कुरवपूर | श्रीपाद वल्लभ यांचे तपस्या स्थान

कुरवपूर | श्रीपाद वल्लभ यांचे तपस्या स्थान

कुरवपूर | श्रीपाद वल्लभ यांचे तपस्या स्थान –

दत्त अवताराचे कलीयुगातील प्रथम अवतार श्री श्रीपाद वल्लभ यांचे तपस्या स्थान व कार्यभूमी कुरवपूर. या भागात श्रीपाद वल्लभ यांचे मंदिर असुन गाभा-यात तीन मुखाची दत्त रुपात मुर्ती आहे. मंदिरात दर्शनासाठी सोवळ्यात जाव लागत ते तिथील वापरुन परत जागे वर ठेवायच.

कुरवपूर हे रायचूर (कर्नाटक) जिल्ह्यात असुन अतकूर गाव हे रायचूर पासुन ३० कि.मी वर आहे . अतकूर गावातून मंदिरात जाण्यासाठी टोपली च्या बोटी ( पुट्टी) त बसुन २० मीनिटात आपण पलीकडच्या टोकावर जातो. कुरवपूर हे कर्नाटक व तेलंगणा यांच्या सीमेवर क्रूष्णा नदीच्या तिरावर एका बेटेवर वसलेले आहे. टोपलीच्या बोटीतुन प्रवास रोमांचकारी असुन क्रूष्णा नदीचा पात्र मोठ व खोल आहे.

‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ चा जप होई पर्यंत नय्या नदीपार झालेली असते.

पैलतीरा वरुन वीस मीनिटाच पायी प्रवास असुन आपण अतकूर गावात पोहचतो तेथेच वल्लभ स्वामींचे मंदिर असुन मोठ्या गोपुरातून आत प्रवेश केला की समोर मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली नागदेवता,शिवलींग,दिपमाळ,पादुका ,नंदी आहेत. मुख्य मंदिर तेथेच असुन आत मध्ये दत्ताचे स्थान आहे.मंदिरा जवळ तेलंगणाची क्रूष्णा नदी वाहात असुन पाय-या नी आत उतरायला सोय केली आहे.

मंदीराच्या बाजुलाच एक गुहा असून त्यात टेंबे स्वामींनी तप केरुन दत्त महाराजांचा अनुग्रह प्राप्त केला. पुजारींना अधी फोन करुन सांगीतल तर जेवणाची सोय होउ शकते.हार.फुले,प्रसादाची दुकाने नाहित.

संतोष चंदने , चिंचवड पुणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here