महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

मुळीक घराण, वाटेगाव

By Discover Maharashtra Views: 2234 2 Min Read

मुळीक घराण | समाधीस्थान, वाटेगाव. ता वाळव‍ा –

वाटेगावात ग्रामदैवत श्री वाटेश्वर मंदिर परिसरात मोठ्या डेरेदार वडाच्या झाडाजवळ असणाऱ्या नागोबाजवळ मुळीक घराण्यातील विठोजी सूर्यवंशी उर्फ मुळीक (सन१६०१) असा उल्लेख असणारा ऐतिहासिक पिंपळाचा पार आहे. त्याचबरोबर त्याठिकाणी एक समाधी वृंदावनही आहे. हे मुळीक परिवाराच्या ऐतिहासिक अस्तित्वाची साक्ष देत उभा आहे.मुळीक घराण.

मुळीक हे सूर्यवंशी मराठा घराणे आहे. हे सरदार होते. पश्चिम, दक्षिण महाराष्ट्र व मराठवाड्यात कर्तबगारी. मुळीक सरदार हे मूळ महाराष्ट्रातील. शिवपूर्व काळात, आदिलशाही व निजामशाही राजवटीत आपल्या शौर्याने इनाम वतने मिळवली. त्यांनतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य कार्यात एकनिष्ठ राहिले.

महाराष्ट्रांतील कृष्णाकाठचा वाई परिसर हा महाभारतांतील ज्ञात-अज्ञात कालखंडाचा साक्षीदार आहे.  वाई परिसरांतील मुळे आणि मुळीक – मूळुक ही घराणी ज्ञात आहेत. क्षात्रकुलोत्पन्न मुळीक शिवाजीराजांसोबत डिचोली परिसर मोहिमेंत होते. पुढे काही क्षत्रिय मुळीक त्याच परिसरांत स्थायिक झाले. मुळीक घराण्यांच्या ज्ञात-अज्ञात देऊळांत तलवारीचे पाते पूजिलें जातें.

मुळीक परिवारातील सरदारांनी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती थोरले शाहू महाराज, राजाराम महाराज, महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्यासाठी मराठेशाहीत शौर्य गाजवले.

मुळीक घराण्याच्या वंश शाखेतील एक शाखा जरे जावळीचे वतन करून बादशाहिशी बंड करून वाळेखिंडीची पाटीलकी करून वाटेगाव येथे इमानपण मिळवून राहिले. तर दुसरी शाखा मूळ वतन गाव तासगाव पुणदीचे वतन करून बादशाहिशी बंड करून सातारा पाडळीची पाटीलकी करून वाटेगावला इनाम वतन मिळवून राहिले.

कमाविसदार दिवेकर घराण्यातील पूर्वजांच्या माहितीनुसार मुळीक घराण्यातील सरदारांनी वाटेगावात पाहिले पाऊल टाकले होते. आजही मुळीक परिवाराला गावचे ग्रामदैवत श्री वाटेश्वर देवाच्या पालखीचा पहिला मान असतो.

सदर समाधीचा मुळ चौधरा हा जमिनीत गाडला गेल्याने वर फक्त वृंदावन पाहायला मिळते. तसेच चोथ-या वरील शिवलिंग पहायला मिळते. समाधीचे मुळ चौथरा जर मोकळा केला तर या मुळीक घराण्यातील समाधीचा इतिहास अजून लोंकासमोर येइल. सदर समाधीचे मुळीक घरण्याचे (वाटेगाव ) अभ्यासक व वार्ताहार अतुलराव मुळीक व दिनेशराव दिवेकर यांची भेट झाली.

संतोष मुरलीधर चंदने, चिंचवड पुणे.

Leave a comment