मालोजीराजे बाबाजीराजे भोसले

मालोजीराजे बाबाजीराजे भोसले

निजामशाहिचे रक्षणकर्ते वजीर मालोजीराजे बाबाजीराजे भोसले.

मालोजीराजे बाबाजीराजे भोसले हे क्षत्रियकुलवतांस छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा होत . भोसले हे कुळ उत्तरेतील सिसोदे घराण्याचे वंशज होय , सिसोदे कुळाचा वंश हा सूर्यवंशी होय , अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर सिसोदे घरण्यातून एक शाखा दक्षिणेत आली आणि आपल्या पराक्रमावर निजामशाही , आदिलशाही , पातशाही आशा शाह्यांमध्ये चाकरिस रुजू झाले . विशेष करून भोसले घराणे निजामशाहीत वर्चस्वातं आले मालोजीराजेंचे नाव त्यांच्या आजोबांच्या नावावरून ठेवले गेले असावे , त्यांच्या आजोबांचे नाव मालजीराजे हे बुऱ्हाण निजामशाहीत दीड हजारांचा सरंजाम सांभाळून लढाया करीत होते त्यांचा मृत्यू 1553 साली झाला . अर्थात मालजीचा मुलगा बाबाजीराजे लहान असल्याने बुऱ्हाण याने तो जप्त केला आणि पुढे हुसेन निजाम गादीवर आला आणि ह्या काळात बाबाजीराजे लहान असल्याने दोघांनीही समाचार घेतला नसावा .

1565 नंतर मूर्तजा गादीवर आला आणि ह्याने 1588 पर्यंत निजासमशाही गाजवली , या काळात बाबाजीराजे लष्करी कारवायात दिसत नाहीत तर , आपल्या मुकदम्या , देशमुख्या , पाटीलक्या पाहतच गेला असावा . शेडगावकर बखरीत बाबाजीराजे मातोश्रीं जवळ घृष्णेश्वरी राहत असून ते लग्न झाल्यानंतर देऊलगावच्या पाटीलकी व मौजे खानवाटे व कसबे जिंती भिमातीरी खरेदी केल्या पण त्या त्यांच्या बापानेच खरेदी केल्या होत्या हे मालजींच्या 1549 च्या पत्रावरून स्पष्ट होते . बाबाजीराजे यांच्या दौलतीचा स्पष्ट उल्लेख नसला तरी , पण चुलते खेलोजीराजे आणि वडील मालोजीराजे बाबाजीराजे भोसले यांचे  सनदपत्रात तपशील येतो तो , खान्देशातील परगणे बहाळ , व भडगाव वर्हाड प्रांतातील परगणे जळगाऊ येथील देशमुख्या व परगणे कनरड प्रांती देशमुखी व कसबे वेरूळ परगणे मजकूर प्रांत दौलताबाद येथील वंशपरंपरागत मोकदमी असल्याचे सांगतात . पंत प्रतिनिधी बखरीत बाबाजी भोसले पाटील मौजे हिंगणी , बेरडी , व देऊळगाव वगैरे तर्फ पाटस पुणे अशी माहिती येते .

वरील सर्व माहितीवरून वरील सर्व मोकदम्या पाटीलक्या ,देशमुख्या ह्या शिवछत्रपतींचे आजोबा मालोजीराजेंच्या पूर्वीच होते हे स्पष्ट होते . मालोजीराजेंचे वडील बाबाजीराजेंचा हयात आपल्या वडिलांच्या पाटीलक्या मोकदम्या अतिशय चोखपणे सांभाळण्यात गेली असावी . बाबाजीराजे यांच्या पत्नी रेखाऊ यांना मालोजीराजे आणि विठोजीराजे असे दोन पुत्र होते ,   मालोजीराजे आणि विठोजीराजे यांना तयार करण्यात कसलेच कमी झाले नाहीत . मालोजीराजे आणि विठोजीराजे हे दोघे लष्करी चाकरीसाठी मातोश्रींचा निरोप घेऊन फलटण ग्रामी वणगोपाळ  जो बारा वाजीरांचा काळ असे नामाभिधान असणारे परमार कुळाचे राजे होते .

निजामशाहीच्या बाजूने वंगोपाळ निंबाळकर हे जमालखानाच्या बाजूनें आदिलशाहीच्या रोखणे निघाला आणि दक्षिणी  लोकांची लष्करी भरती होत असताना मालोजी आणि विठोजी हे निंबाळकर यास मिळाले आणि आदिलशहावर चालून जाण्यासाठी निघाले आणि कोल्हापूर येथे बारा हजार फौजेसह डेरे पडले आणि इथेच आदिलशाही फौजेची गाठ पडून घनघोर युद्ध झाले त्यात उभयतां बंधू यांनी आपला पराक्रम गाजवून सर्व सैन्यात वाववाह झाली आणि वनगोजी निंबाळकर यांच्या साहाय्याने चाकरिस रुजू झाले .

कवींद्र , मालोजीराजे नोकरीत कसे शिरले यांचे वर्णन करतात , ” याच समयी देवगिरी येथे राहून धर्मनिष्ठ निजामशाह पृथ्वीवर राज्य करीत होता  , निजामशाही आणि आदिलशाही यावनांनी लढा पडला तेंव्हा बुद्धिमान निजामशहाने मालोजीराजे हा शत्रूंचा कर्दनकाळ आहे असे एकूण त्यास मदतीस बोलावले आणि अद्वितीय तेजस्वी मालोजी देवगिरीस येऊन राहिला त्याचा भिमाप्रमाणे भाऊ विठोजी आपल्या सैन्यासह निजमास येऊन मिळाला आणि उभयंता बंधूंच्या आगमनाने संतुष्ट निजामाने राजेंना गौरविले .

मालोजीराजे बाबाजीराजे भोसले निजामशाहित 1588/89 साली पराक्रम गाजवून आपली कीर्ती चाहुफेर केली निजामशहाने 1591/92 ला दीड दीड हजार सरंजाम देऊन खर्चा करिता जुन्नर शिवनेरी प्रांत देऊ केला . पुढे निंबाळकर यांनी सोयरिकी जुळवून उमबाईंचे लग्न मालोजींबरोबर लावले पुढे मालोजी शत्रूंवर नेहमी जय मिळवित मालोजीराजे यांचे एक पत्र 1696 आहे त्या वरून मालोजीराजे वजीर म्हणून गणले जाते होते हे स्पष्ट होते . मालोजीराजे ह्यांना 1591 /1606 असा सरंजाम मिळल्यापासूनच कार्यकाळ गृहीत धरला तर 15/16 वर्षांत ते वजीर म्हणून गणले गेले ही बाब कमी न्हवती

दीड हजार सरंजमीवरून पंच हजारी दौलत झाल्यापासून सूपा वगैरे परगणे देऊन अधिक सरंजाम मालोजीराजे यास दिला एवढेच नव्हे तर सरकारी सरंजमिखेरीज निजामशाहीत बुऱ्हाणकडून खासगी देणग्या देखील मालोजीराजे आणि विठोजीराजे यांना दिल्या होत्या . मालोजीराजे आणि विठोजीराजे यांच्या प्रत्यक्ष लढायांचा नोंदी मिळत जरी नसल्या तरी हे उभयंता बंधू 1591 1595 पर्यंत बुऱ्हाणच्या रक्षणार्थ प्रत्येक लढयात सज्ज असावेत असेच वाटते कारण दीड हजारांचा सरंजाम वाढवून पंचहजारी आणि वजीर गणना ही बुऱ्हाण निजामशह असतानाच मिळाला होता आणि इतर देणग्या देखील सहकारातून मिळाल्या होत्या .

एप्रिल 1595 ला बुऱ्हाणच्या मृत्यूनंतर अवघ्या चार महिने इब्राहिम निजामशहा कारकीर्द राहिली तो युद्धात गोळी लागून ठार झाला आणि इथून पुढे निजामशाहीत वारसा बाबत नेहमी भांडणे राहिली .

चंदबीबीने नगरच्या राजधानिस  वारसा  भांडणातून मदतीस मुरदला बोलावले भांडणे मिटली मुरादने संकट उभे केले पण चांदबीबीने त्यास अपयश आनले , चंदबीबीने प्रथम आहमदखान तर नेहनगखाणाला कारभार दिला आणि आदिलशाही मदत घेऊन महम्मदखणाचा बंदोबस्त केला आणि मोगलाईविरोधात लढाई थांबवण्यासाठी दक्षिणी साह्य एक होऊन एक लढाई झाली 1597 पण मोगली जय झाला तरी मुराद आणि खानखान यांच्यात मतभेद झाल्याने खानखानं परत गेला . मोगली हालचाली थंडावल्या आणि नेहनगखानाशी भांडण करून बहादुरशहा निजामशाहिवर आणून 2/3 वर्षे निजामशाही चालवली .

अकबर 1599 साली जुलैत दक्षिणेत आला , चांदबीबी मोगलांशी तह करण्याच्या विचारात आहे असे पाहून हमीदखनाने वेढा पडला असता तिचा खून करविला आणि नगरची राजधानी सन 1600 साली  मोगलांकडे गेली आणि आसिरगड ही 1601 ला मोगलांस मिळाला आणि अकबर परत आग्र्यास गेला .

नगरची निजामशाही कायमची मोडली पण आपापसातील भांडणात स्थानिक सरदार कोणाचीना कोणाची बाजू घेतात , सुरुवातीस  मिआन मंजू ची नगरहून उचलबांगडी केल्याने त्याने देवगिरीचा सहारा घेतला आणि त्या बाजूचा मुलुख आपणाकडे घेतला होता त्यात मालोजीराजे यांचा वावी , वेरूळ , घृष्णेश्वर आदी गावे मिआन मंजुच्या भागात असली तरी जुन्नर चाकण इंदापूर , सुपा हे नेहनगखान व मलिक आंबरकडे गेल्याने मालोजीस या संकटास समावूनघेणे प्राप्त झाले आणि ही भांडणे निकारावर येताच 1597 ला श्रीगोंदयाच्या सुभ्यावर येऊन व्यवस्थेसाठी भाग पाडले .

सत्तेसाठी भांडणे असली तरी हे इतर शत्रूंसाठी एकत्र येत होती मिआण आणि मलिक आंबरने बाकीचे राज्य अकबराच्या हाती पडू दिले नाही आणि मूर्तजाला गादीवर बसवून औसा किल्ल्यावर राहायची सोय केली व परंडा येथे दरबाराची व्यवस्था केली आणि मोगली जाळे शांत झाल्यावर मिआण आणि मलिक यात सत्तेची चुरस लागून ते एकमेकांत द्वेष करू लागले आणि मोगलांनी याचा फायदा उठवला खानखांकडून मालिकेच्या टेलांगणावर स्वारी पाठवली पण पराभव झाला पण खानखानन याने मिर्झा इरिच ला पाठवून नांदेडला मोठी लढाई झाली त्यात मलिक मरता मरता वाचला आणि पुन्हा सैन्य जमवाजमव करू लागल्याने खानखानाने तह केला आणि त्यांची मैत्री बरीच काळ टिकली .

औषास येऊन मूर्तझा यास सत्ताहीन बाहुले केल्याने मूर्तझा ने मिआण राजू कडे तक्रार केली आणि या दोघांनी मलिक आंबरचा काटा काढायचे ठरविले आणि मालिकास समजता परांड्याचा पायथ्याशी महिनाभर लढत मियानची सरशी झाली तेंव्हा मलिकने खानखानकडून मदत मागविली आणि मियान राजुचा पराभव झाला तो दौलताबाद येथे पळाला .

पादशहाजादा डॅनियल मेल्याप्रकर्णी खानखान जलण्याहून बुऱ्हाणपुरास गेला हे पाहून सप्टेंबर ऑक्टोबर1606 ला  मलिकने दौलताबादेस जाऊन मियान राजू वर पुन्हा हल्ला चढवला आणि कैद केले पण खानखान याने यापूर्वी सहा महिने या दोघांचा लढा प्रत्यक्ष परावृत्त ठेवला होता .

1606 च्या मे महिन्यात मलिक अंबर आणी मियानं राजू यांच्यात महिनाभर लढ्याचे तीव्र स्वरूप होते आणि मलिकने यात माघारी घेतली याच यात परेंड्या पासून जवळ असलेला मलिक कडील इंदापूर सुभा जो मालोजी जवळ होता त्यावर हल्ला चढविला आणि त्या लढ्यात मालोजीराजे मारले गेले .

कवींद्र परमानंद कार्याबद्दल नोंदवतो ,

बलाढ्य मालोजीराजे निजामशाहीत जे जे शत्रू उत्पन्न झाले त्यांचा उच्छेद केला , इंद्रप्रमाणे पराक्रमी अशा विठोजीराजेंनी निजामशहास साहाय्य करून त्याचे मनोरथ पूर्ण केले .

वरील काव्यात कवींद्र यांनी निजामशाहित प्रत्येक शत्रूस मालोजीराजे तोंड देत होते हेच दर्शवतात .

आता मालोजीराजे यांच्या मृत्यूबद्दल काय नोंदवतात ते पाहू ,,,

” शाहजीला पाचवे वर्षे लागले असता मोठे व उत्तम चिलखत चढवून आपले आवडते धनुष्य घेऊन मालोजीराजे मोठ्या सैन्यासह निजामशाहीच्या आज्ञेने इंदापूर स्वारीवर गेले तेथे हल्ला करून गराडा घालणाऱ्या पुष्कळ योध्यांचे प्रहार घेत त्यांच्याशी लढत असता त्याने पायदळ , मदोनमत हत्ती घोडे यांच्या रक्ताची एक मोठी नदी धो धो वाहवयास लाविली व यामप्रमाणे क्रुद्ध व तेजस्वी मालोजीराजे यांनी शत्रूपक्षाच्या योद्धयास पुढे पाठवून आपण स्वतःही स्वर्गाची वाट धरली .

मालोजीराजे इंदापूर गढीत कशाप्रकारे लढले याचा समकालीन नसला तरी पन्नास साठ वर्षांनी लिहलेल्या अनुपुरणात अतिशय सुंदरपणे लढाईचे वर्णन कवींद्रने केले आहे .

मालोजीराजेंचा मृत्यूबद्दल शेडगावकर बखर तर वेरूळ येथे देवाज्ञा झाली असे नोंदवतो पण बखरकार फार नंतर लिहलेले आहे आणि कवींद्रने मालोजीराजेंच्या मृत्यूबद्दलचे वर्णन अनुपुरणात केलेच आहे आणि त्यांची समधीस्वरूपात घुमटी ही उभे केल्याची पत्रे आज ही अभ्यासायला मिळतात .

  • वीरश्री मालोजीराजेंचे काल्पनिक चित्र
  • मालोजीराजे यांचे घुमटातील पादुका इंदापूर
  • मालोजीराजे यांच्या समाधीचा एक दुर्मिळ फोटो
  • मालोजीराजे बाबाजीराजे भोसले

 – गडप्रेमी बाळासाहेब पवार –

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here