हैदराबाद – कर्नाटक जिंकल्याचा राजाराम महाराजांचा जाहीरनामा

हैदराबाद - कर्नाटक जिंकल्याचा राजाराम महाराजांचा जाहीरनामा

हैदराबाद – कर्नाटक जिंकल्याचा राजाराम महाराजांचा जाहीरनामा…

सन 1692 च्या अखेरीस संताजी धनाजी यांनी कर्नाटकात जे प्रचंड विजय मिळवले त्यामुळे जिंजी किल्ल्याच्या पुढील मोगली फौजेचे मनोधैर्य पूर्णपणे ढासळले होते. त्यातच औरंगजेब याचा सरदार असदखान व जुल्फिकार खान यांनी खुद्द शहजादा कामबक्ष याला कैद केल्याने तर मोगलांच्या फजितीस पारावार उरला नाही. राजाराम महाराजांनी आपल्या सैन्याला वांदिवाश पर्यंत सुखरुप पणे माघार घेण्याची परवानगी द्यावी, अशी विनवणी जुल्फिकार खानाने केली. यावेळी जिंजीतील मराठा प्रशासन जोशात होते. मराठ्यांचा आत्मविश्वास किती वाढला होता हे जिंजी दरबाराने काढलेल्या एका जाहीरनाम्यात स्पष्ट होते. हा जाहीरनामा चुनामपेट्टा ( मद्रास जवळ ) येथील इंग्रज वखारवाल्यांना पाठविलेल्या पत्रात उल्लेखित करण्यात आला आहे.(राजाराम महाराजांचा जाहीरनामा) त्यात लिहिले आहे –

” You are very sensible that the Mogull’s army being against this place ( Jinji ) cannot effect their design after a long time, lying before it. Since thirty thousand of our horses came from above ( From Maharashtra ) at once at first bout, we took Allemaunde Cawn ( Ali Mardan Khan ) and Macaye Small Cawn ( Ismail Khan Makha ) whom we have now in our fort of Chingee. Since the Mogull’s death and Shah Allum’s coming to the throne. Who have always great kindness for Vizapore and Golcondah which your houour is very well sensible of, our enemies have come to nothing and Caun Bux ( Kam Baksha ) being now a prisonesr, Assid Caun and Zulphakore are very much troubled, but we concem ourselves no more about them, than with Macaye Small Caun, whom we look upon as our prisoner likewise, for we now value not our enemies one farthing.

Over Golcondah country forts. Conjeverone ( Conjiveram ) and Callapa ( Cuddapah ) we have made Causau Ramanah ( Keshav Ramanna ) Subidore, who will bring all ( the regions ) under our government and he will write to you desiring your assistance therin. Our enemies now being now dispersed, we understand, fly with their families and estate to your place, and since your honour and we are so great friends, we reckon it the same thing as if they were in our custody. Therefore, we desire it of your honour to keep watch upon them that neither they nor anything they have may escape from you, which you may easily do.”

वरील जाहीरनाम्यात जिंजी दरबारचा आत्मविश्वास ओसंडून वाहत आहे. “आता आम्ही आमच्या शत्रुस एका कवडीचीही ( one farthing ) किंमत देत नाही, असे मोठ्या प्रौढीने मराठ्यांनी म्हंटले आहे.
जिंजी पुढील मोगली सैन्याच्या वाताहती नंतर राजाराम महाराजांनी आक्रमक धोरण स्वीकारून मद्रास किनारपट्टीवर सर्व हैद्राबादी कर्नाटक मराठ्यांच्या मालकीचा झाल्याचे व त्यावर केशव रामण्णा हा सुभेदार म्हणून नेमल्याचे जाहीर केले. या सुभेदाराने कांजीवरम पासून उत्तरेस कुडाप्पापर्यंतची ठाणी व किल्ले ताब्यात आणावयास सुरुवात केली होती. मराठ्यांच्या भीतीने मोगली ठाणेदार व अधिकारी यांनी आपापला कुटुंब कबिला व संपत्ती सह पळ काढुन इंग्रजांच्या वखारीत आश्रय घेण्याचा प्रयत्न चालविला असल्याचेही या जाहीरनाम्यात म्हटले आहे.

जाहीरनामा तारीख 2 जानेवारी 1693.
पोस्ट रवि पार्वती शिवाजी मोरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here