हिम्मतबहाद्दर चव्हाण घराणे

हिम्मतबहाद्दर चव्हाण घराणे

हिम्मतबहाद्दर चव्हाण घराणे –

आपल्या अलौकीक पराक्रमाने सार् या मराठामंडळाचे डोळे दिपवणारा पराक्रम करून राजाराम महाराज यांच्या कडून हिम्मतबहाद्दर किताब पटकवणारे विठोजी चव्हाण या पराक्रमी पुरूषाने सन 1689 मिळवला. यानंतर पुढिल दिडशे वर्षे मराठ्यांच्या इतिहासात हिम्मतबहाद्दर चव्हाण घराणे आपल्या पराक्रमाची तलवार गाजवत राहिले हेच चव्हाण घराणे सोलापूर जिल्ह्यातील तोंडले बोंडले गावचे होय.

या चव्हाण घराण्याचे सर्व पुरूष पराक्रमी आणि दिर्घआयुषी निपजले शहाजीराजे यांच्या कारकिर्दीपासून ते करवीरचे दुसरे शिवाजीराजेंपर्यंत यांची कारकिर्दी जवळपास दिडशेवर्षांची होती. या कारकिर्दीत राणोजी विठोजी उदाजी आणि प्रितिराव या चार पुरूषांनी मराठ्यांच्या राज्यासाठी फार मोठे पराक्रम केले आहे.

वरील उल्लेखलेल्या चार पराक्रमी पुरूषांपैकी तीघे ही धारातीर्थच पडले आहेत आणि प्रितीराव ही लढाईतील जखमांनी मृत्यू पावले अशा घराण्याच्या चार ही पिढ्या रणांगणावरच गेल्या हेच घराणे मुळचे पंढरपूर तालुक्यातील तोंडले बोंडले येथील होय.

चव्हाण घराण्याची रणभूमीवरील सुरूवात पाहू

बालोजीराव हे या चव्हाण घराण्याचे मुळ पुरूष होय . शहाजीराजे यांच्या पदरी असलेले बालोजीराव हे निजामशाहीपासून शहाजीराजे यांच्या सोबत होते. शहाजीराजे आदिलशाहीत गेल्यावर ही बालोजीरावांनी शहाजीराजे यांची साथ सोडली नाही म्हणून त्यांना पायदळाची सरदारकी मिळाली . बालोजीरावांना राणोजीराव हे पुञ होते ते ही शहाजीराजे कर्नाटकात असताना राणोजीराव पदरी होते. स्वराज्य स्थापनेत ज्या मुसद्दी आणि पराक्रमी लोकांना शहाजीराजे यांनी शिवाजीराजेंबरैबर पाठवले त्यात राणोजीराव ही होते.

बेंगलोरहून शहाजीराजे यांनी पाठवून दिलेल्या राणोजींना शिवरायांनी पायदळाची सरदारकी दिली. राणोजीरावांनी आपल्या पराक्रमाने एक किल्ला जिंकून घेतल्याची नोंद आहे पण नाव समजत नाही असो म्हालोजीबाबा घोरपडे आणि राणोजींचा आप्तपणाचे संबंध होते.

शिवरायांनी सुरतेची लुट ही दोन वेळा केली या दुसर्या लुटित राणोजीराव शिवरायांसोबत होते. सुरतेची मोहिम 1670 साली झाली आणि स्वराज्यात सुखरूप दाखल झाले. राणोजीरावांनी अनेक मोहिमांमध्ये सहभाग घेतले अखेर 1674 साल हे उलटे पडले सिद्दिच्या ताब्यातील गोवळकोटावर शिवरायांच्या फौजेने हल्ला केला त्यात मराठ्यांना यश मिळाले नाही आणि मुरब्बी आणि पराक्रमी राणोजीराव सन 1674 साली मारले गेले यांच्या मृत्यू ने ही शिवरायांना नक्कीच दुःखाचा डोंगर कोसळला असेल कारण हे खुद्द शहाजीराजे यांनी नेमूण दिलेले विश्वासू मातब्बर होते.

राणोजीरावांचा मृत्यू हा राज्याभिषेकानंतरचा तर शिवछञपतींचा राज्याभिषेक पाहण्याचे नेञसुख समोरासमोर नक्कीच राणोजीरावांना घडले असावे. अशा राणोजींच्या मृत्यूनंतर दोन पुञांपैकी म्हालोजीबाबांच्या विनंतीवरून विठोजीस सेवाचाकरीची सरदारकीची वस्ञे मिळाली. अर्थात विठोजी हे म्हालोजींच्या सानिध्यात वाढले असावे त्यामुळेच विठोजींना म्हालोजींची साथ मिळत असावी.

शिवछञपतींच्या निधनानंतर विठोजींनी म्हालोजींबरोबर अनेक मोहिमांमध्ये भाग घेतले होते. म्हालोजी हे सुध्दा शहाजीराजे यांच्या पदरी असलेले पराक्रमी सरदार शिवछञपतींच्या संपुर्ण कारकिर्दीत बारकाईने अनुभव आणि प्रत्येक मोहिमेचे बारकावे जाणकार असणारे म्हालोजींच्या पथकात असल्याने नक्कीच विठोजीस चांगलीच युध्दनिती मिळत गेली होती.

संभाजी महाराज यांना शेख निजामाने 1689 साली फेब्रुवारी महिन्यात संगमेश्वरी पकडले तेव्हा बादशहाची छावणी अकलूजला होती. तेथून तो पेडगाव नंतर वढू कोरेगाव छावणी करून होता. यावेळी बादशहा विजयाच्या शिखरावर पोहचला होता विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतूबशाही अशा दोन मजबूत शाह्या नेस्तानाबूत करून तो शिवछञपतींनी स्थापन केलेले स्वराज्यावर वळला होता. या बावीशी तेवीशीतल्या नवख्या संभाजी महाराज यांनी सतत नऊ वर्षे दिल्लेश्वरास जेर करून सोडले होते पण काळाने घात केला आणि कैदेत सापडल्यावर 11 मार्च 1689 साली वढू तुळापुरी क्रुरतेने हत्या करण्यात आली . संभाजी महाराज यांनी बादशहा समोर हुतात्म्य पत्कारले पण त्यास शरण आले नाहीत हे सर्व मराठा सरदारांनी लक्षात घ्यावयाला हवे होते पण संभाजी महाराज यांच्या हत्येमुळे सर्व मराठे हतबल झाले होते तरीही येसूबाईंनी रायगडावर सावरासावर करून राजाराम महाराज यांच्या सोबत मुरब्बि मंडळी दिली आणि गडउतार झाले. तरीही राजधानीपर्यंत कोणाची ही मजल गेली नव्हती पण आज थेट राजधानी पाडाव होणार पाहून मराठे गाफिलच झाले म्हणावे लागतील जोश आणि पराक्रम बाजूलाच राहिला पण औरंगजेबापासून बचाव करीत प्रतापगड वासोटा सातारा आणि पन्हाळागड असा धावपळीचा प्रवास करत पन्हाळ्यास आले.

मराठा मुलखात आलेली ही मरगळ दुर करावयाची होती संताजी घोरपडे आणि त्यांचे दोन बंधू मालोजी आणि बहिर्जी धनाजी जाधवराव आणि विठोजी चव्हाण एक विलक्षण धाडसी बेत आखण्याच्या विचारात गर्क होते. बादशाही फौजेला नामोहरण करणे शक्य नव्हते छञपती राजाराम महाराज पन्हाळ्यावर तर बाल शिवाजीराजे आणि येसूबाई कैदेत आणि अशा वेळी कोणत्या योजनेने बादशहाला पाणी दाखवायचे याचा विचार आणि खलबते फलटणच्या बाजूस असणारे धनाजी जाधवराव आणि संताजी घोरपडे यांच्यात सुरू होती.

संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर बादशहाचा तळ तुळापुरीच होता. जाधवराव आणि घोरपडे यांच्यात सल्लामसलत झाल्यावर थेट औरंगजेबाच्या छावणीत घूसुनच संभाजी महाराज यांच्या खूनाचा बदला घ्यावयाचे ठरले आणि बादशहास छावणीतच दफे करावयाचे ठरले. दोन हजारी शिलेदारांसोबत विठोजी चव्हाण संताजी घोरपडे आणि दोन बंधू अशी फौज तयार केली आणि छावणीवर हल्ला करावयास पावसाळा निवडला मोहिमेचे नियोजन आणि नेतृत्व संताजीराव करीत होते . सर्द हवेमुळे अचानक झालेल्या हल्ल्यात शञूसैन्याला तयार होता येत नसल्याने पावसाळा निवडला पावसाळ्यात मोहिमा थंडावतात तर पावसाळ्यात शञूसैन्य देखील राहूट्यात विसावलेले असते. या सर्व बाबींची माहिती काढून जाधवरावांकडील फौज घेऊन दोन हजारी फौज घेऊन सर्वांनी जेरूरीस दर्शन घेतले आणि अंधार पडण्यापुर्वी दिवेघाटात झाडीत लपले येथे दिवसभर विश्रांती घेऊन अंधार्या राञी छावणीकडे धाव घेतली . छावणीभोवती अनेक तपासणी चौक्या होत्या त्यासाठी खासे स्वार तपासणीस असतं पथकांची तपासणी झालेबगैर आणि खानाखूना पटल्याशिवाय छावणीत प्रवेश मिळत नाही हे संताजीरावांना अगदि चांगलेच माहिती होते. म्हणूनच तर शिर्के मोहिते यांची पथके असल्याचे दाखवून छबिण्याची पथके आहोत पावसाळ्याने परतलो अश्या पक्क्या खुना दर्शावून तपासणी चौकीतून बिनबोभाट छावणीकडे येण्याचा अडथळा दूर केला.

या सर्व शिलेदारांनी अचानक हल्ला केला पण बादशहा त्या छावणीत नव्हता गुलालबारात असलेलेली सोन्याचांदिची भव्य अशी छावणी काही तासांतच लुटून कापून तोडून मोडून सुर्यादयबरोबर सिंहगडी पायथा गाठला . गडावर प्रतापरावांचे पुञ सिदोजी होते या पथकांची चांगली दोन दिस बडदस्त ठेवली आणि पुन्हा संताजी विठोजी मालोजी बहर्जी यांनी झुल्फिकरखान हा राजधानी पायथ्यावर फौज घेऊन असताना त्यावर हल्ला चढवला मोगली सैन्याचे लढाऊ पाच हत्ती आणि घोडी लूटून ही भव्यदिव्य पराक्रमाचा खजिना थेट छञपतींसोमर आणला.

अशा अद्भूत पराक्रमाने मराठे पुन्हा जोमाने लढू लागले हर्षौत्कर्षीत होऊन उत्सहाने मोगली सैन्यावर तुटून पडू लागले अशा या भिमपराक्रमास खुश होऊन विठोजीस हिम्मतबहाद्दर संताजीस ममलकतमदार बहर्जीस हिंदुराव तर मालोजीस अमीर अल उमराव असे किताब बहाल केले.

मराठा सरदारांनी नव्या जोमाने मनगटातील संपुर्ण बळाने तरवारी रणांगणावर उभ्या केल्या आणि दिल्लेश्वर सारख्या बादशहाला धडकी भरवून टाकणारा पराक्रम या विठोजींनी अवघ्या वीस बावीस वयातच केला.

आजपर्यंतच्या इतिहासात म्हणजे छावणीच्या हल्ल्याअगोदर … अनेक बड्या राजेंना या आदिलशाही असो वा मोगली दरबारी जाऊन मान खाली घालून मुजरा करावा लागतं होता पण छञपतींच्या या स्वराज्यामुळेच निडरपणे छञपतींच्याच शिलेदारांनी थेट बादशाही छावणीत कापून काढल्याने बादशहा 1689 च्या या हल्यापासून तो थेट 1699 पर्यंत स्वतः हाच प्रचंड सैन्यासह कैदेत होता तो संताजींच्या मृत्यूनंतरच बाहेर आला .

बादशहाने दिल्लीचे तख्यावर येऊन बत्तीस वर्षांचा काळ लोटला होता पण त्या बत्तीस वर्षांच्या काळात थेट बादशाही छावणीवरच हल्ला करावा असा कुणाच्याही मनात आले नसावे पण यातून तो बचावला तो थेट 1707 ला मरण पावला.

संताजी घोरपडेंना पराक्रमाची नोंद घेऊन सेनापती पदावर नेमले . संताजीने मोगलांचे अनेक नामांकित सरदार नामोहरण केले त्यांनी झोप उडवून दिली त्यात विठोजी चव्हाण यांनी सैनिकी कारवाईत आणि मोहिमात मोलाची साथ दिली .

राजाराम महाराज जिंजीच्या वेढ्यात अडकून पडले असता झुल्फीकरखानाच्या प्रचंड सैन्याशी निकराची झूंज दिली . जिंजीहून संताजी बरोबर स्वराज्यात येत असताना बेंगरूळ मुक्कामी मोगलांबरोबर मोठी लढाई झाली चौफेर धुरूळा उडाला अशा या प्रचंड आकांताच्या लढाईत 25 मे सन 1696 रोजी विठोजी चव्हाण धारातीर्थ पडले. पस्तीशीच्या उंबरठ्यावर असलेला हा पराक्रमी पुरूष काळाच्या पडद्या आड झाला याची खबर राजाराम महाराज यांना लागल्यावर फारच दुख झाले असावे.

स्वराज्यातील मुख्य मावळ्यांपैकी सोलापूर जिल्ह्यातील दोन घराणी कर्ती पुरूष म्हणून उदयास आली त्यातील या हिम्मतबहाद्दर चव्हाण घराणे घराण्यास माझा ञिवार मानाचा मुजरा.

पुढिल भाग हिम्मतबहाद्दर उदाजीराव चव्हाण ममलकतमदार यांच्यावर असेन.

गडप्रेमी बाळासाहेब पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here