – ह्यांना शहाजीराजांनी जिजामाता व शिवरायांच्या सोबत पुणे जहागिरीचा कारभार बघायला नेमले होते , त्यांची पुढे महाबळेश्वर येथे जिजाऊंसह स्वर्णतुला ही केली होती , ते १६६५ मध्ये वारले.
  2. शामराज निळकंठ रांझेकर (१६४०-१६६१) – यांच्या जंजिऱ्याच्या अपयशामुळे व वतनाच्या लोभापायी त्यांना हे पद गमवावे लागले.
  3. नरहरी आनंदराव (१६६१-१६६२)
  4. मोरेश्वर त्र्यंबक उर्फ मोरोपंत पिंगळे (१६६२-१६८१) – हे स्वराज्याचे राज्याभिषेकानंतरचे पहिले अधिकृत पेशवे , ह्यांनी साल्हेर , जावळी , प्रतापगड , जामनगर , बुऱ्हाणपूर , तळकोकण इत्यादी लढायांत त्यांनी विशेष कामगिरी निभावली.
  5. निळकंठ मोरेश्वर उर्फ निळोपंत पिंगळे (१६८१-?) – ह्यांनी शंभुराज्यांच्या काळात हरजीराजे महाडिक यांच्यासह कर्नाटकात अनेक लढाया केल्या व शंभुराज्यांंनन्तर मिरजेच्या युद्धात मारले गेले.
  6. परशुराम त्र्यंबक कुळकर्णी (?-१७०१) – ह्यांची पेशवे म्हणून कारकीर्द फार छोटी होती.
  7. भैरवजी मोरेश्वर उर्फ बहिरोजीपंत पिंगळे (१७०१-१७१३) – प्रतिनिधी पदामुळे पेशवे पद फक्त नावाला उरले होते ह्यांच्या काळात . ह्यांनी ताराबाईविरुद्ध शाहूंचा पक्ष घेतल्याने त्यांना कान्होजी आंग्रेने १७१३ मध्ये कैद केले जेथून बाळाजी विश्वनाथ यांनी त्यांना सोडविले.
  8. बाळाजी विश्वनाथ भट (१७१३-१७२०) – शाहूंचा पक्ष घेऊन त्याकडे आंग्रे , जाधव यांच्यासारख्या मुत्सद्दी लोकांना वळविण्यात यांचा मोठा वाटा होता , तसेच ह्यांनी दिल्लीत जाऊन बादशहा कडून चौथाई , सरदेशमुखि तर मिळविलीच पण राजमाता येसूबाई यांना १७१९ मध्ये सोडवून आणले व दगदग सहन न झाल्याने सासवडला वारले.
  9. विश्वास बल्लाळ उर्फ बाजीराव भट (१७२०-१७४०) – याने आयुष्यात ४० मोठ्या लढाया केल्या ज्यात प्रामुख्याने साखरखेड , दभोई , बुंदेलखंड , पालखेड , भोपाळ , खरगोन इत्यादी होत्या , याच्याकाळात मराठ्यांनी नर्मदेच्या उत्तरेत राज्यविस्तार सुरू करत दिल्ली गाठली , इराणच्या बादशहा नादिरशाह चे आक्रमण थांबवायला जाताना खरगोनच्या युद्धानन्तर रावेरखेडीस हा वारला.
  10. बाबूजी नाईक बारामतीकर जोशी (१७४०-१७४०) – हा बाजीरावाची बहीण भिऊबाईचा नवरा ज्याच्याकडून शाहूंनी कर्ज काढल्याने यास तात्पुरती पेशवाई दिली.
  11. बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब भट (१७४०-१७६१) – याने साताऱ्यास अनेक राजकरणं केलीत , भट घराण्यास छत्रपतींकडून वंशपरंपरागत पेशवाई घेतली , तुळाजी आंग्रेचे आरमार बुडविले , उदगीर येथे निजामास हरविले , याच्या काळात अटकेपार झेंडा रोवल्या गेला पण शेवटी पानिपतच्या युद्धाच्या पराभवाला कारणीभूत स्वतःस समजून ते पुण्यात वारले.
  12. माधवराव बल्लाळ भट (१७६१-१७७२) – राक्षसभुवनला निजमास , दक्षिणेत हैदर अली व सावणुर च्या नवाबास यांनी हरविले , यांनी कष्टाने पानीपत नंतरची विस्कटलेली राज्याची घडी बसवून पुनः मराठ्यांना वैभव मिळवून दिले , राजयक्ष्म रोगाने हे थेऊरला वारले.
  13. नारायण बल्लाळ भट (१७७२-१७७३) – अननुभवी असल्याने यांचे चुलते रघुनाथ बाजीराव उर्फ राघोबादादा यांने कट करून यांची अनंत चतुर्दशीला शनिवारवाड्यात हत्या करविली.
  14. रघुनाथ बाजीराव उर्फ राघोबादादा भट (१७७३-१७७४) – दरबारातील बारा विशेष सरदारांनी मिळून बारभाई कारस्थान केले व यांना पदच्युत केले.
  15. माधव नारायण उर्फ सवाई माधवराव भट (१७७४-१७९५) – वयाच्या ४० व्या दिवशी हे पेशवे झाले पण त्यांच्या नवे बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणवीस कारभार पाहत , यांच्याच काळात इंग्रजांशी पहिल्या युद्धात मराठे जिंकले व नंतर खर्ड्यास निजामास हरविले , यानंतर नानास कंटाळून पेशव्यांनी पुण्यात आत्महत्या केली.
  16. बाजीराव रघुनाथ भट (१७९५-१८१८) – यांच्या काळात राज्यास उतरती कळा लागली व तैनाती फौजेचा करार यांनी १८०२ मध्ये दौलतराव शिंद्यांपासून रक्षणार्थ केला ज्याने मराठे इंग्रजांकडून हरले , पुढे पुन्हा १८१८ मध्ये हरले व मराठेशाही संपली व पेशव्यांना विठूरला मरेपर्यंत (१८५१) रहावे लागले.
  17. गोविंद बाजीराव उर्फ नानासाहेब भट (१८५१-१८५७) – १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामानंतर यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला.

साभार –  मराठा स्वराज्यातील वीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here