बाजींद भाग ४१ | बहिर्जी नाईक यांची कहाणी

बाजींद भाग ४१ | बहिर्जी नाईक यांची कहाणी

बाजींद भाग ४१ | बहिर्जी नाईक यांची कहाणी…

बाजींद भाग ४१ – सखाराम व त्याचे सवंगडी वस्ताद काकासोबत त्या भयानक जंगलात प्रवेशले होते, आणि त्याना पाहताच जंगलात पशु पक्षांनी कोलाहल माजवला होता.

कोणाला समजेना नक्की काय होत आहे…पण, वस्ताद काकांनी ताडले की आपण कुठे आलो आहोत…

त्यांच्या तोंडातून नकळत शब्द बाहेर पडले..

बाजींद…बाजींद…….

ई.सन.२०१३ बानुरगड, सांगली

तहान भक विसरून बाजीराव ही चित्तथरारक कथा किसन धनगराच्या तोंडून ऐकत होता.

एव्हाना जवळपास सूर्य मावळतीकडे झुकत चालला होता. आकाशात पावसाळी ढगांची गर्दी कमी झाली होती, मात्र श्रावणातील तुरळक सारी मात्र अधून मधून किल्ले बाणुरगडावर तुषार शिंपडत होत्या.

बाजीराव जाधव हा महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील पलस गावचा एक तिशीच्या वयाचा युवक. अखंड देशसेवा करणाऱ्या जाधव घराण्यात त्याचा जन्म झाला.

वयाच्या १६ व्या वर्षीच त्याने भारतीय सैन्यदलात नोकरी स्वीकारून देशसेवेचे अखंड व्रत अव्याहतपणे जपले.१९९९ साली कारगिल च्या लढाईत त्याने त्याच्या पराक्रमाची चणूक दाखवली. त्याच्या या कामगिरीवर खश होऊन भारत सरकारने त्याला शौर्य पदक दिले आणि वरिष्ठ पदावर नेमणूक केली.

चौकस बुद्धी, धाडस, शोर्य याच्या जीवावर बाजीराव भारतीय गुप्तहेर खाते ‘रॉ’ मध्ये रुजू झाला.

देशाबाहेरील अनेक गुप्त कारवाया करून देशाचे रक्षण करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट्य होते.

कारगिल युद्धानंतर त्याने बाहेरील देशात गुप्तपणे वावरून अनेक गुप्त बातम्या भारतीय सेनेला पुरवल्या होत्या.

साधारण सहा महिन्यापूर्वीची ही गोष्ट असेल. अमेरिकेत जागतिक सुरक्षा परिषद आयोजीत करण्यात आली होती.

देशोदेशीचे संरक्षण सेवेतील अधिकारी या परिषदेला उपस्थित होते. बाजीराव जाधव यालाही भारतीय सेनेतर्फे जाण्याचे आमंत्रण मिळाले होते.

यावेळी बाजीराव गुप्तहेर म्हणून नव्हे तर भारतीय सैन्यदलाचा अधिकारी म्हणून इथे आला होता.

अनेक देशांचे अनेक अधिकारी तिथे भेटले, जागतिक सुरक्षा आणि दहशदवाद या मुद्दयावर अनेकांची भाषणे झाली.

परिषद संपली आणि बाजीराव आपल्या कारमधून विमानतळाकडे जाणार इतक्यात एका सुंदर परदेशी मुलगीने त्याला थांबवले.

तीला पाहताच बाजीराव आनंदीत झाला…तिला उद्देशून तो इंग्रजीत बोलला, त्याचा मराठी अनुवाद…

‘नमस्ते….जगातील सर्वात खतरनाक गुप्तहेर खात्याची अधिकारी साराह चक्क
माझ्यासमोर …..’
बाजीराव च्या या प्रश्नाला हसतपणे स्वीकारत ती म्हणाली…

‘नमस्ते..अरे मी इथे गुप्तहेर म्हणून नव्हे तर माझ्या देशाची प्रतिनिधी म्हणून आली आहे ,तुला पहिले आणि राहवले नाही म्हणून इथे आले…!

साराह आणि बाजीराव हे ३ वर्षापूर्वीच इस्त्राईल येथे भेटले होते.

साराह ही इस्त्राईल गुप्तहेर संघटना ‘मोसाद’ ची एक तरुण तडफदार अधिकारी होय.

मोसाद एक अशी गुप्तहेर संघटना जिच्या हिटलिस्ट वर जर एखाद्याचे नाव चढले तर प्रत्यक्ष देव सुध्दा त्याला वाचवू शकत नव्हता असे म्हटले जात असे.

एका तुटपुंज्या देशाची ही छोटीशी गुप्तहेर संघटना असामान्य कर्तुत्व, अलोकिक बुद्धिचातुर्य आणि समुद्राएवढ्या धाडसाने आपल्या छोट्याश्या देशाचे गेली पन्नास वर्षे रक्षण करते आणि सतत जिंकते.

जगातील सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ठ गुप्तहेर संघटना कोणती..तर डोळे झाकून उत्तर येते मोसाद.

ज्यु धर्मीय लोकांची ही तुफानी गुप्तहेर संघटना जगातील सर्वे देशात काम करते, तिथे लपलेल्या त्यांच्या देशाच्या शत्रूला स्वत शोधते आणि त्यांच्या देशातून आपल्या देशात गुप्तपणे आणते आणि देशात आणून त्याला शिक्षा देते. आणि शिक्षा दिल्यानंतर सर्व जगाला समजते की अमुक अमुक व्यक्तीला शिक्षा दिली गेली..इतकी खतरनाक ही संगठना

अश्या गुप्तहेर संघटनेत भारतीय सेनेमार्फत १० दिवसांच्या कोर्ससाठी बाजीराव ३ वर्षापूर्वी इस्त्राईल मध्ये साराह ला भेटला.

क्रमशः बाजींद भाग ४१ | बहिर्जी नाईक यांची कहाणी

संदर्भ : बाजींद कांदबरी – लेखक पै.गणेश मानुगडे

लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

बाजींद कांदबरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here