महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,76,528

बाजींद भाग ५० | बहिर्जी नाईक यांची कहाणी

By Discover Maharashtra Views: 7449 3 Min Read

बाजींद भाग ५० | बहिर्जी नाईक यांची कहाणी…

बाजींद भाग ५० – बाजींदचा शेवटचा भाग. सखाराम….हे …हेच आहेत आमचे “बहिर्जी नाईक”…!
“हिंदवी स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख”. आणि सखाराम च्या अंगावर सरसरून काटा आला.

त्याला सर्व गोष्टीचा उलघडा होऊ लागला, की उंबराच फुल म्हणताच आम्हाला रायगडावर एव्हढा का मान मिळत होता….आमचा घोडा हा जवळ असला की का पळून जात होता.

पण, बहिर्जी नाईकांनी सखाराम बनून का आम्हास्नी रायगड दावला..आणि रात्रीच्या वेळी तुम्ही कुठे गायब होत होता….हा प्रश्‍न मात्र सखाराम ने बहिर्जी नाईकांना केला….!

नाईक हसले आणि बोलले…..गड्या, या खंडोजी ने स्वराज्यासाठी खूप काही भोगले आहे, हा वेडा स्वताहून तर काय हे लोकांना सांगणार नाही, म्हणून तुमच्या कानावर याची महती घातली.

रात्रीच्या वेळी स्वराज्याच्या महत्वाच्या बातम्या स्वराज्यातील अनेक हेराकडून मला मिळत असायच्या त्यामुळे मला जावे लागत असे, पण सावित्रीने मला या कमी खूप मदत केली..जराही शंका न येऊ देता तुम्हाला सर्वकाही समजून सांगितले तिने…!

आणि वस्ताद काकासारखा निष्ठावान हेर नक्कीच याचा मागोवा काढत तुम्हाला इथवर आणणार हे आम्हाला ठाऊक होते…काय काका बरोबर ना ..?

बहिर्जी नाईक हसत हसत बोलत होते आणि वस्ताद काकांना अश्रू अनावर झाले.
नाईक…तुमची निष्ठा, तुमची खेळी जगात कुणालाच समजणार नाही
बघा…..तुमच्या सारख्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली आम्ही तयार झालो हे आमचे नशीब…!

अहो, नशीब काय काका ……या भणंग भिकाऱ्या बहिर्जीच्या आयुष्यात शिवाजी नावाच्या परीसाचा स्पर्श झाला आणि आयुष्याचे सोने झाले, नाहीतर गावोगावच्या यात्रे जत्रेत सोंग करत भिका मागत हिंडलो असतो….

जे काय आहे त्याचे श्रेय केवळ महाराजांच्या जीवनकार्याला आहे काका.

आपल्या सर्वांच्या आयुष्यातून शिवाजी वजा केले तर शिल्लक काहीच उरत नाही.

तुम्हाला इथवर आणणे,

खंडोजी कडून शिर्क्यांना स्वराज्यात आणणे,

शिक्यांच्या कडून १०० राज्ये स्वराज्यात घेणे

याचा सूत्रधार जो कोणी आहे त्यांचे नाव म्हणजे ‘शिवाजी महाराज’

त्याना विचारल्याशिवाय आणि त्यांच्या आदेशानुसार हा बहिर्जीच काय
स्वराज्यातला अणुरेणु सुध्दा निर्णय घेऊ शकत नाही.

बाजींद हे सारे ऐकत होता, आणि त्याच्याही अश्रूचा बांध फुटला होता….

तो मनोमन विचार करत होता….

आजवर या बाजींद ने उगाच जगाला घाबरवून फुशारकी मारली…..पण, आज कळून चुकले होते…खरे बाजींद तर ‘छत्रपती शिवाजी महाराज’ आहेत.

दूरवर दौडत निघालेल्या महाराजांच्या फौजेकडे तो पाहत होता आणि सोबत मावळत्या सूर्याच्या संधीप्रकाशात भगवा झेंडा फडफड फडकत निघाला होता…..!

संदर्भ : बाजींद कांदबरी – लेखक पै.गणेश मानुगडे

लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

बाजींद कांदबरी

4 Comments