महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा

By Discover Maharashtra Views: 1647 5 Min Read

1674 साली शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा प्रत्यक्ष पाहिलेल्या समकालीन लोकांनी लिहलेला सोहळ्या बद्दल चा अनुभव –

दरवर्षी आपण शिवराज्याभिषेक सोहळा 6 जुन ला मोठ्या आनंदात साजरा करतो.आज छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊन जवळपास 350 वर्ष होत आली.आपल्याला आजही त्या सोहळ्या बद्दल जाणून घ्यायची इच्छा होते की शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा नक्की कसा झाला असेल? रायगडावर त्यादिवशी काय वातावरण असेल? कोण कोण आले असेल.??किती लोक आली असतील?(शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा) त्याकाळी काही लोकांच्या नशिबात तो सोहळा प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला.त्यांनी जे या सोहळ्या बद्दल लिहलय ते वाचून आजही आपण त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहोत असा भास होतो.

आपल्या इतिहासात मौर्य,सातवाहन,वाकाटक, कलचुरी,राजा रामदेवराय ,चालुक्य अश्या अनेक राजसत्तांनी देशावर, महाराष्ट्रावर राज्य केले.परंतु आपल्या प्रजेसाठी राज्य निर्माण करणारा आणि आजही ज्यांच्या राज्य पद्धतीचे दाखले दिले जातात ते एकमेव अद्वितीय राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.मुस्लिम राज्यकर्त्यांच्या शेकडो वर्षाच्या गुलामगिरी नंतर शिवाजी महाराजांसारख्या एका सर्वसामान्यतील युवकाने दिल्लीच्या तख्ताला आव्हान देणारे मराठा साम्राज्य निर्माण केले.महाराजांनी आयुष्भर ज्या लढाया केल्या,युद्ध जिंकली,अनेक संकटातून मार्ग काढीत हे साम्राज्य निर्माण केलं.

या सर्वांचा जो सर्वोच्च बिंदू होता तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 जुन 1674 साली रायगडावर केलेला राज्याभिषेक. राज्याभिषेक झाला त्यादिवशी शनिवार होता. राज्यभिषेक केल्याने सैन्य जमा करण्याचा,परस्पर तह करण्याचा, न्याय निवाडे करण्याचा ,कर लादण्याचा,स्वाऱ्या करण्याचा मूलभूत हक्क प्राप्त होतो.आपण एक सार्वभौम राजे आहोत आणि कुणाच्याही अधिपत्याखाली नाही यासाठीच महाराजांनी हा राज्याभिषेक केला.

त्याकाळात जी लोकं तिथं रायगडावर प्रत्यक्ष हजर होती ,ज्यांनी राज्याभिषेक सोहळा प्रत्यक्ष पहिला त्यांनी याबद्दल त्या काळात लिहलेल्या नोंदी उपलब्ध आहेत.शिवरायांचा सोहळा नक्की कसा झाला,राजसिंहासन नक्की कसे होते,सोहळा किती दिवस चालला,शिवरायांची तुला कुठल्या कुठल्या वस्तुंबरोबर झाली,काय काय विधी पार पडल्या.अशी अनेक वर्णने समकालीन व्यक्तींनी लिहून ठेवली आहेत.

याचकाळात राज्याभिषेक च्या वेळी परकीय इंग्रज वकील हेन्री ऑग्सडेन हा शिवरायांकडून काही सवलती मिळवण्यासाठी रायगडावर आला होता.त्याने आपल्या रोजनिशित अनेक नोंदी लिहल्या आहेत.तसेच डच,सभासद,गागाभट्ट यांच्या समकालीन कागदपत्रा मध्ये राज्याभिषेकाची वर्णने उपलब्ध आहेत.

19 मे 1674 ला शिवाजी महाराज प्रतापगडाला देवीच्या दर्शनासाठी गेले.तिथे त्यांनी 3 मन सोन्याचे छत्र देवीला अर्पण केले. 21 मे ला ते प्रतापगड हून रायगड ला आले.29 मे ला शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याची सुरुवात झाली. 11000 लोकं त्याकाळात रायगडावर राज्याभिषेक सोहळ्यासाठी आली होती.

ज्येष्ठ शुद्ध 4,घटी 5,आनंदनाम संवस्तरे, शके 1596,म्हणजे 29 मे 1674 रोजी शिवाजी महाराजांची मुंज झाली आणि राज्यभिषेक सोहळ्याची सुरुवात ही 29 मे 1674 ला झाली. त्याच दिवशी शिवाजी महाराजांची सुवर्ण तुला झाली आणि त्यांचं वजन हे 16000 होन भरलं आणि त्यात अजून 1 लक्ष होनाची भर घालून ते ब्राम्हणांना दान करण्यात आले.

वेंगुर्ल्याच्या डच कंपनीने राज्याभिषेकाची हकीकत त्यांच्या राजाला बेतेव्हियाला पत्राने कळवली होती.त्यात त्यांनी लिहल आहे की शिवाजी महाराजांची सुवर्ण तुला झाली तशीच चांदी,तांबे, जस्त, कथिल,शिसे,लोखंड, ताग,कपूर,मीठ, खिळे, जायफळे, जायपत्रे,मसाले,लोणी,साखर,,सर्व प्रकारची फळे, खाद्दे,ताडी सुद्धा यांचीही तुला करण्यात आली आणि त्यांचा धर्म करून टाकला.

शिवाजी महाराजांनी रामाजी दत्तो याकडून रायगडावरील रत्न शाळेतून सिंहासन बनवून घेतले होते.

ज्येष्ठ शुद्ध 13 उजाडता शनिवार 3 घटका रात्र उरली असता राज्याभिषेक विधीस सुरुवात झाली. 6 जुन 1674 पहाटे 5 वाजता शिवाजी महाराजांनी सिंहासनावर आरोहण केले. याच दिवशी सकाळी इंग्रज वकील हेन्री ऑग्सडेन हा शिवाजी महाराजांना नजराणा घेऊन दरबारात भेटायला गेला.त्याने हिरेजडित अंगठी शिवाजी महाराजांना भेट देण्यासाठी आणली होती.तिचा परावर्तित होणारा प्रकाश पाहून शिवाजी महाराजांनी त्याला आपल्या जवळ बोलावले.तो सिंहासनाच्या जवळच उभा होतं.त्याने सिंहासनाचे ,राज्यसभेचे आपल्या शब्दात वर्णन आपल्या डायरीत केले आहे. तो म्हणतो

“सिंहासनाच्या दोन्ही बाजूला सुवरणांकित भाल्याच्या टोकावर अनेक अधिकार, निदर्शक व राजसत्तेचा द्योतक चिन्हे मी पाहिली.उजव्या हाताला दोन मोठी,मोठ्या दाताच्या मस्त्याची सुवर्णाची शिरे होती.डाव्या हातास अनेक आश्र्वापुच्छे व एक मौल्यवान भाल्याच्या टोकावर , समपातळीत लोंबनारी,सोन्याच्या तराजुची पारडी न्यायचिन्हा म्हणून तळपत होती.राजवाड्याच्या प्रवेश द्वारी आम्ही परत आलो तर दोन लहान हत्ती दरवाज्याच्या दोन्ही बाजूला झुलत होते.दोन देखणे पांढरे अश्व शृंगरलेले स्थितीत आणलेले होते.इतक्या बिकट किल्ल्यावर हे हत्ती,घोडे कसे वर आले याच आम्हाला तर्क च करवत नव्हता.दरबार बरखास्त झाल्यावर शिवाजी महाराजांची हत्तीवरून मिरवणूक निघाली आणि ती जगदेश्वराच्या मंदिराकडे जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या प्रेक्षकांनी सुवर्ण रौप्य पुष्प वृष्ठि केली.जिजामाता या सोहळ्यास हजर होत्या.तसेच समकालीन इतिहासकार सभासद याने लिहला आहे की या राज्याभिषेक सोहळ्यास महाराजांनी ५ कोटी रुपये खर्च केले होते.”

राहुल झाडे, इतिहास अभ्यासक, बारामती

CR - INNU.IN
Leave a comment