अडणी

अडणी

अडणी –

शंख ठेवण्यासाठी जे आसन असते त्याला अडणी म्हणतात. अडणीह्या कासवाच्या रुपात असतात देवघरात असलेला शंख कासवाच्या पाठीवर ठेवायची पध्दत आहे.

भगवान विष्णुचा साक्षात अवतार म्हणजे कर्म.( कासव ). कासवाला विष्णुच वरदान आहे. कासव हा सत्वगुणप्रधान आहे  , त्यामुळे त्याला स्वताची कुंडलिनी जागृत करता येते. भगवान विष्णुच्या अर्शिवादाने हा मंदिरात गाभा-याच्या समोर देवा कडे पाहात असतो. भगवान विष्णुने समुद्रमंथनात कुर्म अवतार घेतला तसेच विष्णुच्या हातात कायम शंख आहे. विष्णुभगवानाचा व कासवाचा जवळ संबंध  आहे.

देवघरात असलेली अडणी  (कासवाची)ही देव‍ा कडे तोंड करुन ठेवावी. कासवाच तोंड हे देव‍ाच्या पायाकडे पाहणार असाव. तोंड वर असेल तर कुंडलिनी जागृत असलेला कासव असतो.

कासवाची मादी ही आपल्या पिलांना दुध पाजत नाही.ती आपल्या पिल्लांना वात्सल्य  भावनेने पाहीले की पिल्ल‍ांचे पोट भरते. त्य‍ा प्रमाणे आपण देवळात गेलोकी देवाने आपल्याकडे वात्सल्य नजरेने पाहावे व आपल्या वर कृपा अर्शिवाद असावी येवढ माफक अपेक्षा असावी.

माझ्या संग्रहात असणा-या दोन अडणी हे सुंदर कोरीव काम केलेले आहे . एका अडणीच्या पायावर कोरीव नाजूक मोर कोरले आहेत तर  दुसरीवर सहस्रकमल असून त्यावर शंख ठेवता येतो. दोन्ही अडणी वेगळ्या प्रकारच्या असून एक कुंडलिनी जागृत कासव (मानवर) तर दुसरी अडणीचा कासव देवाच्या पाय‍ाकडे पाहणारा आहे.दोन्हीअडणी वेगळ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या असून एक कुंडलिनी जागृत कासव (मानवर) तर दुसरी अडणीचा कासव देवाच्या पाय‍ाकडे पाहणारा आहे.

संतोष चंदने , चिंचवड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here