महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,76,568

वीर संताजी घोरपडे

By Discover Maharashtra Views: 2926 5 Min Read

वीर संताजी घोरपडे –

वीर संताजी घोरपडेंचा जन्म कोणत्या साली झाला हे निश्चितपणे सांगता येत नाही पण त्यांचा जन्म इ.स १६४०-४२ साली झाला असावा. कर्तृत्व, राजनिष्ठा आणि कडक शिस्तीचे सेनापती म्हणून त्यांचा लौकिक झालेला आहे.(वीर संताजी घोरपडे)

शककर्ते शिवरायांची सावली –

वीर संताजी घोरपडे युद्ध प्रशिक्षण शिवरायांच्या सावलीत झाले असावे. महाराजांच्या पराक्रमाचे अनेकवपैलू त्यांना पहावयाला मिळाले होते. शूर योद्धा होण्यासाठी त्यांना अनुकूल वातावरण लाभलं

छत्रपती संभाजी महाराजांचा विश्वास –

छत्रपती संभाजी महाराज मोठ्या सैन्यानिशी कर्नाटकात गेले असता कोप्पलच्या परिसरात पठाण, बेरड जमातींनी उठाव केलेला. त्यांचा मोड करण्यासाठी ऐनवेळी कुमक करण्याचे काम वीर संताजी घोरपडेंनी केला होता म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी एक सनद दिली होती. त्या सनदेत अस म्हटले आहे की, “हा उपयोग राज्याचा चांगला केला आहे. सर्व सरकारात चाकरी हिमतीने केली व आपला प्राणरक्षण करून आमचा प्राणरक्षण केला हे समजून तुम्हास राज्यातील राज्यपैकी चौथा मुलूख इनाम करून दिला असे…… तुमची चाकरी हिमतीची पाहून संतोषाने ही देणगी दिली असे.” (तारीख १६ जानेवारी , १६८२)

औरंगजेबाच्या तंबूचा चांद तारा कापला –

औरंगजेबाने छत्रपती शंभू राजांना अतिशय हालहाल करून मारले त्यांचा हत्येचा सूड वीर संताजी घोरपडे आणि वीर धनाजी जाधवांनी घेतला. त्यावेळी औरंगजेबाची छावणी तुळापूर जवळ होती. वीर संताजी घोरपडे आपल्या सोबत त्यांचे बंधू बहिर्जी आणि मालोजी होते त्याच बरोबर विठोजी चव्हाण देखील होती. ऐन मध्यरात्री बादशहाच्या गोटात शिरून डेऱ्याजवल जवळ जाऊन आधी तणाव तोडले आणि सोन्याचा चांद तारा काढला आणि लुटालूट सुरू केली. मोगली सैन्य सावध होताच वीर संताजी जमावसह सिंहगड नजीक डोंगरात जाऊन बसले आणि नंतत रायगडाला वेढा घालून बसलेल्या इतिकदखानाच्या सैन्यावर हल्ला केला.

या धाडसी मोहिमेसंबंधी एक सनद मिळाली. त्यात असे म्हटले आहे की, “तिघे बंधू आपली फौज तीन हजार घेऊन बादशहाचा मुकाम तुळापुरी फौजेनिशी असता निघाले ते तिसरे रोजी जाऊन रात्री छापा घालून डेरेचे तणावे तोडून शर्त मर्द केली!”

मुकरबखानाचा पराभव –

ज्या मुकर्रबखानाने छत्रपती संभाजी महाराजांना पकडले त्याचा सुढ सुद्धा वीर संताजी घोरपडेंनी घेतला. कोल्हापूर जवळ मुकर्रबखानाबरोबर युद्ध केले आणि त्याचा पराभव केला. ह्या युद्धात त्याचा मुलगा खाने सुद्धा जबर जखमी झाला. औरंगजेबाने त्याचा उपचारासाठी फिरंगी डॉक्टरला पाठवले.

राजारामचरितम् मध्ये उल्लेख असा आहे की

निजामविजयार्थ यान् संत घोरफडादिनकान् ।
प्रथमं प्राहिणोत्तैर्हि निजामः परिलुंठितः ॥
गजाश्वादि धनं तस्य बह्यनीतं तदारणात्त् ।
भूधरोपत्यकायां तु जीवमात्रावशेषितः ।।
गतश्री: शस्त्रभिन्नांग: करवीरं ययौ खल: ।
तत्तो घोरफडाद्यास्ते समीयु: सचिवांतिकम् ।।

सर्जाखान कैद –

ज्या सर्जाखानाने हंबीरराव मोहितेंना ठार केले त्यांचा हत्येचा सुढ घेतला. सातारा किल्ल्याला वेढा सर्जाखानाने वेढा दिला होता. त्याच्यावर स्वारी करण्यासाठी धनाजी जाधव, शंकराजी नारायण, रामचंद्रपंत आणि संताजी घोरपडे ह्यांनी मोहीम आखली. सर्जाखानावर हल्ला केला आणि त्याला जबर जखमी केला. ह्या हल्ल्यात त्याचा मुलगा गालिबखानही जखमी झाला. ह्या युद्धात सर्जाखानाची आई, बायका, मुलगी कैद झाली आणि साताराच्या किल्ल्यावर नेले. मराठ्यांचा ह्या छाप्यातून सर्जाखानाची दोन बायका आणि दोन मुले आपण खानसाहेबांची दासदासी आहोत असा बहाणा करून निसटली आणि फकिरचा वेष परिधान करून मोगली छावणीत पोहचले

पराक्रमी सेनापती –

वीर संताजी घोरपडेंनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर अनेक मोठे सरदारांचा पराभव केला आणि काहींना कैद देखील केले. काफीखान वीर संताजी घोरपडेंचे वर्णन करताना म्हणतो की, “त्यात तो संताजी प्रमुख होता. समृद्ध शहरांवर हल्ला करून त्यांचा नाश करणे आणि नामांकित सेनापतींवर तुटून पडणे यात त्याची खूप प्रसिद्धी झाली. ज्याला ज्याला म्हणून संताजीशी मुकाबला करण्याचा आणि लढण्याचा प्रसंग आला त्याचा नशिबी खालील तीन पैकी येऊ परिणाम ठेवलेला. एक तर तो मारला जाई किंवा जखमी होऊन कैदेत सापडे. किंवा त्याचा पराजय होऊन आणि त्याचे सैन्य आणि बाजारबुणगे गारद होत. आपण जीवानिशी निसटले हाच आपला पुनर्जन्म झाला असे त्याला वाटे. त्याचा मुकाबला करण्यासाठी बादशहाच्या प्रतिष्ठित सारदारांपैकी एकही तयार होत नसे. जगात धडकी भरून सोडणारी फौज घेऊन तो कुठेही पोहचला की, नरव्याघ्रपरमाणे असलेला अनुभवी योध्यांची हृदय कंपायमान होत.”

जेधे शकावली :- शके १६१९ आषाढ मासी संताजी घोरपडे यासी नागोजी माने याणी माहादेवाजवल दगा देऊन मारिले.

संदर्भ –
१) कापशीकर घोरपडे घराण्याचा इतिहास
२) संताजी घोरपडे – जयसिंगराव पवार
३) जेधे शकावली.

लेख साभार :- चेतन दादा

Leave a comment