बाजींद भाग ४२ | बहिर्जी नाईक यांची कहाणी

बाजींद भाग ४२ | बहिर्जी नाईक यांची कहाणी

बाजींद भाग ४२ | बहिर्जी नाईक यांची कहाणी…

बाजींद भाग ४२ तिच्याकडून खूप काही शिकून घेतले त्याने, १० दिवसात त्यांची अतिशय घनिष्ट्य मैत्री झाली होती.

पण, ३ वर्षानंतर आजही साराह ने बाजीराव ला ओळखले.

बाजीराव आणि साराह दोघानाही आपापल्या देशात जाण्याची घाई होती पण अजूनही २-३ तास अवकाश होता, त्यांनी एकत्र कॉफी घेण्याचे ठरवले आणि ते एका हॉटेल मध्ये गेले.

कॉफी घेत दोघांच्या चर्चेला सुरवात झाली.

बाजीराव म्हणाला… साराह..तू इतक्या वर्षानंतर मला अचूक कसे ओळखलेस ?

मला तर वाटले ज्याला सारे जग घाबरते अश्या गुप्तहेर संघटनेची एक वरिष्ठ अधिकारी स्वताच्याच गुर्मीत असेलर..पण तू अजूनही मला लक्षात ठेवलेस…नवल आहे.

किंचित स्मितहास्य करत साराह बोलली…

अरे, असे नको बोलू रे…जगात सर्वाना आम्ही विसरतो मात्र भारतीयांना कधीच नाही.

कारण, आमचे ज्यू लोक साऱ्या जगात विस्थापित झाले पण जिथे तिथे
त्यांच्यावर फक्त अन्यायच झाला होता.

एकमेव भारत असा देश आहे जिथे ज्यू धर्मीय सुखासमाधानाने आहेत.

आज आमचा देश सर्व बाबतीत बलाठ्य होत आहे, आम्ही जगभरात विस्थापित ज्युना परत देशात या असे आवाहन करतो, बरेच लोक आलेही, पण भारतातील ज्यू म्हणतात आता भारत हाच आमचा देश आहे, इथली माती हीच आमची माती आहे.

काय जादू आहे रे तुमच्या देशातील मातीत…सर्वाना या म्हणते, इथे रहा म्हणते आणि आईसारखी मायाही करते..खरोखर तुम्हा भारतीय लोकांबद्दल खूप आदर आहे आमच्या मनात…!

एक परदेशातील मुलगी…जी एका बलाढ्य गुप्तहेर संगटनेची अधिकारी असून आपल्या देशाबध्दल असे उद्‌गार काढते हे ऐकून बाजीराव च्या डोळ्यात अश्रू आले..

पुढे साराह बोलली…

अरे हे काहीच नाही…जरी आम्ही जगात श्रेष्ठ ठरलो असलो, तरी आम्हाला अभ्यासक्रमात तुमचा इतिहास आहे, तुमच्या महाराष्ट्राचा इतिहास आहे.

शिवाजी महाराज आम्हाला शिकवले जातात आणि आमच्या गुप्तहेर प्रणालीचा आत्मा आहे…बहिर्जी नाईक…..!🙏

‘बहिर्जी नाईक’ हा शब्द ऐकताच बाजीराव च्या डोक्यात झिणझिण्या
लागल्यासारखे झाले.

त्याच्या अंगावर सरसरून काटा आला….डोक्यात अश्र्‌ तरळले…!
त्याच्याकडे पाहताच साराह बोलली…

अरे..का रडतोस..मी काही चुकले का ?

नकारार्थी मान हलवत बाजीराव ने डोळे पुसल्रे आणि बोलू लागला…

नाही साराह….तुला माहिती नाही, तू ज्यांचे नाव उच्चारले ते बहिर्जी नाईक ज्यांची समाधी जिथे आहे तिथेच जवळ माझे जन्म गाव आहे.

मी लहानाचा मोठा तिथे झालो, पण कधीही बहिर्जी नाईक काय होते हे जाणून घेतले नाही.

आज त्यांचे नाव तुझ्यासारख्या विद्वान मुल्लीच्या तोंडून ऐकत्रे आणि मी पुरता खजील झालो आहे.

मला काय बोलावे सुचेना. जह

बाजीराव चे ते बोलणे ऐकताच साराह बोलली….

अरे, तू खूप भाग्यवान आहेस त्या मातीत तुझा जन्म झाला, आभाळाएवढा इतिहास आहे तुमचा…आम्ही केवळ प्रेरणा घेतो त्यातून, पण तुम्ही तर त्यांच्या रक्ताचे आहात….आमच्या काम करायची सर्व पद्धती तुमच्या बहिर्जी नाईक या शिवाजी राजांच्या गुप्तहेराची आहे.

आम्ही शिकलोय कि कसे त्यांनी शिवाजी महाराजांना आग्र्याहून सुटका
केली, कशी सुरत लुटली….आणि बरेच काही.

क्रमशः बाजींद भाग ४२ | बहिर्जी नाईक यांची कहाणी

संदर्भ : बाजींद कांदबरी – लेखक पै.गणेश मानुगडे

लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

बाजींद कांदबरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here