महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

माणिकगड संवर्धन मोहीम | स्वराज्याचे वैभव

By Discover Maharashtra Views: 3618 4 Min Read

माणिकगड संवर्धन मोहीम | स्वराज्याचे वैभव

माणिकगड संवर्धन मोहीम – एकाच किल्ल्यावर जेव्हा संवर्धन कार्य करायचं ठरवता तेव्हा अनेक आव्हाने समोर असतात. संवर्धन करताना सातत्य राहील की नाही. आपण घेतोय ती जबाबदारी पुर्ण पार पडेल की नाही. असे अनेक प्रश्न डोक्यात असतात. संवर्धन कार्य म्हटल की आर्थिक आणि प्रत्यक्षात काम करणारे हात अशा दोन्ही बाजु गरजेच्या असतात.

माणिकगड तसा गड लहान पण हा गड चढताना होणारी पायपीट अत्यंत कठीन आणि त्यात वर जाऊन काम करायचे तेही २ दिवस म्हणजे खर तर आव्हानच. हे आव्हान आम्ही गेली दोन वर्ष अगदी लीलया पेलतोय. अनेक दुर्गभटके येतात स्वतःला जमेल तशी मदत करतात आणि संवर्धन केल्याचा समाधान घेऊन परतत असतात.

निश्चितच आम्हाला काही गड अगोदर होता तसा करणं शक्य नाही पण जे आहे , जे टिकू शकत त्याच संवर्धन करून नक्कीच आपण पुढच्या पिढीला हा ठेवा दाखवू शकतो.

माणिकगडावर आता वाड्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या वाड्याचे संवर्धन करत असताना खुप प्रश्न डोक्यात आहेत. मुळ वास्तुला धोका न लागता योग्य ते संवर्धन होणे गरजेचे. सोबतच वाड्याचे संवर्धन करत असताना मुख्य काम म्हणजे जे वाड्याचे अवशेष आहेत त्या दगडांची योग्य ती मांडणी करणे. कारण चौथर्याचा दगड हा वेगळा , भिंतीचा दगड हा वेगळा. त्यामुळे हे काम जितके साधे वाटत होते तसे ते प्रत्यक्षात नाही.

दिनांक २५ आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन ही मोहीम हाती घेण्यात आली. पहिल्या दिवशी वाड्याचा मधला भाग हाती घेण्यात आला. आधी तेथील खड्डा भरून नंतर बाकीच काम करणे गरजेचे होते.

वाड्याच्या मधल्या भागाची रचना अत्यंत सुंदर आहे. आजपर्यंत फिरलेल्या गडांपैकी या वाड्याची रचना वेगळीच आहे. वाड्याच्या चारी बाजूस एक फुटाची नाळ तयार करण्यात आली आहे. त्या नालेत वाड्याच्या बाहेरहून पाणी आत आणलं आहे आणि वाड्याच्या चहू बाजुंनी फिरवलं आहे. या मधल्या भागात बाजूने पाणी जाण्याची सोय केली आहे तसेच ते जे पाणी येत त्यासाठीही एक वेगळीच पद्धत अवलंबली आहे. खर तर ते पाणी कुठून येत होत आणि त्या पाण्याची गरज बरोबर मधल्या भागात का हा संशोधनाचा विषय आहे. आणि त्यावर नक्किच जाणकारणांकडून मार्गदर्शन लाभणे आवश्यक आहे.
वाड्याच्या संवर्धनात गाडल्या गेलेल्या बाजूच्या पायऱ्या ही मोकळ्या करण्यात आल्यात. वाड्याच्या दरवाजा जो पूर्ण मातीखाली गाडला गेला होता त्यानेही अनेक वर्षांनंतर मोकळा श्वास घेतला. तसेच जे वाड्याच्या बांधणीचे दगड सापडले त्याचे ही योग्य ते संवर्धन करण्यात येणार आहे. वाड्याचा मुळ रूप लवकरच दुर्गभटक्यांसमोर येईल याची खात्री आहे. वाड्याच्या संवर्धनात मडक्यांचे तुकडे ही सापडले आहेत. ते नेमके कधीचे आहेत याची माहिती लवकरच घेऊन ती सर्वांना कळवण्यात येईलच.

आता विनंती त्या सर्व सह्याद्री लेकरांना माणिकगड एका वेगळ्या रुपात पुन्हा उभारी घेतोय गरज आहे ती आपल्या कष्टकरी हातांची. स्वराज्याचे वैभव आपणा सर्वांना विनंती करत आपला सहभाग संवर्धन कार्यात असण गरजेच.

मोहिमेत नेहमीप्रमाणे पनवेल च्या संस्था सहभागी झाल्या. यांचे कौतुक करावे तितके कमीच. कायम हाकेला धावुन येतात. अशीच साथ कायम मिळत राहो हीच इच्छा.

विशेष सूचना : माणिकगडावर वाड्याच्या संवर्धनाचे काम स्वराज्याच्या वैभव समूहातर्फे होत आहे. कृपया वाड्याच्या ठिकाणी कोणतीही घाण अथवा जेवण वैगरे करू नये.  ज्यांना या संवर्धन कार्यात सहभागी व्हायचे आहे त्या दुर्गभटक्यांनी फेसबूक पेज मार्फत सहभाग नोंदवावा.

स्वराज्याचे वैभव
माणिकगड संवर्धन समिती




माहिती साभार – स्वराज्याचे वैभव

Leave a comment