महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,82,928

किल्ले गडकोट संवर्धन

By Discover Maharashtra Views: 9976 9 Min Read

किल्ले गडकोट संवर्धन

किल्ले गडकोट संवर्धन काळाची गरज आहे.Promotion of fort. आजच्या यांञीकी जिवनात आपण आपली संस्कृती विसरलो आहे. अगदि 1948 पासुन राजकीय नेते मंडळी नी किल्ले गडकोट भारतीय संस्कृती कडे दुर्लक्ष केले आहे.

आज आपण जिकडे तिकडे पहाता किल्ले गडकोट यांच्या वर तरून युवक युवती काॅलेज च्या नावाखाली फीरायला जातात व किल्ले गडकोट यांच्या भींतींवर, तटबंदी वर स्वताची नावे लिहतात. ना ना तह्रेचि चिन्हे काढतात. महाराष्ट्रात तब्बल 354 किल्ले आहेत, पण त्यातील एकाही किल्ल्याला छञपती शिवरायांनी स्वताचे नाव दिले नाही. अथवा छञपती संभाजाराजे यांनी, नाही छञपती राजाराम महाराज, नाही छञपती थोरले शाहु महाराज, नाही हिंदवी स्वरांज्याच्या एकाही छञपतींनी साध्या एका किल्ल्याला आपले ना दिले नाही. मग आपण हा मुर्ख पणा का करतो? तटबंदी भींतींवर आपली नावे का काढतो? हा संशोधनाचा विषय अहो. अहो जिथे छञपतींनी त्यांच्या मावळ्यानी स्वताच्या रक्ताचा अभिषेक घालुन हे हिंदवी स्वरांज्य निर्माण केले. किल्ले गडकोट उभे केले. परकीय सुलतानी सत्तांच्या जुलमातुन हा हिंदुस्थान मुक्त तो याच किल्ले गडकोट यांच्या च मदतीने. आऊसाहेब जिजाऊंना एक एक गड हा आपल्या मुलासारखा होता तर शिवरायांना हे सर्व किल्ले गडकोट आपल्या भावंडा प्रमाणे, सवंगड्यां प्रमाणे होते. शिवरायांना सैह्याद्रीची खरी ओळख व मैत्री करून देनारे विर बाजी पासलकर.

गड किल्ले संवर्धन

आज हिंदवी स्वरांज्याचे खरे वैभव नामो शेष होण्याच्या मार्गावर आहे. कईक ट्रेकर ट्रेकींग ला जातात खरे पण ट्रेकींग च्या नावाखाली दारूच्या पार्ट्या नाच हे असले चाळे करत असतात. 31 डीसेंबर ला तर या माथे फिरूंची अक्कल शेन खालया जाते. किल्ले गडकोटांवर जाऊन दारूच्या पार्ट्या करतात. शहरांच्या लगत जे किल्ले आहेत त्यांच्या वर आणि टुरिष्ट पाॅईंट लगत असलेल्या किल्ले गडकोट यांच्यावर तर दारूचे प्रमाण तर भयंकर आहे. जसे कि प्रबळगड, वसईचा किल्ला, किल्ले माहुली, सिंहगड, किल्ले कुलाबा, किल्ले विसापूर, लोहगड, अजिंक्यतारा, पन्हाळगड या किल्ल्यांवर प्रेमी युगल, दारूडे, टवाळखोर हे जाऊन किल्ल्यांचे पावित्र्य भंग करत आहेत. किल्ल्यांची नासदुस करत आहेत. यावर जर वेळीच पायबंद नाही घातला तर किल्ले नामोशेष होण्यास वेळ लागणार नाही.

गड किल्ले संवर्धन

आपनास जर गड सवंर्धन करायचे असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. किल्ल्यांवर फिराय जाते वेळी आपण सोबत किमान एक मोठी थैली घेऊन गेल पाहीजे व जो ही कचरा, प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, शीगारेट चे टुटके, प्लास्टिकच्या पिशव्या असा जो ही कचरा भेटेल तो त्या मोठ्या थैलीत टाकुन गडावरून उतरते वेळी खाली घेऊन एने व पायथ्याला असलेल्या कचरा कुंडित फेकुन देणे. आपण पावसाळ्या मधे गेलो तर किल्ल्याच्या तटबंदी वर इमारतींच्या अवशेषांवर उगवलेली झाडे झुडपे उपटुन टाकणे. याणे खुप मोठे कार्य आपल्या हातून घडले. ते म्हणजे असे की आपण ती झाडे झुडपे उपटुन टाकतो म्हणुन ती तटबंदी, भींती जश्यास तश्या राहतात. त्यामुळे ते अवशेष पडझड होण्याची भीती नसते. तसेच आपण खीश्यातुन झाडांच्या बिया घेऊन जाणे व वाटेच्या बाजुला चीकलाच्या गोळ्यात ठेऊन टाकणे.

पावसाळा सोडून इतर वेळी जाताना किल्ल्यांवर कजरा जास्त होतो. तो करचा आपण उचलुन कचरा कुंडीत टाकला पाहिजे. पाण्याच्या टाक्या मधे ही कचरा दगड माती साचलेली असते ते टाक उन्हाळ्यात साफ करण्यासाठी सोपे पडते. तसेच आलेले गवत, झाडे, झुडपे हि सुकलेली असतात त्याना उपटुन साफ करणे गरजेचे असते. मंदिराच्या आवारात प्रवेश करताना आजु बाजुच्या ठिकाणी निरीक्षण करणे कारण तीथे मातीमधे काही गोष्टी शिल्पे असण्याची शक्यता नाकारता एत नाही. किल्ल्यांवर राज घराण्यातील व्यक्तींच्या, सरदार, शिलेदार, मावळे यांच्या समाद्या ही जिर्ण अवस्थेत दिसुन एतात. कइक ठीकाणी तर समाध्या आहेत, दिसुन ही एतात पण त्या नक्की कोनाच्या आहेत हे समजत नाही. अगदि स्वतंत्र पुर्व काळापासून त्यांच्या कडे झालेल्या दुर्लक्षित पणा मुळे आज ही परस्थीती निर्माण झाली आहे. आज त्यांचे ही संवर्धन होणे गरजेचे आहे. तसेच ज्या गावास ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे त्या गावांमधे समाधी स्थळे आहेत उदाहरण म्हणजे सातारा जिल्ह्यातील संगम माहुली या ठिकाणी छञपती थोरले शाहु महाराज, छञपती महाराणी ताराराणि यांची ही समाधी आहे.

गड किल्ले संवर्धन

अजुनही छञपती घराण्यातील व्यक्तींच्या समाध्या त्या ठीकाणी आहेत. शेजारीच क्षेञ माहुली या ठीकाणी ही ऐतिहासिक वास्तू हिंदु धर्माचे पुरावे, हिंदु धर्म संस्कृति दिसुन एते. मांडवे या गावी ही सरसेनापती धनाजी जाधवराव यांची व यांच्या घराण्यातील व्यक्तींच्या समाध्या आहेत. बोरगाव, नागठाणे या ठीकाणी शिवकालीण शिल्पे यांचे अवशेष आहेत. गणेशवाडी या ठीकाणी तर हजारो वर्षांच्या अगोदर च्या काळातील विहीर आहे.त्यामधे घोडाच काय पण हत्ती ही जाऊन पाणि पिऊन एऊ शकतो.

गड किल्ले संवर्धन

किल्ल्याच्या दरवाज्यातून आत जाते वेळी दरवाज्यावर, बुरूंजावर असलेली शिल्पे आठवणी ने पहावीत त्यातुन आपणास किल्ला कोनत्या काळातील कोनत्या राज्याने बांधला हे समजु शकते. मंदीर, पाण्याच्या टाक, तटबंदी, इमारती च्या भींतींचे अवशेष, बुरूंज यांच्या वरती विषेश अशी शिल्पे आपनास पहायला मीळतात. इतिहासात त्या प्रत्येक शिल्पास वेगळे महत्त्व आहे. किल्ल्यांचा गडकोटांचा अंभ्यास करते वेळी या गोष्टी महत्वाच्या असतात. तसेच मोडी लीपीतील शिलालेख ही दिसुन एतात. राजधानी किल्ले रायगड वरती राज्याभिषेकाच्या वेळी चा एक शिलालेख आपनास आढळतो. व शिवप्रतीष्ठाण हिदुस्थान मुंबई जिल्हा अध्यक्ष व इतिहास अंभ्यासक बळवंतराव दळवी यांनी सुवर्णम सिहासणाच्या संकल्पा वेळी त्या शिलालेखाचे छान वर्णन केले आहे ते युट्युब वर पोष्ट केले आहे. त्याच बरोबर समाधी स्थळी असलेल्या शिलालेखा वरून आपण सहजच तर्क बांधु शकतो की ती समाधी कोनाची असावी.

गड किल्ले संवर्धन

लढताना विरमरण आले असेल तर शिलालेखावर तसी शिल्पे दिसुन एतात. क्षञीय व ब्राह्मण यांच्या समाधी मधे फरक असतो. तसेच सतीशिळा म्हणजे एखाती महीला सती जाते तेव्हा तीच्या सभादीस्थळी दगदी शिल्प शिलालेख बसवला जातो त्यास शिलालेख म्हणतात. वाई तालुक्यातील एका गावामध्ये खुप अश्या सतीशिळा आहेत. तसेच सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या गावी तळबीड जिल्हा सातारा या ठिकाणी ही सतीशिळा पहाय मीळतात.

गड किल्ले संवर्धन

किल्ल्यांवर तोफा आहेत जास्त करून जे जलदुर्ग आहेत त्या वर तोफा भरपुर प्रमाणात आहेत. ‘किल्ले कांसा उर्फ पद्मदुर्ग वरती तब्बेत 50 तोफा आहेत.’ समुद्राच्या मधे असलेल्या गोड्या पाण्याचे टाक, हे पाहणे व तेथील इंजिनीयरींग विशीष्ठ अंभ्यास करण्या सारखी आहे. तसेच जंजीरा, शिधुदुर्ग, किल्ले कुलाबा या किल्ल्यांवर अजुनही खुप तोफा पहायला मीळतात. तसेच रायगड, राजगड, शिवनेरी, सिंहगड,किल्ले रेवदंडा (भुयकोट) या किल्ल्यांवर ही तोफा पहायला मीळतात. अलीबाग मधे खोल समुद्रात, असलेला किल्ले कुलाबा या ठीकाणी गोड पाण्याची वीहीर ही पाहीली कि आपण विचार करायला भाग पडतो. पण वाईट या गोष्टीचे वाटते की हा किल्ला दारूचा अड्डा झाला आहे. 2016 मधे शिवछावा शंभुराजे प्रतिष्ठान ने काढलेल्या गडकोट मोहीमेत 15 पोती कचरा, 3 पोती दारूच्या मोकळ्या बाटल्या सापडल्या.किल्ल्यांवर गुप्त भुयारे, खलबत खाणे, भुयारी चोर वाटा हे ही आपनास पहायला मीळते.

गड किल्ले संवर्धन

किल्ले रायगड वरती खलबत खाना आपनास पहाय मीळेल, तो अत्ता ही खुपच उत्तम पद्धतीत आहे. खलबत खाना हा जमीनीच्या खाली असतो. तेथे गुप्त बैठका होतात. लढाई वेळी शञुच्या पासुन जखमी झालेल्या सैन्यांवर उपचार, झालेल्या जखमा शेकाय साठी उपयोग केला जातो. किल्ल्यांवर असलेले राजवड्याचे अवशेष, तटबंदी यांच्या किनारी जर पाहीले तर मशाली लावण्या साठीच्या जागा आपनास दिसुन एतात. तसेच किल्ले सिंहगड पुणे एथे घोडयाच्या पागा आहेत. “पागा मधे घोडे ठेवले जायचे.” धांन्ये कोठार- धांन्ये ठेवण्यासाठी भुगर्भात (कनींग) बनवलेली असते. जेणे करून धांन्याचा साठा शञुच्या नजरेस न पडावा म्हणून. काही किल्ल्यावर तर धांन्य कोठाराच्या इमारती आहेत. कोल्हापुर मधे पन्हाळगड वरती धान्य कोठार उत्तम अवस्थेत व मोठ मोठी आहेत. तसेच सातार चा किल्ला अजिंक्यतारा वरती भुगर्भात बनवलेली धान्य कोठार आहेत. त्यांचे ही संवर्धन होणे खुप गरजेचे आहे.

सर्वात महत्वाचे

किल्ले गडकोटांवर आपनास जर एखाद्या वेळेस आपनास विचीञ प्रकार घडत असताना दिसले तर शंक्य झाले तर स्थानिक पोलीस स्टेशन मधे तक्रार करा फोन द्वारे किंवा 100 नंबर वर फोन करा. पण हे करते वेळी किंवा संबंद्धीत व्यक्तीना रोखते वेळी आपल्या मोबाईल मधे फोटो व व्हीडीओ कराय विसरू नका. नाहीतर आपण हे न करता जर रोखले तर या लोकशाही मधे आपनास दोशी ठरवले जाईल. याला जिवंत उदाहरण म्हणजे किल्ले विसापूर पुणे, वरती 31 डीसेंबर 2017 रोजी शिवव्याख्याता वाघीन रसीका वरूडकर व त्यांचे साथीदार किल्ले विसापूर वरती होत असलेल्या दारू पार्टी व टेप रेकाॅर्डर लावुन चाललेल्या पार्टीला विरोध केला. त्या ठीकाणी शालीनी झाला व त्यांचे सहकारी यांना विरोध केला पण ते करते वेळी कोनते ही पुरावे, व्हीडीओ लेकाॅडींग केले नाही. शेवटी झाल काय तर केस झाली. व संत्याचा गळा घोटला.

लेखक
दुर्गवेडा कृष्णा घाडगे
अध्यक्ष:- हिंदवी स्वरांज्य गडकोट समीती
सदस्य:- मराठा साम्राज्य संघ
अध्यक्ष:- शिवछावा शंभुराजे प्रतिष्ठान सातारा जिल्हा.

1 Comment