महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

श्री वाटेश्वर मंदिर, वाटेगाव, ता वाळवा

By Discover Maharashtra Views: 1299 1 Min Read

श्री वाटेश्वर मंदिर, वाटेगाव, ता वाळवा –

वाटेगाव येथे पुर्वाश्रमीची भोगावती नदी गावाच्या मध्यभागातून वहात आहे. नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर पुरातन हेमाडपंती श्री वाटेश्वराचे मंदिर पूर्वाभिमुखी आहे. या मंदिराचे काम हेमाडपंती स्थापत्यशैलीचे असून मंदिराला पुर्व, दक्षिण, उत्तर तीन दरवाजे आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यातील शिवलिंगापासून अंदाजे चाळीस फूट लांबीचा पुर्वाभिमुखी सभामंडप आहे. या सभामंडपातून आत गाभाऱ्यात असलेल्या .

श्री वाटेश्वर मंदिरातील शिवलिंगास(पिंडीस)  सूर्योदयावेळी सूर्यकिरणांचा स्पर्श होऊन किरणोत्सव उत्सवास प्रारंभ होतो. याचा कालावधी २० मिनिटेचा असतो.हा किरणोत्सव ५ दिवस साधारण असतो.

या मंदिराचा वेळोवेळी जिर्णोद्धार झालेला आसून एका मंदिराच्या पायरी वरील शिलालेखात भिडे नामक व्यक्तीचा उल्लेख येतो. हे वाटेगावच प्रमुख ग्रामदैवत आसून मंदिराला उंच तटबंदी व घाट व बुरुज याच्या साह्याने  मंदिराची सुरक्षित रचना पाहायला मिळते. मंदिराला ओव-या असून त्यात आत्ता बदल केलेला दिसतो.

संतोष मुरलीधर चंदने. चिंचवड पुणे

Leave a comment