महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,29,561

भांबोरकर भोसले वाडा, भांबोरे

By Discover Maharashtra Views: 2891 4 Min Read

भांबोरकर भोसले वाडा, भांबोरे –

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील भांबोरे गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचे चुलत आजोबा विठोजीराजे भोसले यांच्या वंशजांचा वाडा आहे. भांबोरे हे गाव पुणे – सोलापूर महामार्गावरील भिगवणपासून २४ कि.मी अंतरावर आहे. काळाच्या ओघात वाड्याची पडझड झाली आहे. काही भाग शिल्लक आहे. जोत्याचे अवशेष पहायला मिळतात. त्यांचे वंशज प्रवीणजी भोसले यांच्याकडे भांबोरकर भोसले दफ्तर हे दुर्मिळ पुस्तक आहे व पुरातन तलवार आहे.

मालोजीराजे व विठोजीराजे हे दोघे बंधु वणगंपाळ निंबाळकरांकडे चाकरीत होते. वयाच्या १७-१८ व्यावर्षी दोघा बंधूंना चांगले घोडे देऊन १२०० होनांची आसामीस तैनात करून चाकरीस ठेवले. ते कोल्हापूर प्रांतात स्वारीसाठी १२००० फौजेसह गेले. मालोजी व विठोजी यांनी स्वारीत पराक्रम गाजविला. त्यांना १५०० मनसबदारी व जुन्नर परगणा मिळाला. पुढे निजामशाहीत मालोजी व विठोजी यांनी मलिकअंबरची पाठराखण केली.

इ.स. ऑगस्ट १६०६ ते जून १६०७ या दरम्यान मालोजी राजे इंदापूरच्या लढाईत धारातीर्थी पडले तेथे त्याची समाधी होती. विशेष म्हणजे मालोजीराजे व विठोजीराजे यांनी घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्या मंदिरात दास मालोजी बाबाजी व विठोजी बाबाजी भोसले असा शिलालेख आहे. शिखर शिंगणापूर येथे मालोजी राजांनी तळे बांधल्याचा उल्लेख छ. संभाजी महाराजांच्या दानपत्रात आहे.

विठोजीराजे यांना आठ पुत्र, व एक कन्या होती. मुलीचे नाव अंबिकाबाई. ती ज्येष्ठ होती. त्यांचा पहिला मुलगा संभाजी.मीरजुमल्याच्या लढाईत जाधवरावांकडून मारला गेला. त्यांस संतती नव्हती. दुसरा मुलगा खेलाजी. हा गर्दी होऊन एकाएकी मारला गेला. त्याचे वंशज शिखर शिंगणापूर, बावी (जि. नाशिक), कळस (जि. पुणे), मीरगाव (जि. नाशिक), निरगुडी (जि. अ. नगर) मनिरथ (जि. नाशिक) येथे आजही वास्तव्य करून आहेत. तिसरा मुलगा मालोजीराजे हे जेजुरीजवळील कोऱ्हाळे (जि. पुणे) येथे होते. चौथे कबाजी हे शहाजीराजांबरोबर तंजावरला गेला असावे असे मानले जाते. पाचवे नागोजीराजे ह्यांचे वंशज मुंगीपैठण व बनसेहूरी (अ. नगर). सहावे – परसोजीराजे हे नांदनन (मोगलाई आष्टे) व भांबोरे (अ. नगर) येथे वास्तव्य करीत होते. त्रिंबकजी हे सातवे पुत्र तंजावरला गेले. तेथे त्यांचे वंशज आहेत.

सहावे पुत्र परसोजी राजे यांचे वंशज नांदनज व भांबोरे या दोन ठिकाणी राहतात. शहाजीराजे विजापूरला गेले त्या वेळी आपले चुलतबंधू विठोजीराजे यांचा सहाही मुलांची व्यवस्था जागजागी लावली. त्यातूनच परसोजीराजे यांना निजामशाहीतील दौलताबादकरांकडून जागा तैनात लावून दिली. तेथे पराक्रम करून त्यांनी चांगला नावलौकिक प्राप्त केला. वऱ्हाड, खानदेश मधील बंडखोरांचा शिताफीने बंदोबस्त केला. त्यांना त्याबद्दल जळगाव जामोद येथील वतनाची सनद मिळाली.परसोर्जीचा मुलगा सयाजी निजामशाही बुडाल्यावर  मोगली अंमलात दाखल झाले. सयाजींचे दोन पुत्र राजरूप व रुस्तुमजी. राजरुपराजे हे नांदनजच्या गढीत राहून बादशाही कामगिरी उत्तम प्रकारे निष्ठेने बजावीत होते. सावकारी देवघेव मोठ्या प्रमाणावर चाले. रुस्तुमजी मोठे कर्ते व इभ्रतदार होते.

रुस्तुमजींचे मोठे चिरंजीव खेलोजीराजे यांना बरोबर घेऊन नांदनज येथील वडिलार्जित जहागिरीवर ते राहिले. छत्रपती शाहूमहाराज मोगली कैदेतून सुटून साताऱ्यात आले. त्यांच्याबरोबर खेलोजी होते. त्यांना नांदवज व भांबोरे येथील मोकासा राजपत्रे करून दिली. तेव्हापासून खेलोजीराजे हे स्वराज्याच्या सेवेत आले. त्यांना सातारा मुक्कामी देवाज्ञा झाली.

खेलोजीराजांची चार मुले

१) शहाजी २) कक्काजी ३) रुस्तुमजी ४) सुभानजी.

सुभानजी व जानोजी हे भोसले नागपूरकर भोसले यांच्या लष्करात सेवा करीत होते. ते राक्षसभुवनच्या लढाईत (१७५३) होते.श्री कक्काजीराजे हे आपल्या कुटुंबासह भांबोऱ्यास राहिले. त्यांना दोन मुले होती- १) चिमणाजी राजे, २)अप्पाजीराजे. अप्पाजीराजे हे अतिशय रागीट, बलवान व धाडसी होते. गाईंची झुंज सोडविण्याच्या प्रसंगाची एक आख्यायिका त्यांचेसंबंधी सांगितली जाते.

भोसले घराणे विठोजीराजे शाखेची वंशावळ –

वरडाजी-नागोजी-व्यंकोजी-संभाजी बाबाजी

१) मालोजी ( छ. शिवाजीमहाराजांचे आजोबा.)

२) खेलोजी ऊर्फ विठोजी.

३) अंबिकाबाई, संभाजी, मालोजी. कक्काजी, मालोजी, परसोजी

४) मालोजी कवाजी-नागोजी-परसोजी-त्र्यंबकजी-कक्काजी-रुस्तुमजी -खेलोजी (२)- परसोजी (२)

५)शहाजी कक्काजी (२) रुस्तुमजी सुभानजी चिमणाजी,

६)अप्पासाहेब – चिमणाजी-राघोजी-आबासाहेब

७)लालाजी-शाहुजी-शंकराजी बाळाजी भिकाजी

८)लालाजी-शिवाजी-नाव्हाजी-जयसिंहजी विजयसिंह-प्रवीण

साभार – सदाशिव शिवदे सर

टीम – पुढची मोहीम

Leave a comment