राजे जाधवराव घराण्यातील पराक्रमी राणी म्हाळसाईसाहेब !!!
१) २५ जुलै १६२९ रोजी अहमदनगरच्या निजामशहाने राजे लखुजीराव जाधवराव हे मोगलांकडे असताना आग्रहाने देवगिरीवर बोलावुन घेतले. त्याच्या मनात कपट होते,परंतु ते राजे लखुजीराव जाधवराव याना समजले नाही.
२) राजे लखुजीराव जाधवराव, त्यांची राणी म्हाळसाईसाहेब उर्फ भागिर्थीबाईसाहेब,बंधु राजे भुतजी,पुत्र राजे अचलोजीराव,राजे बहादुरजीराव, राजे राघोजीराव व नातु युवराज राजे यशवंतराव(राजे दत्ताजीराव यांचे पुत्र) व आप्तमंडळी हे देवगिरीवर येऊन कोतुळकीच्या मळ्यावर आपला तळ ठोकला.
३) राजे लखुजीराव व त्यांचे दोन पुत्र राजे अचलोजीराव व राजे राघोजीराव आणी नातु राजे यशवंतराव व काही आप्त निजामशहाच्या दरबारात गेले.तेथे दरवाज्यावरच बादशहाला तुमची भिती वाटते म्हणुन या समस्त जाधवराव कुटुंबाचे तरवारी काढुन घेतल्या गेल्या. राजे लखुजीराव याना मनात पाप नसल्याने त्याना याबद्दल शंका आली नाही परंतु निजामशहाने दरबारात चर्चा करुन निघुन जाताच मारेकरी घुसले व तेथेच लढाई चालु झाली. राजे लखुजीराव हे खंजीराच्या सह्यायाने बरीच माणसे मारली व कैदेपेक्षा लढुन मरण पत्करले..यात त्यांच्या सोबतची सर्वच लोक म्हणजे दोन पुत्र व एक नातु मारले गेले.
४) सदरील बातमी कोतुळकीच्या तलावर समजली तेव्हा राजे लखुजीराव जाधवराव यांच्या राणी म्हाळसाईसाहेब उर्फ भागर्थीबाईसाहेब या न डगमगता दीर राजे भुतजी ,पुत्र राजे बहादुरजीराव आणी नातु ठाकुरजीराजे (दत्ताजीराजे यांचे द्वितीय पुत्र),विठोजीराजे (अचलोजीराजे यांचे ज्येष्ठ पुत्र),देवरावराजे (अचलोजीराजे यांचे द्वितीय पुत्र) आणि पणतु रतनोजीराजे उर्फ रुस्तुमराव (दत्ताजीराजे यांचे नातु व यशवंतराजे यांचे ज्येष्ठ पुत्र) समवेत किल्ल्यातुन राजे लखुजीराव, त्यांचे दोन पुत्र व एक नातु यांचे देह चढाई करुन प्राप्त केले आणी सिंदखेडराजा येथे नेऊन अंत्यसंस्कार केले. हे म्हाळसाईसाहेब यांचे धैर्य व पराक्रम खरोखरच इतिहासात नोंद करुन ठेवण्यासारखा आहे आणी याच पराक्रमी मातेचे संस्कार राजमाता जिजाऊ आऊसाहेब व राजे लखुजीराव यांच्या नातवावर (चार ही पुत्रांच्या मुलावर झाले) झाले आणी हा पराक्रमाचा वारसा पुढे चालवला गेला .
