महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,92,820

गणपतीपुळे | Ganpatipule

By Discover Maharashtra Views: 1399 2 Min Read

गणपतीपुळे | Ganpatipule –

सह्याद्रीच्या रांगांमधील हिरवीगार वनराई, स्वच्छ सुंदर रुपेरी समुद्रकिनारा तसेच आंबा, काजू, नारळ, पोफळी व इतर हिरवळीने नटलेल्या निसर्गाची अप्रतिम उधळण असलेल्या सर्वांगसुंदर अशा समुद्रकिनाऱ्यावर कोकणातील गणपतीपुळे(Ganpatipule) हे येथील श्री गजाननाचे स्वयंभू देवस्थान आहे.

गणपतीपुळे येथील श्रीगणेशाचे स्थान हे स्वयंभू आहे. श्री गणेशस्वरुप असलेलं स्वयंभू पाषाण समुद्रसपाटीला समांतर आहे. सध्या दिसणाऱ्या मंदीराच बांधकाम सन १९९८ ते २००३ या कालावधीत सुरु होतं. प्राचीन भारतीय स्थापत्यकला डोळ्यासमोर ठेवून नव्या मंदिराची उभारणी करण्यात आली. उंच घुमटाकृती गर्भागार आणि सभामंडपावरील नक्षीदार छप्पर संधीप्रकाशात डोळ्याचं पारणं फेडतात. मंदिराच्या दक्षिणोत्तर दोन्हीं बाजूला पाच त्रिपूरं आहेत.

मंदिराच्या आत शिरतांना बाहेर एक भलमोठा मोठा मूषक नजरेस पडतो. हे गणपतीचे मंदिर डोंगराला लागून असल्याने, मंदिराला प्रदक्षिणा घालयाची असेल तर संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालावी लागते. या टेकडीचा परीघ साधारण हा एक किलोमीटर अंतरचा आहे.

मंदिर परिसरात अनेक दुकाने आहेत यामध्ये लाकडी खेळणी, विविध आकारातील गणपतीच्या मूर्ती,पुजा साहित्य विकणारे यांचा मोठ्याप्रमात समावेश आहे. गणपतीपुळे  येथील सुंदर समुद्र किनाराही पर्यटकांना खूणावत असतो. पाण्यात उतरण्या आधी सर्व माहिती घ्यावी.

अंगारकी, संकष्टी आणि माघ महिन्यातील चतुर्थीला येथे मोठी यात्रा भरते. परिसरातील उद्यान आणि मंदिर परिसराच्या सुशोभीकरणामुळे हे देवस्थान भाविक आणि पर्यटकांचे एक प्रमुख आकर्षण बनले आहे. या परिसरात अनेक चांगली हॉटेल्स असून घरगुती निवास व्यवस्था मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. रत्नागिरीहून ३५ कि.मी. अंतरावर समुद्राकाठी हे लोभस ठिकाण वसलेले आहे.

माझी भटकंती / Maazi Bhatkanti 

Leave a Comment