महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

गावदेवी माता, कुळगाव, बदलापूर

By Discover Maharashtra Views: 1384 3 Min Read

गावदेवी माता, कुळगाव, बदलापूर –

बदलापूर, उल्हासनदीच्या तीरांवर वसलेले गाव. सोपारा , कल्याण बंदरा वरून निघणारा माल नाणेघाट मार्गे घाटावर येण्याच्या आधी कोकण व घाट यामधील महत्वाच गाव. मौखिक कथेच्या आधारे येथे घोडे बदलले  जायचे म्हणून बदलापूर नाव पडले सांगितलं जात. इतिहास संशोधक श्री नानासाहेब  चाफेकर यांनी ‘माझ गाव बदलापूर ‘ नावाचा ग्रंथ लिहला अाहे. नानासाहेब पूर्वी अोंध संस्थानात न्यायाधीश होते.(गावदेवी माता)

मुळ बदलापूर गाव हे जुने असून येथे गावगाडा व्यवस्था पाहायला मिळते. येथील लवाटे ,पांडे ,अोक व इतर घराणी पहिल्या पासून येथे अाहेत. बदलापूर म्हंटल की जोडून नाव येत ते कुळगाव बदलापूर.

‘आगले’ लोक १३व्या शतकात मुंगी पैठणच्या बिंबराजाच्या सैन्यात तैनात होते . आगले लोकांची ताकद बिंबराजाकडे होती. तो मुंगीपैठणहून कोकणात निघाला. त्याचे सैन्य वाटेत नाशिक, घोटी, इगतपुरी, शहापूर, कल्याण,मुरबाड येथे राहिले.   नंतर बिंबराजाने सैन्यानिशी कोकणात येऊन अलिबाग, आवास, सासवणे आणि सागरगडावर सरदाराचा पाडाव केला. आणि स्वतः राज्यकारभार पाहू लागला. त्याने प्रजेला गावठाणे वसवून दिली आणि मिठागरे बांधून दिली. मिठागरांत काम करणारे मीठ-आगरी म्हणून ओळखले जाऊ लागले.

शेती-मळे पिकवू लागले, तर काही मत्स्य व्यवसाय करू लागले. अलिबाग, पेण, पनवेल, उरण, कर्जत, रोहे, जंजिरा, श्रीवर्धन, ठाणे इत्यादी ठिकाणी आगरी समाज पसरला आणि स्थिरावला. भौगोलिक रचनेनुसार समाजाचा व्यवसायही विभागला गेला. कालांतराने जो बदलापूरच्या शेतजमिनीचा भाग होता तेथे आनेक  कुळ (कुळ म्हणजे घराणे )  येउन राहीली तो भाग म्हणजेच बदलापूरचा कुळगाव भाग होय.

रायगड ,मुंबई ,ठाणे येथील आगरीसमाज हा इतरत्र पसरला तो बदलापूर व जवळील परिसरात कुळाने राहू लागला. प्रत्येक गावाचे ग्रामदैवत व घराण्याची कुलदेवता असते. या कुळगावची ग्रामदेवता आहे गावदेवी. गावकुसावर देवीच आता जिर्णोद्धारीत भव्य मंदिर आहे. मंदिराची व्यवस्था ही आगरीसमाजाकडे आहे. भव्यसभामंडप व गाभारा असे दोन भाग असून गाभा-यात देवीचे दोन तांदळा आहेत. यावर देवीचे मुखवटे चढवले आहेत. ( मंदिरात असणारे दोन तांदळा हे जेष्ठा व कनिष्ठा म्हणून संबोधले जातात. )

नवसाला पावणारी ही देवीचा उत्सव मोठ्या प्रमाणात केला जातो. पालखी ने देवीची गाव प्रदक्षिणा मारली जाते. चैत्र पौर्णिमा व नवरात्र साजरे केले जातात. प्रत्येक प्रसंगी देवीची अोटी भरली जाते. कुळगावतील कुळाची ग्रामदेवता म्हणून कुळाचार केला जातो. गोड तिखट नेवैद्य केला जातो. महादेव कोळी ,कातकरी ,ठाकूर, कुणबी व इतर ही समाज ह्या देवीला मानाने पुजतात.

मंदिराच्या परिसरात कमीप्रमाणात पाहायला मिळणार गजलक्ष्मी च शिल्प आहे.हे शिल्प बाहेर आसल्याने ते गावदेवी मंदिरात ठेवलेतर त्याच जतन केल जाईल .कुळगावच्या इतिहासाचा  गजलक्ष्मीच शिल्प कुळगावच्या वैभवाच , समृध्दीच प्रतीक आहे.

मंदिरा शेजारील तलावामुळे परिसर रमणीय झाला आहे.

संतोष मु चंदने. चिंचवड, पुणे.

Leave a comment