बखर

marathi pdf book free download | इतिहास कसा अभ्यासावा? | बखर

बखर –

मराठ्यांच्या काळात बखर हा शब्द माहिती देणे या अर्थाने रुढ झाला आहे. अर्थातच ऐतिहासिक घडामोडी, शूरवीरांचे गुणगान, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे याविषयीचे लेखन बखरीत वाचावयास मिळते. बखरही अनेक वेळा चरित्रनायकांच्या हुकूमावरुन बखरकाराकडून लिहून घेण्यात येत असे. तथापि बखरकार एका विशिष्ट पक्षाचे असल्याने त्यात स्वकियांची स्तुती व परकीयांची निंदा असे.  तरीही राजकीय स्वरुपाच्या इतिहास लेखनाची परंपरा या दृष्टीने त्यांचे महत्व आहे. शालीवाहन बखर ही सर्वात जुनी बखर आहे.जास्तीत जास्त बखरी इ.स.१७६० आणि १८५० च्या दरम्यान लिहिल्या गेल्या आहेत. वि.का.राजवाडे यांच्या मते १८१८ पर्यंत सुमारे अडीचशे बखरी लिहिल्या गेल्या. इतिहासाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या ७० बखरी प्रसिध्द झाल्या आहेत.

मराठी बखरींची वैशिष्ट्ये

१) बखरी मोडी लिपीत लिहिलेल्या आहेत.

२) अनेक वेळा बखरी राजा किंवा अनेक लहान मोठ्या सरदारांच्या सांगण्यावरुन लिहिल्या जात.

३) अनेक बखरींचा विषय राजकीय असला तरी कालानुक्रमे इतिहास लिहिला जात नसे.

४) बखरीमध्ये राजकीय घडामोडींच्या तुलनेत सामाजिक व आर्थिक परिस्थितीचे उल्लेख कमी आढळतात.

५) दंतकथा आणि परंपरागत दाखले देऊन बखर वाचनीय करण्याचा प्रयत्न केला जात असे.

६) बखरकार स्वकियांची स्तूती करत असे, चमत्कार, अवतारांच्या कल्पनांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असे.

७) बखरींचे निवेदन पौराणिक पध्दतीचे असे.

संदर्भ :

  1. कृष्णाजी अनंत सभासद-कृत श्रीशिवप्रभु-चरित्र बखरीला श्री.स.रा. गाडगीळ यांची प्रस्तावना.
  2. A forgotten literature: foundations of Marathi – Raghunath Vinayak Herwadkar
  3. The Encyclopaedia Of Indian Literature – Amaresh Datta.

Ganesh Dhalpe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here