बाजींद भाग ४७ | बहिर्जी नाईक यांची कहाणी

By Discover Maharashtra Views: 5791 3 Min Read

बाजींद भाग ४७ | बहिर्जी नाईक यांची कहाणी…

बाजींद भाग ४७ – गुप्तता हा स्वराज्याचा आत्मा आहे, पण इतकी बेमालून गुप्तता राखून तुम्ही जे काही काम केले आहे त्यासाठी या म्हाताऱ्या गुप्तहेराचा तुम्हाला मानाचा नाही काका……उलट मुजरा तुम्हाला असेल आमचा व खुद्द बहिर्जी नाईकांचा.

ज्याला करंगळी धरून लहानाचे मोठे केले त्याला सुध्दा कर्तव्यात कसूर केली म्हणून आपण खंडोजी समजूनच कडेलोट केले ना…

स्वराज्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे आहे हा शिवशाहीचा शिरस्ता तुम्ही जागून दाखवलात….तुम्हाला मानाचा मुजरा.

वस्ताद काका व खंडोजी एकमेकांच्या मिठीत पडून रडू लागले.

त्यांची ती विलक्षण गुरुशिष्याची भेट पाहून सखाराम, नारायण, सर्जा व मल्हारी सुद्धा रडू लागले होते….

इतक्यात …..गुहेचा दरवाजा वाजला.

खंडोजी ने दार उघडले, आणि बाहेर एक हेजीब वर्दी द्यायला आला होता….

तो बोलला……दस्तूरखुद्द शिवाजीराजांचे अश्वपथक जंगलाच्या पूर्वेकडून येताना दिसत आहे…!

राजे येताहेत…..खंडोजी बोलला…

तू चल पुढे…राजांच्या अश्वांचा ताबा घे…आम्ही क्षणात आलोच…!

खंडोजी बोलू लागला…..
काका..चला महाराज येत आहेत.

सोबत बहिर्जी असावेत…कारण यशवंतमाची जिंकून आसपासच्या १०० राज्यांची ताकत एकवटली आहे….महाराजांच्या मनातील रायगड परिसरातील काळजी निघून गेली आहे…आता केवळ एकच ध्येय….दक्षिणदिग्विजय….चला सारे.

वस्ताद काकासोबत सखाराम व त्याचे सवंगडी खंडोजी सोबत महाराजांच्या भेटीला निघाले.

बाजिंद च्या जंगलातील बाजिंद ची सारी सेना महाराजांच्या दर्शनाला निघाली.

खंडोजी वस्ताद काकाना बोलला….काका अजून काही लोक तुम्हाला भेटायला आतुर आहेत ….असे म्हणत ते जंगलात एका ठिकाणी असलेल्या छावणीकडे आले…!

बाजिंद…..खंडोजी ने हाक मारताच तो धिप्पाड युवक समोर आला.
ज्याच्या चेहर्यावर विलक्षण गांभीर्य होते.

खंडोजी ने बाजिंद ला मुजरा केला…तो मुजरा स्वीकारत बाजिंद
बोलला..खंडोजीराव..हे वस्ताद काका ना ?

जी….होय..हेच माझे वस्ताद…!

बाजिंद ने वस्ताद काकांच्या पायांना स्पर्श करायला खाली झुकत्रा, पण त्यांचा हात मध्येच धरत काका बोलले…….

अहो, ज्यांच्या कहाण्या ऐकून रायगड परिसर हादरून जातो, असे बार्जिद माझ्या पाया पडतात हे ठीक नाही…..तुमची महती आम्ही जाणतो.

यावर हसत हसत बाजिंद उत्तरला…..नाही काका…..तुमच्यासारखे शूर, हिकमती आणि निष्ठ्वान हेर शिवरायांना लाभले हे स्वराज्याचे नशीब..

तुमच्या पट्टा सुदर्शन फिरवा तसा फिरताना आम्ही पहिल्रे आहे, आम्ही १०० वर्षे लोकांना केवळ घाबरवून सोडण्याशिवाय काय केले….

आमचे मूळपुरुष बाजिंद च्या अंतिम इच्छेला आता फळ मिळाले आहे..आता आम्ही मरणाला केव्हाही तयार !

हा संवाद चालू होता आणि खुद्द येसाजीराव शिर्के महाराज त्यांची मुलगी सावित्री व सर्व अंगरक्षकासमवेत तिकडे येत होत्या….

वस्ताद काकांनी ओळखले…हेच ते राजे शिर्के…ज्यांनी कित्येक वर्षे स्वराज्याला न जुमानता लढा दिला….पण आता वयाच्या शेवटच्या टप्प्यात मात्र भगव्या ध्वजाखाली आले….

त्याना पाहताच सर्वानीच मुजरे केले…

खंडोजीने वस्ताद काकांची व राजे शिर्के व सावित्रीची ओळख करून द्यायला

क्रमशः बाजींद भाग ४७ | बहिर्जी नाईक यांची कहाणी

संदर्भ : बाजींद कांदबरी – लेखक पै.गणेश मानुगडे

लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

बाजींद कांदबरी

Leave a comment