यादवकालीन खानदेश भाग ३

खानदेश | यादवकालीन खानदेश भाग १,२,३,४,५,६,७,८,९,१०,११ | खानदेशातील स्वातंत्र्यसंग्राम | खानदेशातील अश्मयुगीन स्थळे | खानदेशातील सूफी साधू - फकीर | महानुभाव पंथ आणि खान्देश | खानदेशातील प्रागैतिहासिक काळ

यादवकालीन खानदेश भाग ३ –

यादव वंशाचा संस्थापक दृढप्रहार होता हे मागील लेखात बघितले. यादवकालीन खानदेश भाग ३. हेमाद्रीच्या राजप्रशस्तीत दृढप्रहारनंतर सेऊणचंद्र प्रथम यांचे नाव येते. या श्लोकात,

तत:स राजा निजराजधानीमधिष्ठित: श्रीनगरं गरीयं:
लेभे सुतं सेउणचंद्रसंज्ञं यत्संज्ञया सेउणदेशमाहु: ।।२२।।

याचा अर्थ असा होतो की,सेउणचंद्र याचे नावावरून या प्रदेशाला सेऊणदेश हे नाव पडले..वसई आणि अश्वी ताम्रपटात त्याचे वर्णन ,

श्रीमत्सेउणचंद्रसंज्ञं नामं नृवरतस्मादभूद् भूमिप:
नित्यं देशपदातिराजविषये स्वं नाम संपादयन्
येनाकारि पुरं च सेऊणपुरं श्रीसिंदीनेरे वरे
तत्पुत्र: कुलदिपको गुणनिधी श्रीधाडायप्पस्तत: ।।

यावरून या प्रदेशाला सेऊणदेश हे नाव पडले. सेऊणचंद्र हा कर्तबगार राजा असावा कारण संगमनेर आणि कळसबुद्रक या ताम्रपटात यादव वंशाची सुरूवात सेऊणचंद्र पासून झालेली दिसते. राष्ट्रकुट आणि गुर्जरप्रतिहार यांचेतील संघर्षात राष्ट्रकुट राजघराण्याची बाजू घेतलेली दिसते.आपल्या देशातील व पायदळ सैनिकात मोठा नावलौकिक केला हे वर्णन वरील श्लोकात दिसते.

राज्याचा प्रसार फारसा सेऊणदेश सोडून इतर भागात झाला नसावा तर कारण सिंदीनेर हे सिंद वंशाच्या काळापासून प्रसिद्ध होते आणि सेऊणचंद्राने नविन भाग वसवला असावा. सिन्नर म्हणजे श्रीनगर हे श्री या देवतेच्या नावावरून म्हणजे लक्ष्मी या देवीवरील म्हणजे हे एक मोठे व्यापारी केंद्र असावे.

सारांश दृढप्रहार जरी संस्थापक असले तरी रोपटे वाढवण्याचे काम सेऊणचंद्र याने केलेले दिसते.

सेऊणचंद्र याचा उत्तराधिकारी म्हणून धडियस,धडियप्पा हे नाव आहे. हेमाद्रीच्या राजप्रशस्ती तसेच वसई ताम्रपट आणि कृष्ण देव यादवांचा मेथी शिलालेख यात अनुक्रमे येतात. धडियप्पा विषयी फारसी माहिती मिळत नाही.

भिल्लम प्रथम

धडियप्पानंतर त्याचा पुत्र भिल्लम प्रथम हा गादीवर आला. वसई आणि अश्वी ताम्रपटात त्याला “आसीदशेषभूत् यशसो श्रीमान बृहद् भिल्लम” हा उल्लेख दिसतो कारण या नावाचे पाच राजे झाले राष्ट्रकूट घराण्याचे सामंतपद सांभाळलेले दिसते.

भिल्लम प्रथम नंतरचा वंशज हा श्रीराज अथवा राजुगि हा यादवसत्तेचा स्वामी आहे.

वद्दगि आणि भिल्लम द्वितीय अश्व आणि वसई ताम्रपटात उल्लेख आहे. संगमनेर ताम्रपटात वड्डिगाबद्दल बरीच माहिती मिळते.वड्डिगाचा विवाह राष्ट्रकुट राजा धोरप्पा याची कन्या व्होडियव्वा हिच्याशी झाला होता.(यादवकालीन खानदेश भाग ३)

संदर्भ देवगिरीचे यादव, ब्रम्हानंद देशपांडे

 -सरला & खानदेश फेसबुक पेज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here