महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

मावळ तालुक्यातील अपरिचित रत्न

By Discover Maharashtra Views: 3840 4 Min Read

मंगरुळ –

(मावळ तालुक्यातील अपरिचित रत्न)

शिवाजी महाराजांनी  हिंदवी  स्वराज्याची सुरुवात बारा मावळातुन केली. हा प्रदेश लहान असला तरी त्याची व्याप्ती खुप मोठी होती. हा बारा मावळातील  काही भाग सपाट भुभाग तर काही ठिकाणी गर्द झाडी जंगल  डोंगर दर्‍या आणि  नद्यांनी वेढलेला होता. मावळतालुक्यातील एक रत्न म्हणजे मंगरुळ.

मंगरुळ डोंगरस भेट द्यायची झाल्यास पुणे मुंबई हायवेवर असलेल्या तळेगाव एमआयडीसी रोड ने जाता येते. तसे पाहता हायवे वरुनच हा डोंगर नजरेस पडतो तेव्हा आपल्याला सपाट भुभागावर  असलेले त्याचे भौगोलिक स्थान कळते. त्या डोंगराची उंची समुद्र सपाटीपासून  २६०० च्या आसपास आहे.  हायवे पासुन साधारण सात ते आठ किलोमीटर वर आंबी गावाकडे जाणाऱ्या रोड वरुन गोळे वाडी या डोंगराच्या पायथ्याशी जाता येते. डोंगरवर जाणाऱ्या दोन तीन वाटा आहेत. मंगरुळवाडी गोळेवाडी शेटेवाडी इत्यादी …सर्वात सोपी म्हणजे गोळेवाडीची पायवाट ….ही पायवट मळालेली तसेच पायर्‍यांची सुकर वाट आहे. मंगरुळवाडीतुन येणाऱ्या वाट देखील  गर्द झाडीतुन तसेच काही ठिकाणी पायऱ्या असलेली वाट आहे याच वाटेवर एक गुहा सुद्धा आहे असे गावकरी म्हणतात .तर गोळेवाडीतुन गड माथ्यावर जाण्यास पाऊण तास ते एक तास लागतो .ही वाट खडी चढणीची व दमछाक करणारी आहे .या वाटेने आपण आल्यास काही ठिकाणी रुंद तर काही ठिकाणी प्रशस्त दगडी पायऱ्या कोरलेल्या आहेत. तर माथ्याच्या थोडे खाली चौथरा सदृश जागा दिसते तर त्याच्या ही पुढे जाऊन वर पोहचताच चौकोनी चौथरा तासुन  काढलेला नजरेस पडतो. तसेच काही अंतर पुढे आल्यावर उजव्या बाजुस पाण्याचे टाके आढळते.

हे टाके पाहून झाल्यावर  एक वाट वर वर तर दुसरी डाव्या बाजुची पायवाट कड्यावर व पाण्याच्या टाक्यांकडे जाते. याच पायवाटेने आपण सरळ पुढे जाऊन हजरत शाहादवल बाबा दर्ग्याकडे पोहोचतो. प्रशस्त असलेल्या या  दर्ग्याला देखील जुन २०२०मध्ये आलेल्या वादळाचा तडाखा बसला. दर्ग्यावरील छताचे नुकसान झालेले आहे. दर्ग्यात प्रवेश करताच समोर पिराचे ठाणे दिसते तर उजव्या बाजुस दर्गामध्ये यात्रेत वापरत असलेली भांडी दिसतात. बाजुस एक दगडी घोडा तसेच दगडी दिवटी नजरेस पडते. हे सगळे बघुन आल्या वाटेवर  जाऊन डाव्या  बाजुच्या पायवाटेने  चालत पुढे आल्यावर  दगडात कोरलेले आयताकृती  खांब टाके दिसते .त्याच्याच बाजुला दुसरे एक आयता कृती टाके नजरेस येते .हे पाहून थोडे पुढे आल्यावर आपण  ताशीव कडावर येऊन थांबतो . हि कड्याची बाजु गोळेवाडीतुन बघितल्यावर आपल्याला शिव जन्म भूमी शिवनेरी किल्याची आठवण आल्या शिवाय राहत नाही. तिथुन नजर टाकल्या लांब पर्यन्तचा प्रदेश   दिसतो. तसेच पवन मावळातुन नागमोडी वळणे घेत  येणारी इंद्रायणी  नदी दिसते त्याच्याच बाजुला रेल्वे मार्ग देखिल दिसतो.

उजव्या बाजूस बघितल्यावर आंद्रा धरण ( मंगरुळ धरण) व त्याचा पसारा  नजरेस पडतो. हे सगळु बघुन झाल्यावर पाण्याच्या टाक्याजवळील पायवाटेने आपण हजरत शाहादावल बाबा पिराच्या ठाण्याजवळ येतो तिथुन लांब दुरवर डाव्या बाजुला धरण व सह्याद्रीची रांग व उजव्या बाजुस सपाट भुभाग आणि तसेच तळेगाव एमआयडीसी व  तळेगाव शहराचा चाललेला विकास दिसुन येतो .पिराच्या उजव्या बाजुन काही अंतरावर अजून एक पिराचे ठाणे नजरेस पडते .हे ठाणे नक्की कुणाचे काही सांगता येत नाही .ते पाहुन झाल्यावर पुढे छोटे पठार लागते .हे पाहुन झाल्यावर फेरी  पुर्ण होते. फेरी पुर्ण करण्यास  एक तास भर पुरेसा  होतो . घेरा छोटा असल्यामुळे याचा वापर शिव पुर्व काळात व तसेच शिवकाळात याचा वापर हा टेहाळणी चौकी किवा टेहाळणी गड? तसेच किवा पहार्‍याची चौकी म्हणूनच होत असेल असा अंदाज येऊ शकतो!

(गड म्हणुन अजुन कुठेच उल्लेख नाही मिळाले अभ्यासक लोकांना…लेखात फक्त शक्यता वर्तवली आहे!)

Facebook – Nitin Kemse

Leave a comment